मद्य परवाना
मद्यपान करणे शरीरास हानिकारक आहे, असे माहिती असूनही, मद्यपान करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. तुम्ही सर्रास कोणत्याही परवानगीशिवाय दारू पित असेल तर हे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. राज्य उत्पादन शुल्क (State Excise Department) विभागाने दारू पिण्यासाठी काही नियम घालून दिले आहेत. त्याचे पालन करणे गरजेचे आहे. कारण, आता दारू पिण्यासाठी परवाना (Liquor License) बंधनकारक करण्यात आले आहे. जर आपण नियम मोडल्यास आपल्कयावर ठोर कारवाई करण्यात येणार आहे.
मद्य परवाना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. पॅन कार्ड
३. रहिवासी दाखला
३. फोटो आणि सही
कायमच्या परवान्यासाठी १०००/- रुपये शुल्क आकारले जाते, हया मध्ये तुम्हला आयुष्यभर दारू पिण्यासाठी मद्य परवाना मिळतो परत परत परवाना का काढण्याची गरज नाही जर तुम्हला कायम स्वरूपी मद्य परवाना नको असेल तर तुम्ही वर्षभराचा मद्य परवाना काढू शकता वर्षभराच्या परवान्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://exciseservices.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. त्याठिकाणी सर्विसेस ची यादी दिसेल, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला कुठला परवाना पाहिजे ते निवडून त्यासाठी ऑनलाइन अर्ज ही आपण दाखल करू शकतो.
मद्यपान करण्याचे नियम? –
मद्यपान करण्यासाठी शासनाकडून आपल्याला परवानगी मिळते (Liquor License). मात्र, त्यालाही काही निर्बंध आहेत. मद्यपान करण्यासाठी वयाची अट आहे २१ वर्ष पूर्ण लागते. ५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी अल्कोहल असणारी माइल्ड बियर, बिझर पिण्यासाठी ही वयाची अट आहे २१ वर्ष पूर्ण करणं गरजेचं आहे. बिझरमध्ये अल्कोहोल चे प्रमाण ४.८ टक्के आहे.
मद्यपान करण्यासाठी २५ किंवा त्यापेक्षा अधिक वय असणे गरजेचे आहे. पण त्यासाठी मद्यसेवन परवाना (लायसंस) गरजेचा असतो. तो नसेल तर तुम्ही अधिकृरित्या मद्यपान करून शकत नाही.
वर्धा, गडचिरोली हे जिल्ह्यातील नागरिकांना हे नियम लागू नाहीत. कारण या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे. ठिकाणी फक्त वैद्यकीय शिफारशीनुसार मद्यसेवन करता येते.
मद्यपान परवाना का गरजेचा असतो? –
अनेक लोकांना मद्यपान करण्यासाठी परवाना लागतो, हेच माहिती नसते. नियमानुसार कोणत्याही प्रकारचेया मद्याची विक्री किंवा सेवन करण्यासाठी त्याला परवान्याची (Liquor License) गरज असते.
मद्यसेवन करण्याच्या परवान्यानुसार तुम्हाला दारू पिण्याची क्षमता ठरवून दिलेली असते.
दारू खरेदी करताना तुम्हाला तुमच्याकडील असलेले मद्य लायसन्स दुकानात दाखविणे गरजेचे असते.
मद्य खरेदी करणाऱ्यांपैकी जवळपास ८० टक्के नागरिकांकडे परवाना (Liquor License) नसतो.
मद्यसेवनाचा परवाना काढणे म्हणजे स्वतःची प्रतिमा मलीन करणे, असे गैरसमज आहेत. त्यामुळे अनेकजण मद्य परवाना काढत नाहीत.
नागरिकांचा हा संकोच लक्षात घेता सरकारने २०१७ पासून मद्यसेवनाचा परवाना ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मद्यपान परवाना एका दिवसाचा (One Day License), एका वर्षाचा किंवा आयुष्यभराचा देखील असू शकतो.
मद्यपान परवाना मिळविण्यासाठी वैद्यकीय अहवालाची आवश्यकता असते, शरीराला मद्यसेवनाची गरज असल्याचा दाखला डॉक्टरांनी दिला असेल तरच, परवाना दिला जातो