केंद्रीय अर्थसंकल्प 2025: कोणत्या गोष्टी स्वस्त, कोणत्या महाग? A ते Z संपूर्ण माहिती
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (1 फेब्रुवारी 2025) देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर केला. सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी देशातील गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर भर दिला. या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या असून, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर करण्यात आली आहे. तसेच, “धनधान्य योजना” सुरू करण्याची घोषणा देखील करण्यात आली.
2025-26 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त?
- LED-LCD आणि टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार
- मोबाईल स्वस्त होणार आणि मोबाईल बॅटरीसाठी 20 भांडवली वस्तूंना सूट
- कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधांवर कस्टम ड्युटी फ्री
- लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर स्वस्त होणार
- भारतामध्ये तयार होणारे कपडे स्वस्त
- चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी होणार
- गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील सीमाशुल्क 30% वरून 5% पर्यंत कमी होणार
2025-26 च्या अर्थसंकल्पात महाग काय?
- इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरील सीमाशुल्क वाढ
- फॅबरिक (Knitted Fabrics) महागणार
- काही तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील वस्तूंच्या किमती वाढणार
- आयकर स्लॅब: कोणत्या उत्पन्न गटाला किती कर?
₹0 ते ₹4 लाख - Nil (करमुक्त)
₹4 ते ₹8 लाख - 5%
₹8 ते ₹12 लाख - 10%
₹12 ते ₹16 लाख - 15%
₹16 ते ₹20 लाख - 20%
₹20 ते ₹24 लाख - 25%
₹24 लाखापुढे - 30%
2025-26 च्या अर्थसंकल्पातील मोठे निर्णय:
डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना – पुढील 6 वर्षे तूर, मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर. कापसाच्या उत्पादनासाठी 5 वर्षांचे मिशन – यामुळे देशातील वस्त्र उद्योगाला चालना मिळणार. किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ₹3 लाखांवरून ₹5 लाखांपर्यंत वाढवली. बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन – छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फायदा. लघुउद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना – पहिल्या वर्षी 10 लाख क्रेडिट कार्ड जारी करण्यात येणार.
2024-25 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त झालं होतं?
- सोनं, चांदी (आयात कर 6.5% वरून 6%)
- मोबाईल हँडसेट, चार्जर आणि सुटे भाग
- कॅन्सरवरील औषधे
- पोलाद, तांबे उत्पादनावरील करसवलत
- लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिक वाहने आणि सोलार सेट
- चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू आणि विजेच्या तारांची किंमत कमी झाली होती.
2024-25 च्या अर्थसंकल्पात काय महाग झालं होतं?
- प्लास्टीक उद्योग आणि प्लास्टीक उत्पादने
- सिगारेट, विमान प्रवास, PVC फ्लेक्स शीट आणि मोठ्या छत्र्या
निष्कर्ष:
या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधांच्या बाबतीत मोठी सवलत मिळाली आहे. दुसरीकडे, उच्च-तंत्रज्ञान उत्पादन आणि फॅब्रिकसाठी किमती वाढवण्यात आल्या आहेत.









