Home / सरकारी योजना (Government Schemes) / बँक सखी योजना: महिलांसाठी आर्थिक सशक्तीकरणाची संधी

बँक सखी योजना: महिलांसाठी आर्थिक सशक्तीकरणाची संधी

DALL·E 2025 02 06 18.14.12 A digital illustration of a confident Indian woman in a traditional saree holding a banking device in one hand and cash in the other symbolizing fin
बँक सखी योजना: महिलांसाठी आर्थिक सशक्तीकरणाची संधी
बँक सखी योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन देते. कमी गुंतवणुकीत मोठी संधी मिळवा आणि आत्मनिर्भर बना. संपूर्ण माहिती मिळवा!

पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना बँक सखी म्हणून नियुक्त केले जाते. यासाठी जागा निघाल्यानंतर पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागतो. त्यानंतर परीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी असते. परीक्षेत पास झाल्यानंतर बँक सखी म्हणून तुमची नियुक्ती केली जाते. नियुक्तीनंतर आठ दिवसाचे ट्रेनिंग असते ट्रेनिंगमध्ये बँक सखीला काम कसे करावे हे शिकवले जाते. ट्रेनिंग नतर बँक सखी  कामाला सुरवात करू शकते. ज्यांच्या घरापासून आणि गावापासून बँक दूर आहेज्यांना बँकेत जाणे शक्य होत नाही अशा लोकांना त्यांची कामे करून देणारी नियुक्त महिला म्हणजे बँक सखी असे आपण म्हणू शकतो.

बँक सखीच्या माध्यमातून सरकार आपल्या ग्रामीण क्षेत्रातील महिला उद्योजिकांना वित्तीय सहायता प्रदान करतो. बँक सखीच्या माध्यमातून माध्यमातून महिला उद्योजिकांना खाते उघडविण्यात आणि त्यांना वित्तीय सेवा प्रदान करण्यात मदत केली जाते.

बँक सखी कामे पुढील प्रमाणे:-
  • वैयक्तिक व स्वयंसहाय्यता समूह यांचे बँक खाते उघडणे
  • बँक खात्यावर रक्कम जमा करणे अथवा रक्कम काढणे
  • पात्र सदस्यांना विमा व पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट करून घेणे
  • विविध प्रकारचे बिल भरणा करणे

अशा प्रशिक्षणांच्या माध्यमातून महिला उद्योजिकांना विभिन्न बँक सेवांचा उपयोग करायला मदत केली जाते.

बँक सखीच्या माध्यमातून महिला उद्योजिकांना वित्तीय सहाय्यता प्राप्त करण्याचे प्रक्रिया आपल्या ग्रामीण बँकेच्या शाखेच्या व्यवस्थापकांच्या सहाय्याने सादर केले जाते. त्यांनी उद्योजिकांना वित्तीय संसाधनेकर्जाची संरचनाकर्जाची तरतूदऋण अनुदानबँक खात्याच्या उघडणीआर्थिक सल्ले इत्यादी मदत केली जाते. महिला उद्योजिकांना उत्पादन वाढविण्यासाठी बँकांची मदत कसे मिळवायचीकर्ज कसे मिळवायचे आणि तयार माल कसे विकायचे यांची माहिती महिलांना बँक सखी योजनेच्या माध्यमातून दिली जाते.  बँक सखी मार्फत विभिन्न प्रशिक्षण कार्यक्रमआर्थिक सहाय्यबँक क्रेडिट व ऋणांच्या योजनांची माहिती प्रदान केली जाते ज्यामार्फत महिला उद्योजिकांना तयार मालाची वापरासाठी कर्ज मिळायला मदत मिळू शकते. तसेचत्यांना वित्तीय नियोजन आणि आर्थिक प्रबंधनाच्या विषयातील मार्गदर्शन दिले जाते.

बँक सखी कामाचे स्वरूप आणि मानधन

बँक सखीला 12 गावांचे काम पाहावे लागते. त्यात बचत गटांना लोन, अकाऊंट ओपन करून देणेविमा काढून देणेमहिलांना आर्थिक साक्षर बनवणे इत्यादि कामे करावी लागतात. कोरोना काळात गावो गावी जाऊन ही सर्व कामे नियमाचे पालन करून बँक सखीला करावी लागली. या कामासाठी त्यांना 3000 रुपये मानधन पंचायत समिती  कडून दिले जाते. आधी दर सहा महिन्याला हे मानधन यांना दिले जात होते आता दर तीन महिन्याला दिले जाते.

Tagged:

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!