Home / शेती (Agriculture) / बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाने

बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाने

Krushi Seva Kendra license guide for seed fertilizer pesticide sales

बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना | ऑनलाइन अर्ज मार्गदर्शक.

शेतकऱ्यांना पिकासाठी आवश्यक रासायनिक खते, कीटकनाशके, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जावे लागते. त्यामुळे जर तुम्ही गावामध्ये कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू केल्यास चांगला नफा उत्पन्न मिळवता येतो. त्यासाठी आवश्यक असणारा परवाना मिळवणे अगदी सोपे झाले. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून व्यवसायाची सुरुवात करु शकता.

Table of Contents (लेखातील मुख्य मुद्दे)

  1. बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना म्हणजे काय?

  2. कृषी सेवा केंद्र व्यवसाय का फायदेशीर आहे?

  3. बियाणे, खते, कीटकनाशके परवाना फी व वैधता

  4. परवाना नुतनीकरण व सुधारणा शुल्क

  5. परवाना मिळवण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

  6. आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी

  7. कृषी सेवा केंद्र लायसन्स ऑनलाइन काढण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत

  8. महापरवाना पोर्टल व आपले सरकार वेबसाइट माहिती

  9. अर्ज करताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या टिप्स

  10. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

  11. निष्कर्ष व शेतकरी व उद्योजकांसाठी आवाहन

बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवानासाठी फी किती याबद्दल माहिती पाहू :

१ . नविन खत परवान्या साठी रुपये ४५०/- फी लागते परवाना वैधता कालावधी हा खतासाठी ५ वर्ष आहे.  नुतनीकरण फी (किरकोळ विक्रेता)-  रुपये ४५०/-., घाऊक विक्रेता- रुपये   २२५०/- आहे. परवाना सुधारणा करणे साठी फी नगर पंचायत क्षेत्रातील कृषी केंद्रासाठी- रु.६०/- ग्रामीण क्षेत्रातील कृषी केंद्रासाठी- रु.३०/-.

२.  नवीन बियाणे परवाना करीता रक्कम  रुपये १०००/- फी आहे  आणि परवाना वैधता कालावधी-

बियाणेसाठी ५ वर्ष आहे. नुतनीकरण फी- रु.१०००/-.  परवाना सुधारणा करणे साठी फी-रुपये ५००/- आहे

३. नविन कीटकनाशके  परवाना करीता रक्कम  रुपये ७५००/- परवाना वैधता कालावधी नुतनीकरण करण्याची आवश्यकता नाही.  परवाना सुधारणा करणे साठी फी-रुपये ३००/- आहे

वरील ३  परवानाची रक्कम चलनाने भरावी लागते तसेच परवानाची दुय्यम प्रति करिता फी- रु.१००/- आहे.

कीटकनाशके तथा खते परवान्या करीता  अर्जदार यानी कृषी पदविका 2 वर्षे ( पिक संरक्षण, पिक संवर्धन), बी.एस.सी. (कृषी), बि. टेक., बी.एस.सी.(रसायन शास्त्र या विषया सह) इत्यादी पैकी एक शैक्षणीक अर्हता धारण केलेली असावी. वरील अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असल्यास आपण ऑनलाईन पद्धतीने कृषी सेवा केंद्र करिता अर्ज करू शकतो. आणि कृषी सेवा केंद्र लायसन्स मिळवू शकतो.

बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवानेसाठी आवश्यक कागदपत्रे-

  • ग्रामपंचायत मधील ना हरकत प्रमाणपत्र
  • ऑनलाईन चलन फॉर्म
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • उद्यम प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रता
  • बँक अकाउंट (राष्ट्रीयकृत बँकेचे)
  • कृषी केंद्र ज्या ठिकाणी टाकायचे आहे, त्या जागेचा आठ अ चा उतारा
  • वीज बिल
  • रेशन कार्ड

कृषी सेवा केंद्र लायसन्स ऑनलाईन काढण्याची ऑनलाइन पद्धत पुढील प्रमाणे

आपले सरकार महाराष्ट्राच्या खालील वेबसाईटवर जायचे आहे. बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवानासाठी अर्ज aaplesarkar.mahaonline.gov.in  या  वेब साईट वर ऑनलाइन अर्ज ओपन करून घ्या.

नवीन रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या (न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा) लॉगिन करा, लॉगिन करण्याकरिता तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर, युजर नेम आणि पासवर्ड टाका तसेच आपल्या जिल्ह्याचे नाव टाका.

आपले सरकारचे नवीन पेज ओपन होईल तुम्ही भाषा चेंज करू शकता (मराठी हिंदी किवा इंग्लिश) कोणतीही निवडू शकता .

कृषी केंद्र साठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता “कृषी” हा पर्याय निवडा

उजव्या साईडला उपविभाग या ऑप्शन मध्ये “कृषी परवाना सेवा” हा पर्याय निवडा

हया मध्ये अनके पर्याय दिसतील किटकनाशके उत्पादन /विक्री परवाना (राज्यस्तर), मृद व पाणी नमुने तपासणी, बियाणे नमुने तपासणी, किटकनाशके नमुने तपासणी, ठिबक संच उत्पादक नोंदणी, खत निर्मिती/ विक्री प्रमाणपत्र देणे (राज्यस्तर), बियाणे विक्री परवाना (राज्यस्तर), खते उत्पादक परवाना नोंदणी, कीटकनाशके निर्माता परवाना नोंदणी, खते नमुने तपासणी कॉटन डीलर लायसन्स रजिस्ट्रेशन, कीटकनाशके विक्रेता परवाना, बियाणे विक्रेता परवाना, खते विक्रेता परवाना आपल्याला जो परवाना करायचा असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे.

जसेकी खत विक्री करण्यासाठीचा परवाना काढण्याकरिता “खते विक्रेता परवाना नोंदणी”  या पर्यावर निवडू.

महा परवाना पोर्टल ओपन होईल. Fertilizer Dealer License” या ऑप्शन वर क्लिक New License (State Level) या पर्यायावर क्लिक करा.

आपले राज्य (महाराष्ट्र) क्लिक करा त्यानंतर तुमचा जिल्हा. लायसन्स होल्डर मध्ये न्यू यूजर हा पर्याय निवडा. होलसेल किवा रिटेल लायसन पर्याय जो तुम्हाला हवा तो निवडा. आपली वैयक्तिक माहिती व्यवस्थितपणे भरा. चलन पूर्ण भरून अर्ज सबमिट करा.

#KrushiSevaKendra #AgricultureLicense #FertilizerDealerLicense#SeedLicense #PesticideLicense #MahitiInMarathi

FAQ Section (१० प्रश्न-उत्तरे)

1. बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना कशासाठी लागतो?
शेतकऱ्यांना कायदेशीररीत्या कृषी निविष्ठा विक्री करण्यासाठी परवाना आवश्यक असतो.

2. कृषी सेवा केंद्र कोण सुरू करू शकतो?
कृषी पदविका, B.Sc. Agriculture, B.Tech, B.Sc. Chemistry पात्र उमेदवार.

3. खत विक्रेता परवाना किती वर्ष वैध असतो?
५ वर्षे.

4. कीटकनाशके परवाना नुतनीकरण करावे लागते का?
नाही, नुतनीकरणाची आवश्यकता नाही.

5. परवाना फी कशी भरायची?
ऑनलाईन चलन पद्धतीने.

6. अर्ज कुठे करायचा?
aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाइटवर.

7. ग्रामीण व नगर पंचायत क्षेत्रात फी वेगळी आहे का?
होय, सुधारणा फी वेगळी असते.

8. एकाच वेळी तिन्ही परवाने घेता येतात का?
होय, पात्रता असल्यास.

9. अर्ज केल्यानंतर परवाना मिळायला किती वेळ लागतो?
साधारणतः 15–30 दिवस.

10. परवान्याची दुय्यम प्रत कशी मिळते?
रु. 100 फी भरून.

🌸 आर्थिक माहिती आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करा:

प्लॅटफॉर्मलिंक
🌐 Websitehttps://www.mahitiinmarathi.in
💬 WhatsApp Channelhttps://whatsapp.com/channel/0029Val2tuCJuyAB49GXhp14
📘 Facebookhttps://www.facebook.com/mahitiinmarathi
📸 Instagramhttps://www.instagram.com/mahitiinm
🧵 Threadshttps://www.threads.net/@mahitiinm
📢 Telegramhttps://t.me/+8748TkxWbp85YzVl
📧 Emailmahitiinm@gmail.com

 

टॅग्स: #माहितीInमराठी #MahitiInMarathi #FollowUs #SocialMedia #MarathiNews #StayUpdated

 

“आपण ही पोस्ट आपल्या WhatsApp ग्रुपवर शेअर करू शकता. तसेच, जिथे शक्य असेल तिथे Mahiti In Marathi चा Official WhatsApp Mobile No. (7776982235) आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये add करू शकता.”

 

 


 

Tagged:

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!