Home / Trend / ट्रेंड (Trending News & Topics) / कुणबी जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवावे? संपूर्ण मार्गदर्शन 2025

कुणबी जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवावे? संपूर्ण मार्गदर्शन 2025

कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि शासन आदेशाची माहिती असलेले माहितीपत्रक
कुणबी जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवावे? संपूर्ण मार्गदर्शन 2025 
कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, ऑनलाइन अर्जाची पद्धत आणि पडताळणीची संपूर्ण माहिती येथे वाचा. शैक्षणिक, नोकरी व शासकीय योजनांसाठी उपयोगी मार्गदर्शन.

कुणबी प्रमाणपत्र हे महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. मराठा समाज  हा राज्याच्या इतर मागासवर्ग (Other Backward Classes – OBC) प्रवर्गात समाविष्ट करयचा असल्याने, कुणबी प्रमाणपत्र काढणे आवशयक आहे. कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि इतर शासकीय योजनांमध्ये आरक्षणाचे लाभ मिळवता येतात. सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या घडामोडींमुळे या प्रमाणपत्राचे महत्त्व अधिक वाढले आहे. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

मराठा आणि कुणबी समाजातील संबंधांची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी शासन निर्णय (Government Resolutions – GR) जारी केले आहेत. राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गाची यादी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी निर्गमित करण्यात आली होती, ज्यामध्ये अ.क्र. ८३ वर कुणबी जातीचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यानंतर, १ जून २००४ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कुणबी जातीची तत्सम जात म्हणून मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा यांचा समावेश करण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदींचा आधार घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. हे पाऊल केवळ एक प्रशासकीय निर्णय नसून, मराठा समाजाच्या दीर्घकाळ चाललेल्या सामाजिक आणि राजकीय संघर्षाला दिलेला प्रतिसाद आहे.

कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्रता निकष

कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे अर्जदाराकडे किंवा त्याच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाकडे १३ ऑक्टोबर १९६७ किंवा त्यापूर्वीची कुणबी जातीची नोंद असलेला कोणताही कायदेशीर आणि कायदेशीररित्या सिद्ध होणारा पुरावा असणे आवश्यक आहे. हे पुरावे वंशावळ दर्शवणाऱ्या कागदपत्रांसह सादर करावे लागतात. रक्तसंबंधातील नातेवाईकांमध्ये अर्जदाराचे वडील, चुलते, आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा किंवा त्यांच्या भावकीतील असे नातेवाईक यांचा समावेश होतो, ज्यांच्याशी अर्जदाराचा रक्तसंबंध वंशावळीच्या आधारे सिद्ध करता येतो.

कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. ही कागदपत्रे अर्जदाराची ओळख, निवास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची किंवा त्याच्या पूर्वजांची कुणबी जात सिद्ध करणारी असावीत.

अर्जदाराचे वैयक्तिक पुरावे:

ओळख पुरावा: आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, किंवा पॅन कार्ड.

रहिवासी पुरावा: आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका (रेशन कार्ड), किंवा जुने पाणी/वीज बिल.

वंशावळ दस्तऐवज:

अर्जदाराचा पूर्वजांशी असलेला रक्तसंबंध दर्शवणारे दस्तऐवज आणि वंशावळीचे शपथपत्र. हे कागदपत्र सर्वात महत्त्वाचे मानले जाते कारण ते अर्जदाराची पूर्वजांशी असलेली कायदेशीर साखळी सिद्ध करते.

कुणबी जातीच्या पुराव्यासाठीचे दस्तऐवज:

शैक्षणिक पुरावे: अर्जदार किंवा रक्तसंबंधातील नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा (Admission Extract), ज्यावर ‘कुणबी’ जात नोंद आहे.

महसुली पुरावे: जमिनीचे जुने रेकॉर्ड, जसे की ७/१२ किंवा ८-अ चा उतारा. तसेच, वारस नोंदी (६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, फेरफार (Mutation Entries), खासरापत्रक, हक्कपत्रक, किंवा जुने खरेदीखत यांसारखी इतर महसुली कागदपत्रे.

ग्राम प्रशासकीय पुरावे: स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील जन्म-मृत्यूच्या नोंदी जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवल्या जात असत. या नोंदींची नक्कल एक महत्त्वाचा पुरावा ठरू शकते.

इतर महत्त्वाचे पुरावे: रक्तसंबंधातील नातेवाईकांच्या जुन्या सरकारी नोकरीतील सेवा पुस्तिकेचा (Service Book) उतारा, ज्यामध्ये जातीची नोंद आहे. तसेच, ‘कुणबी’ असा उल्लेख असलेले जुने सरकारी दाखले किंवा निझामकालीन नोंदी. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये २०० वर्षांपूर्वीची भांडी किंवा इतर ऐतिहासिक दस्तऐवज देखील पुरावा म्हणून सादर केल्याची उदाहरणे आहेत.

इतर दस्तऐवज:

रक्तसंबंधातील नातेवाईकाचे जुने जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate). हा सर्वात मजबूत आणि ग्राह्य धरला जाणारा पुरावा आहे.

नावामध्ये किरकोळ बदल असल्यास १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र (Affidavit) तयार करणे आवश्यक आहे.

सर्वात महत्वाचे – काही विशिष्ट पुरावे उपलब्ध नसल्यास, त्याची कारणे स्पष्ट करणारे शपथपत्र सादर करता येते.
कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कागदपत्रे कशी मिळवावीत?

कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले ऐतिहासिक आणि महसुली दस्तऐवज शोधणे ही एक आव्हानात्मक प्रक्रिया असू शकते. जुने महसुली दस्तऐवज जसे की ७/१२, ८-अ, आणि फेरफार उतारे ऑनलाईन महाभूमी पोर्टल (https://bhulekh.mahabhumi.gov.in) वरून डाउनलोड करता येतात. मात्र, जुन्या नोंदींसाठी संबंधित भूमी अभिलेख कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागेल.

कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ ची नक्कल मिळवण्यासाठी अर्जदाराच्या पूर्वजांचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये अर्ज करावा लागतो. या व्यतिरिक्त,

ई-कोतवाल बुक प्रणाली (e-Kotwal Book) सारख्या डिजिटल सेवेद्वारे देखील कोतवाल बुकची नक्कल किमान ३०/- शुल्क भरून ऑनलाइन मिळवता येते.

 

कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया

कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही टप्प्यांमध्ये विभागलेली आहे.

ऑनलाईन अर्ज

अर्जदारांनी सर्वप्रथम आपले सरकार पोर्टलवर (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करावी. त्यानंतर, ‘सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग’ अंतर्गत ‘जात प्रमाणपत्र’ सेवा निवडून ऑनलाईन अर्ज भरावा. या अर्जात सर्व वैयक्तिक माहिती, पत्ता आणि संबंधित पुराव्यांची माहिती भरावी लागते. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

ऑफलाईन अर्ज

ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यावर त्याची प्रिंट काढून घेणे आवश्यक आहे. ही प्रिंट काढलेली प्रत सर्व मूळ कागदपत्रे तुमच्या सहीसहा जोडून सादर करावी लागतात. भरलेल्या अर्जावर १० रुपये किमतीचा कोर्ट फी स्टॅम्प किंवा तिकीट लावावे आणि आपला पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा.

अर्ज तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा सेतू/नागरी सुविधा केंद्रात जमा करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यावर, पोचपावती घेणे आवशयक आहे.  ही पोचपावती जपून ठेवावी. खबरदारी म्हणून एक फोटो कडून मोबईलमध्ये ठेवाव.

आपले सरकार पोर्टल जरी ऑनलाईन अर्ज द्वारे कुणबी प्रमाणपत्र बनत असेल तरी हा संवेदनशील आणि खूप फायद्याचा विषय आहे त्यामुळे प्रशासकीय पडताळणी आवश्यक आहे.

अर्ज शुल्क आणि अंदाजे कालावधी

अर्ज शुल्क आपले सरकार पोर्टलवरील सुरक्षित ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे भरता येते. प्रशासनाने असे आश्वासन दिले आहे की, ज्या अर्जदारांकडे सर्व आवश्यक आणि योग्य कागदपत्रे आहेत, त्यांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. प्रमाणपत्र लगेच मिळून जाईल.

प्राथमिक चौकशी आणि तपासणी

अर्ज सादर झाल्यावर, तहसीलदार कार्यालयातील एक समिती कागदपत्रांची प्राथमिक चौकशी करते. मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी नवीन कार्यपद्धतीनुसार, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी यांच्या समितीद्वारे गावपातळीवर सखोल चौकशी केली जाते. या तपासणीमध्ये अर्जदाराच्या वंशावळीची आणि नातेसंबंधांची पडताळणी केली जाते, ज्यामुळे सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली जाते.

जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांचा निर्णय

प्राथमिक तपासणी आणि पडताळणी पूर्ण झाल्यावर, समिती आपला अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयकडे पाठवते. माहिती योग्य आढळल्यास, सक्षम प्राधिकारी (उपविभागीय अधिकारी/उप जिल्हाधिकारी) कुणबी प्रमाणपत्र जारी करतात. जर अर्जात कोणतीही त्रुटी किंवा विसंगती आढळल्यास, अर्जदाराला स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावले जाऊ शकते.

बनावट कागदपत्रे सादर केल्यास होणारी कारवाई

प्रशासनाने खोटे दस्तऐवज सादर करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. जर बनावट पुरावे सादर केल्याचे सिद्ध झाल्यास, संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल होऊ शकतो, तसेच त्यांना मिळालेले सर्व शासकीय आणि शैक्षणिक लाभ तात्काळ काढून घेतले जाऊ शकतात. कायद्यात अशा गुन्ह्यांसाठी शिक्षेची देखील तरतूद केली आहे.

जात प्रमाणपत्र म्हणजे काय?

जात प्रमाणपत्र (Caste Certificate) हे एक अधिकृत सरकारी दस्तऐवज आहे जे एखाद्या व्यक्तीचे विशिष्ट जात किंवा समाजाशी असलेले संबंध प्रमाणित करते. हे प्रमाणपत्र आपले सरकार पोर्टलद्वारे प्राप्त केले जाते.

जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे काय?

जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) हे जात प्रमाणपत्र अधिकृत आणि खरे असल्याचा पुरावा देते. शासनाने बनावट प्रमाणपत्रे टाळण्यासाठी ही प्रणाली सुरू केली आहे. शासकीय किंवा शैक्षणिक लाभांसाठी जात प्रमाणपत्र सादर करताना हे प्रमाणपत्र आवश्यक असते.

दोन्हीमधील महत्त्वाचा फरक

कुणबी प्रमाणपत्र हे ‘जात प्रमाणपत्र’ आहे, जे अर्जदाराची कुणबी जात सिद्ध करते आणि त्याला ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र ठरवते. हे प्रमाणपत्र आपले सरकार पोर्टलवर अर्ज करून मिळते. याउलट, ‘जात वैधता प्रमाणपत्र’ हे जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याला कायदेशीर वैधता देण्यासाठी आवश्यक असते. जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज बार्टीच्या (BARTI) वेबसाइटद्वारे (https://bartievalidity.maharashtra.gov.in) दाखल केला जातो. याचा अर्थ असा की, जात प्रमाणपत्र असल्याशिवाय जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येत नाही.

महत्वाच्या सरकारी संकेतस्थळांची यादी
संकेतस्थळाचे नावसंकेतस्थळाची लिंकउद्देश
आपले सरकार (Aaple Sarkar)https://aaplesarkar.mahaonline.gov.inजात प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे अधिकृत पोर्टल.
महाभूमी (Mahabhumi)https://bhulekh.mahabhumi.gov.in७/१२, ८-अ, आणि फेरफार उतारे यांसारखे जुने महसुली दस्तऐवज मिळवण्यासाठी.
बार्टी (BARTI)https://bartievalidity.maharashtra.gov.inजात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी आणि स्थिती तपासण्यासाठी.
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (GR Portal)https://gr.maharashtra.gov.in/नवीन शासन निर्णय शोधण्यासाठी.

 

उपयुक्त संपर्क माहिती

प्रक्रियेदरम्यान कोणत्याही मदतीसाठी आपले सरकार पोर्टलवर १८०० १२० ८०४० हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांची संपर्क माहिती त्या-त्या जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध असते.

५७ लाख नोंदींमध्ये तुमच्या पूर्वजांची नोंद आहे का पहा?

लिंकवर जाऊन तालुका/गाव निवडा.

तुमचे किंवा तुमच्या नातेवाईकांचे नाव तपासा.

अकोला

https://akola.gov.in/mr/?&s=कुणबी

अमरावती

https://amravati.gov.in/mr/?&s=कुणबी

अहमदनगर

https://ahmednagar.nic.in/?&s=कुणबी

कोल्हापूर

https://kolhapur.gov.in/?&s=कुणबी

गडचिरोली

https://gadchiroli.gov.in/mr/?&s=कुणबी

छत्रपती संभाजीनगर

https://aurangabad.gov.in/?&s=कुणबी

जळगाव

https://jalgaon.gov.in/mr/?&s=कुणबी

जालना

https://jalna.gov.in/?&s=कुणबी

ठाणे

https://thane.nic.in/mr/?&s=कुणबी

धाराशिव

https://osmanabad.gov.in/mr/?&s=कुणबी

धुळे

https://dhule.gov.in/mr/?&s=कुणबी

नंदुरबार

https://nandurbar.gov.in/mr/?&s=कुणबी

नागपूर

https://nagpur.gov.in/mr/?&s=कुणबी

नांदेड

https://nanded.gov.in/?&s=कुणबी

नाशिक

https://nashik.gov.in/mr/?&s=कुणबी

परभणी

https://parbhani.gov.in/mr/?&s=कुणबी

पालघर

https://palghar.gov.in/?&s=कुणबी

पुणे

https://pune.gov.in/mr/?&s=कुणबी

बीड

https://beed.gov.in/?&s=कुणबी

भंडारा

https://bhandara.gov.in/mr/?&s=कुणबी

मुंबई उपनगर

https://mumbaisuburban.gov.in/mr/?&s=कुणबी

मुंबई शहर

https://mumbaicity.gov.in/mr/?&s=कुणबी

यवतमाळ

https://yavatmal.gov.in/mr/?&s=कुणबी

रायगड

https://raigad.gov.in/?&s=कुणबी

लातूर

https://latur.gov.in/?&s=कुणबी

वर्धा

https://wardha.gov.in/?&s=कुणबी

वाशिम

https://washim.gov.in/?&s=कुणबी

सांगली

https://sangli.nic.in/mr/?&s=कुणबी

सातारा

https://www.satara.gov.in/?&s=कुणबी

सिंधुदुर्ग

https://sindhudurg.nic.in/?&s=कुणबी

सोलापूर

https://solapur.gov.in/?&s=कुणबी

❓ कुणबी जातीचे प्रमाणपत्र: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: कुणबी जातीचे प्रमाणपत्र कोण मिळवू शकतो?
👉 ज्या व्यक्तींच्या किंवा त्यांच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांच्या (वडील, आजोबा, पणजोबा इ.) कडे १३ ऑक्टोबर १९६७ किंवा त्यापूर्वीची “कुणबी” जातीची नोंद असलेला शासकीय पुरावा आहे, ते अर्ज करू शकतात.

Q2: कुणबी जातीचे प्रमाणपत्र का आवश्यक आहे?
👉 हे प्रमाणपत्र असल्यास अर्जदाराला शिक्षण, सरकारी नोकरी आणि शासकीय योजनांमध्ये OBC आरक्षणाचा लाभ मिळतो.

Q3: कुणबी प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
👉 ओळख पुरावा (आधार कार्ड, मतदार कार्ड), रहिवासी पुरावा (शिधापत्रिका, वीज बिल),
वंशावळ पुरावा (शपथपत्र), शैक्षणिक दाखले (शाळा सोडल्याचा दाखला), महसुली दस्तऐवज (७/१२, ८-अ, फेरफार उतारे), कोतवाल बुक, नातेवाईकाचे जुने जात प्रमाणपत्र इ.

Q4: कुणबी जातीचे प्रमाणपत्र कुठे मिळते?
👉 तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्राद्वारे मिळते. मात्र अर्ज करावा लागतो आपले सरकार पोर्टलवर (https://aaplesarkar.mahaonline.gov.in).

Q5: अर्ज प्रक्रिया कशी आहे?
👉

  1. आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करा.

  2. जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज भरा व कागदपत्रे अपलोड करा.

  3. अर्ज प्रिंट काढून तहसील/सेतू केंद्रात सादर करा.

  4. ग्रामपातळीवर वंशावळ व कागदपत्रांची पडताळणी होईल.

  5. पडताळणी योग्य ठरल्यास उपविभागीय अधिकारी प्रमाणपत्र जारी करतात.

Q6: अर्ज शुल्क किती आहे?
👉 अर्जासाठी १० रुपये कोर्ट फी स्टॅम्प आणि पोर्टलवरील ऑनलाइन शुल्क भरावे लागते.

Q7: कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास किती वेळ लागतो?
👉 जर सर्व कागदपत्रे योग्य असतील, तर प्रमाणपत्र काही दिवसांत जारी केले जाते.

Q8: जुनी कागदपत्रे कुठे मिळवता येतील?
👉 महसुली कागदपत्रे महाभूमी पोर्टलवर (https://bhulekh.mahabhumi.gov.in),
कोतवाल बुकची नक्कल तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूम किंवा e-Kotwal Book प्रणालीद्वारे मिळवता येते.

Q9: जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र यात काय फरक आहे?
👉 जात प्रमाणपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीची जात सिद्ध करणारा प्राथमिक पुरावा.
👉 जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे त्याच जात प्रमाणपत्राची कायदेशीर पडताळणी व वैधता देणारा पुरावा.

Q10: कुणबी प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांनी घेतल्यास काय होईल?
👉 बनावट पुरावे दिल्यास अर्जदारावर गुन्हा दाखल होतो, शासकीय लाभ रद्द केले जातात आणि कायदेशीर शिक्षा होऊ शकते.

=============================================================================================

🌸 माहिती In मराठी 🌸

Follow करा आणि नेहमी अपडेट राहा!

🌐 Website 👉 https://www.mahitiinmarathi.in

💬 WhatsApp Channel 👉 https://whatsapp.com/channel/0029Val2tuCJuyAB49GXhp14

📘 Facebook 👉 https://www.facebook.com/profile.php?id=61573551054721

📸 Instagram 👉 https://www.instagram.com/mahitiinm

🧵 Threads 👉 https://www.threads.net/@mahitiinm

📢 Telegram 👉 https://t.me/+8748TkxWbp85YzVl

📧 Email 👉 mahitiinm@gmail.com

#माहितीInमराठी #MahitiInMarathi #FollowUs #SocialMedia #MarathiNews #StayUpdated

 

Tagged:

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!