रासायनिक खताचा दर पहा ऑनलाईन

रासायनिक खताचा दर पहा ऑनलाईन

 

कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पहा ऑनलाईन.

रासायनिक खतांच्या वाढत्या किमती हा राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

तर दुसरीकडे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शेतीसाठी खते उपलब्ध करून देण्यासाठी पावलं उचलत असल्याचं भारत सरकारने म्हटलं आहे.

अनेक वेळा शेतकऱ्यांना कृषी केंद्र दुकानामध्ये खताचा साठा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.

तसेच काही ठिकाणी खतासाठी शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे घेतले जातात.

आपल्या गावा जवळच्या कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि आजचा खताचा दर केंद्र सरकारच्या अधिकृत रसायन आणि खत मंत्रालय पोर्टलवर ऑनलाईन पाहूया.

खताचा दर ऑनलाईन पाहणीसाठी खालील केंद्र सरकारची अधिकृत रसायन आणि खत मंत्रालय पोर्टलची लिंक ओपन करा.

https://urvarak.nic.in

यामध्ये आपण राज्य जिल्ह्या नुसार विविध खताचा अहवाल पाहू शकतो.

आपल्याला गावातील जवळील दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पाहण्यासाठी मुख्य मेनू पर्यायांमध्ये “किसान कॉर्नर” पर्यायावर क्लीक करा.

किसान कॉर्नर” पर्यायावर क्लीक केल्यानंतर आपल्याला इथे “राज्य”, “जिल्हा” निवडून “Show” बटन वर क्लिक करा.

जर तुम्हाला एखाद्या किरकोळ विक्रेतेचा आयडी माहिती असेल तर किंवा दुकानाचे नाव निवडून फक्त त्याच दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पाहू शकतो.

“Show” बटन वर क्लिक केल्यानंतर आजचा रिटेलर ओपनिंग स्टॉक आपण पाहू शकतो.

यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एनपीकेएस, एसएसपी आणि कंपोस्ट इत्यादी खतांचा साठा आपण पाहू शकतो.

आता खताचा दर पाहण्यासाठी विक्रेत्याच्या एजन्सीच्या नावासमोर “RETAILER ID” वर क्लिक करा.

“RETAILER ID” वर क्लिक केल्यानंतर तुम्ही विविध माहिती पाहू शकता.

यामध्ये कृषी केंद्र दुकानाचे नाव, खताची कंपनी, खताचे नाव, खताचे दर आणि खताचा उपलब्ध साठा पाहू शकतो.

ऑनलाईन रासायनिक खताचे दर पहाण्याचे अनेक पर्याय
  • फर्टिलायझर ट्रॅकर वेबसाइट

फर्टिलायझर ट्रॅकर ही एक सरकारी वेबसाइट आहे जी रासायनिक खतांचे दर प्रदान करते. या वेबसाइटवर तुम्ही खतांचा प्रकार, खतांचे प्रमाण आणि तुमचा राज्य निवडून खतांचे दर पाहू शकता.

  • फार्मर्स डेटाबेस वेबसाइट

फार्मर्स डेटाबेस ही एक खाजगी वेबसाइट आहे जी रासायनिक खतांचे दर प्रदान करते. या वेबसाइटवर तुम्ही खतांचा प्रकार, खतांचे प्रमाण आणि तुमचा राज्य निवडून खतांचे दर पाहू शकता.

  • खते विक्री करणारे ऑनलाइन स्टोअर्स

खते विक्री करणारे अनेक ऑनलाइन स्टोअर्स आहेत जे रासायनिक खतांचे दर प्रदान करतात. या स्टोअरच्या वेबसाइटवर तुम्ही खतांचा प्रकार, खतांचे प्रमाण आणि तुमचा राज्य निवडून खतांचे दर पाहू शकता.

महाराष्ट्र सरकारने 2023-24 साठी रासायनिक खतांचे अनुदान वाढवले आहे. यामुळे महाराष्ट्रातील रासायनिक खतांचे दर कमी झाले आहेत.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved