‘‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

‘‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ अंतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी अनुदान देण्यात येत आहे. राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविण्यास जुन्या फळबागांचे उत्पादकता वाढविण्याचा हेतू त्यामागे आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

‘‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची उद्दिष्टे”

पारंपरिक उत्पादन पद्धतींची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे.

कुशल आणि अकुशल बेरोजगार तरूणां करिता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

वैविध्यपूर्ण कृषि हवामान विभागानुसार प्रादेशिक अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या त्या प्रदेशातील फलोद्यान क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणींतौर तंत्रज्ञान, पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूहू पद्धतीने सर्वांगीण विकास करणे.

शेतक-याना एकत्रित करून शेतक-यांचे गट निर्माण करणे व शेतकरी उत्पादक समूहू स्थापीत करणेसाठी प्रवृत्त करून उत्पादकता व उत्पादन वाढवून निव्वळ उत्पादनात वाढ करणे.

आस्तित्वात असलेल्या फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता आणणे.

मोसंबी, आंबा, कागदी लिंबू, पेरू, संत्री, आवळा, मोसंबी, काजू, इ. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीकरण करून उत्पादनात वाढ करणे.

शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या बाबींवर या योजनेअंतर्गत अनुदान आहे.

सेंद्रिय शेतीला प्रोत्सहन देणे. मधुमक्षिका पालन पर परागीकरणासाठी.

काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी पूर्व शितकरण गृह, पॅक हाऊस, शितखोली, शितसाखळीचे आधुनिकीकरण करणे, फिरते पूर्व शितकरण गृह, रायपनींग चेंबर, कांदाचाळ-२५ मे. टन, यांद्वारे काढणीपश्चात व्यवस्थापन करणे.

शासकीय किंवा खासगी किंवा सहकारी क्षेत्रासाठी फलोत्पादन पिकांसाठी पणन सुविधा स्थापन करणे.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक कीड यांचे व्यवस्थापन

बियाणे प्रक्रिया, साठवण, भाजीपाला, इत्यादी पायाभूत सुविधा.

फलोत्पादन क्षेत्रात विशषेत: नियंत्रित शेती या घटकामध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहित करणे.

प्रति हेक्टरी प्रति युनिट जास्तीतजास्त पीक उत्पादन वाढीसाठी शेतक-यांना मार्गदर्शन करणे.

फलोत्पादन क्षेत्रात बिगर हंगामी पिके घेण्यासाठी व उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करणे.

शेतक-यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक सहाय्य करणे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अर्ज लागणारी कागदपत्रे

८-अ प्रमाणपत्र

७/१२ उतारा

आधार कार्ड

खरेदी करावयाच्या उपकरणांचे कोटेशन/ बिल

आवश्यक असल्यास जात प्रमाणपत्र

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अर्ज

महाडीबीटी च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल

प्रथम अर्जदाराने नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करावे

वापरकर्ता आयडी किंवा ओटीपी बेस्ड आधार क्रमांकच्या सहाय्याने लॉगीन करून डायरेक्ट मुख्यपृष्ठ यावर क्लिक करा.

कृषि विभागासमोरील अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करा.

फलोत्पादन या घटकाअंतर्गत बाबी निवडा यावर क्लिक करा.

आवश्यक असलेली माहिती भरा जासकी (तालुका, गाव, गट क्रमांक/ सर्वेक्षण क्रमांक, मुख्य घटक, घटक प्रकार, योजना निवडा इत्यादी).

सर्व माहिती भरल्यानंतर जतन करा या ऑप्शनवर क्लिक करा.

‘मी अर्ज केलेल्या बाबी’ ऑप्शन वर क्लिक करा.

यानंतर आपण केलेल्या अर्जाची स्थिती दिसणार आहे. ‘अर्ज सादर करा’ या ऑप्शनवर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर पेमेंट गेटवे ओपन होईल. २३.६०/- रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ योजनेचा ऑनलाईन अर्जप्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होईल.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved