LIC Policy
LIC Policy माहिती मराठीत | LIC पॉलिसीचे प्रकार आणि फायदे LIC Policy – आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चिंता म्हणजे भविष्याची आर्थिक सुरक्षितता. आपण मेहनत करून पैसा कमवतो, पण अचानक घडलेल्या घटनेमुळे (अपघात, मृत्यू, आजार) कुटुंबावर अधिक वाचा
गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय आणि भाविकता जागवणारा उत्सव आहे.
हा दिवस म्हणजे श्रीगणेशाचा जन्मदिन. बुद्धी, समृद्धी आणि अडथळे दूर करणारे देव म्हणून गणरायाला विशेष मान आहे.
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा सण साजरा होतो.
2025 मध्ये गणेश चतुर्थी कधी आहे? पूजा कधी करावी? विसर्जनाची तारीख काय आहे?
या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती तुम्हाला या लेखामध्ये मिळेल.
पहाटे लवकर उठून स्नान करावे.
गणेश चतुर्थीचे व्रत पाळण्याची प्रतिज्ञा घ्यावी.
घराच्या ईशान्य दिशेला पिवळ्या कापडावर चौरंग मांडून गणेश मूर्ती स्थापित करावी.
गंगाजल शिंपडून मूर्तीला स्नान घालावे.
कुंकवाचा टिळा लावून दुर्वा, मोदक, लाडू, श्रीफळ अर्पण करावे.
गणपती अथर्वशीर्षाचे पठण आणि आरती करावी.
सकाळी व संध्याकाळी बाप्पाची पूजा करणे आवश्यक आहे.
गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा उत्सव हा भाविकांच्या श्रद्धेनुसार वेगवेगळ्या दिवसांपर्यंत साजरा केला जातो.
दीड दिवसाचा गणपती – अनेक घरांमध्ये बाप्पा दीड दिवस ठेवतात. दुसऱ्या दिवशी विसर्जन केलं जातं.
पाच दिवसांचा गणपती – पारंपरिक पद्धतीनुसार पाच दिवस बाप्पाची पूजा करून पाचव्या दिवशी विसर्जन केलं जातं.
सात दिवसांचा गणपती – काही घरगुती गणेशोत्सवात बाप्पा सात दिवस असतात.
नऊ दिवसांचा गणपती – नवरात्रीशी जोडून काही कुटुंबांमध्ये नऊ दिवसांचा गणपती ठेवला जातो.
अकरा दिवसांचा गणपती – महाराष्ट्रात ही परंपरा खूप लोकप्रिय आहे. अकराव्या दिवशी, म्हणजे अनंत चतुर्दशीला, भव्य मिरवणुकीनंतर बाप्पाचे विसर्जन केले जाते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे देखील त्यांच्या परंपरेनुसार विसर्जनाची तारीख ठरवतात.
काही मंडळे पाचवा, सातवा किंवा अकरावा दिवस निवडतात.
तर काही मंडळे शेवटपर्यंत, म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा ठेवतात.
घरगुती गणेशोत्सव
गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरांत गणपती बाप्पाची मूर्ती आणली जाते.
परंपरेनुसार जितके दिवस बाप्पा विराजमान असतात तितके दिवस सकाळ-संध्याकाळ पूजन, आरती आणि नैवेद्य केला जातो.
मोदक, लाडू आणि दुर्वा अर्पण करून भाविक भक्तिभावाने पूजा करतात.
सार्वजनिक गणेशोत्सव
सार्वजनिक मंडळांत गणपती बाप्पासाठी भव्य मंडप उभारले जातात.
सुंदर सजावट, लाईट्स, विद्युत रोषणाई आणि आरतीच्या कार्यक्रमांनी वातावरण उत्साहपूर्ण होतं.
महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहेत.
मुंबईचा लालबागचा राजा
मुंबईतील लालबागचा राजा हा गणपती बाप्पा “नवसाला पावणारा” म्हणून ओळखला जातो.
दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
पुण्यातील मानाचे गणपती
पुण्यातील पाच मानाचे गणपती विशेष प्रसिद्ध आहेत.
त्यांची मिरवणूक परंपरेनुसार काढली जाते आणि त्यांना विशेष महत्त्व दिलं जातं.
मिरवणुका आणि संगीत
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांसोबत काही ठिकाणी DOLBY DJ चा वापर केला जातो.
ताशा, ढोल, झांज यांच्या गजरात भक्त गणपती बाप्पाची मिरवणूक काढतात.
अलीकडच्या काळात POP मूर्तींमुळे प्रदूषण वाढले.
त्यामुळे आता शाडूच्या मातीतल्या मूर्ती, बियाण्यांची मूर्ती किंवा घरगुती मातीच्या मूर्तींचा वापर वाढतो आहे.
“गणपती बाप्पा आणि निसर्ग दोन्हींचं रक्षण” ही संकल्पना जोर धरते आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा सण विशेष साजरा होत असे. सर्वसाधारण घरगुती गणेश उत्सवची इतिहास नोद सापडते.
मात्र 1893 मध्ये लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. कारण इंग्रजा विरोधात लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र यावे व गुलामगिरी विरोधात लढा द्यवा. उद्देश होता, लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्यलढ्याला गती देणे.
आज हा उत्सव केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिक बंध जपणारा आहे.
गणेश चतुर्थी हा श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरणाचा संदेश देणारा सण आहे.
घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी बाप्पाचं आगमन म्हणजे उत्साह आणि भक्तीचा मिलाफ.
2025 मध्ये 27 ऑगस्टला बाप्पाचं स्वागत करूया आणि 6 सप्टेंबरला निरोप देताना म्हणूया:
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!”
गणपती स्तोत्र (गणपती अथर्वशीर्ष)
श्रीगणेशाय नमःवक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
अर्थ (मराठीत)
हे वक्रतुंड (वाकड्या सोंडेचे) महाकाय गणपती, ज्यांचा तेज सूर्याच्या कोटी सूर्यांइतका आहे,
माझ्या सर्व कार्यात, सर्व काळी, सर्व अडथळे दूर करून यशस्वी कर.
=============================================================
गजाननं भूतगणादि सेवितं,
कपित्थ जम्बू फलचारु भक्षणम्।
उमासुतं शोकविनाशकारणं,
नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्॥
गजानन (हत्तीमुखी) गणपती, ज्यांची भूतगण पूजाआराधना करतात,
कपित्थ आणि जांभूळ फळांचा ज्यांना प्रिय नैवेद्य आहे,
उमा देवीचे पुत्र, शोकाचा नाश करणारे आणि विघ्नहर्ता अशा गणेशाच्या चरणकमलांना मी वंदन करतो.
हे स्तोत्र रोज सकाळी किंवा गणेश चतुर्थीच्या दिवसात म्हणवे.
👉 27 ऑगस्ट 2025, बुधवार रोजी गणेश चतुर्थी साजरी होईल.
👉 सकाळी 11.05 ते दुपारी 01.40 हा मध्यान्ह पूजेचा शुभ कालावधी आहे.
👉 6 सप्टेंबर 2025, शनिवार रोजी गणेश विसर्जन होईल.
👉 गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते. या दिवशी गणेश पूजन केल्याने घरात सुख-शांती आणि समृद्धी नांदते.
👉 परंपरेनुसार हा उत्सव 10 दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीला समाप्त होतो.
#गणेशचतुर्थी2025 #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #EcoFriendlyGanesh #MahitiInMarathi
#GaneshVisarjan #GaneshFestival
🌸 माहिती In मराठी 🌸
✅ Follow करा आणि नेहमी अपडेट राहा!
🌐 Website 👉 https://www.mahitiinmarathi.in
💬 WhatsApp Channel 👉 https://whatsapp.com/channel/0029Val2tuCJuyAB49GXhp14
📘 Facebook 👉 https://www.facebook.com/profile.php?id=61573551054721
📸 Instagram 👉 https://www.instagram.com/mahitiinm
🧵 Threads 👉 https://www.threads.net/@mahitiinm
📢 Telegram 👉 https://t.me/+8748TkxWbp85YzVl
📧 Email 👉 mahitiinm@gmail.com
#माहितीInमराठी #MahitiInMarathi #FollowUs #SocialMedia #MarathiNews #StayUpdated