ड्रॅगन फ्रूट, लागवड माहिती, सरकारी अनुदान

ड्रॅगन फ्रूट लागवड माहिती, सरकारी अनुदान

ड्रैगन फ्रुट  हे  निवडुंग वनस्पती परिवारातिल एक फळ असून यातील पोषकतत्व व अँटीऑक्सीडंट मुळे या फळास सुपरफ्रुट म्हणुन प्रसिद्धी मिळत आहे. या फळात विविध औषधी गुण आहेत तसेच कैल्शीयम व फॉस्फरस व यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याचा तान हे पिक सहन करते कमी पाण्यात हे झाडे टिकून राहते. या पिकामध्ये किड रोगाचा प्रादुर्भाव नगण्य असुन पिक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत या पिकाची लागवड करण्यास २०२१-२२ पासून  प्रोत्साहन देण्यात येत आहे. ही वनस्पती मूळची दक्षिण मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील आहे. जगभरात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली जाते. भारतात या फळाची लागवड करणाऱ्या राज्यांमध्ये मिझोरम पहिल्या क्रमांक वर आहे. दोन सर्वात सामान्य प्रकारांमध्ये हिरव्या तराजूसह चमकदार लाल त्वचा असते जी ड्रॅगनसारखी दिसते. सर्वात जास्त प्रमाणात उपलब्ध असलेल्या जातीमध्ये काळ्या बियांसह पांढरा लगदा असतो, जरी लाल लगदा आणि काळ्या बियांसह कमी सामान्य प्रकार देखील अस्तित्त्वात आहे. हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले मानले जाते, कॅलरी कमी आणि लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि जस्त सारख्या पोषक द्रव्यांचे प्रमाण जास्त आहे.

ड्रैगन फ्रुट ची वैशिष्ट्ये

ही वनस्पती २० वर्षांपेक्षा जास्त काळ उत्पादन टिकवून ठेवते, पौष्टिक गुणधर्मांमध्ये (औषधी प्रभाव असलेले) जास्त असते आणि मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योगांसाठी चांगले असते. हे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समृद्ध स्रोत आहे. फळझाडाला जास्त पाण्याची गरज नाही आणि कोरडवाहू जमिनीवर लागवड करता येते.  सुरुवातीला लागवडीचा खर्च जास्त असतो. परंतु वनस्पतीला उत्पादक जमिनीची गरज नसते, ती अनुत्पादक, कमी सुपीक प्रदेशातून जास्तीत जास्त उत्पादन देते.

ड्रैगन फ्रुटसाठी अनुदान

ड्रैगन फ्रुटसाठी  प्रकल्प खर्चाच्या ४० %  कमाल रु.१.६०लाख इतके अनुदान प्रती हेक्टर (२.५ एकर)  मिळते म्हणजे एकरी  रुपेय ६४,००००/- मिळते .

ड्रैगन फ्रुटसाठी अनुदान हे पहिल्या वर्षी ६०%, दुसरे वर्षी २०% आणि तीसरे वर्षी २०% अनुदान मिळते.

आणि हे अनुदान मंडळ कृषी अधिकारी यांनी मोका तपासणी केल्यानंतर ३ टप्प्यात मिळते.

अनुदान कोणत्या गोष्टीसाठी  मिळते-

१.       खड्डे खोदणे

२.       खांबावर प्लेट लावणे

३.       रोपे लागवड करणे

४.       ड्रॅगन फ्रुट पिक आधाराकरीता कॉंक्रीट खांब उभारणी

५.       खत व्यवस्थापन

६.        पीक संरक्षण

७.       ठिबक सिंचन

ड्रैगन फ्रुट  साठी एका लाभार्थीस कमीतकमी 0.२० हेक्टर (अर्धा एकर)  आणी जास्तीजास्त ४ हेक्टर ( १० एकर)  पर्यंत लागवड करता येते आणी अनुदानाचा लाभ घेता येतो.

ड्रैगन फ्रुट  साठी  अर्ज  https://mahadbtmahait.gov.in वर ऑनलाईन अर्ज करावा.

 ड्रैगन फ्रुट  साठी  लाभार्थी पात्रता

अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची मीतकमी ०.२० हेक्टर (अर्धा एकर)  जमीन असणे आवश्यक आहे.

ड्रैगन फ्रुट  लागवड माहिती –

ड्रैगन फ्रुट  अनुदान साठी अर्ज केल्यानंतर कृषी सहाय्यक हे  आपली लागवड जमीन पाहणी करण्यसाठी येतात . त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी लागवडीस  पुर्वसंमती भेटल्या नंतर एक महिन्याच्या आत लागवड सुरु करावी. सदर लागवड ही सलग क्षेत्रावर  करणे बंधनकारक आहे. लागवडीसाठी ०.६० x ०.६०x ०.६० मी आकाराचे खडड़े खोद्णे आवश्यक आहे.

लागवडीसाठी सूक्ष्म सिंचन (ठिबक) करण बंधनकारक आहे.

लागवड ही ४.५ x ३ मी. किंवा ३.५ x ३  मी. किंवा ३ x ३ मी.या अंतरावर करावी.

लागवड ४.५ x ३ मी.अंतरावर केल्यास हेक्टरी २९६० रोपे, ३.५ x ३  मी.अंतरावर केल्यास हेक्टरी ३८०८ रोपे आणी ३ x ३ मी अंतरावर केल्यास हेक्टरी ४,४४४ रोपे लागतात.

 ड्रैगन फ्रुट  लागवडी रोपे कुठून खरेदी करावीत-

१.       सामाजिक वनीकरण किंवा अन्य शासकीय विभागाच्या रोपवाटीका

२.       कृषी विभाग रोपवाटिका

३.       आयसीएआर संस्था, कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटीका

४.       महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायतीच्या रोपवाटीका

५.       कृषी विद्यापीठ रोपवाटीका

जर वरील ठिकाणी रोपे उपलब्ध नसल्यास नोंदणी कृत मान्यता प्राप्त खाजगी रोपवाटीकेतून घ्यावीत.

  ड्रैगन फ्रुट  साठी  कागदपत्रे-

१.       ७/१२ उतारा (सामायिक ७/१२ असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र)

२.       आधार कार्ड

३.       बँक पासबुक झेरॉक्स (आधार संलग्न राष्ट्रीयी कृत बँक)

४.       जातीचा दाखला

५.       विहित नमुन्यातील हमीपत्र

 

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved