Home / आरोग्य / डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय | Diabetes Home Remedies Marathi

डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय | Diabetes Home Remedies Marathi

"डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय – मेथी, कारले, दालचिनी, हळद"
डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय | Diabetes Home Remedies
डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय जाणून घ्या. मेथी, कारले, दालचिनी, कोरफड, लसूण यांसारखे नैसर्गिक उपाय रक्तातील साखर कमी करतात

डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय :-आजच्या धावपळीच्या आयुष्यात डायबेटीस (Diabetes) म्हणजे सर्वसामान्य आजार झाला आहे. भारतात तर याला “मधुमेहाची राजधानी” असंही म्हटलं जातं. आधी फक्त मोठ्यांना होणारा हा आजार आता तरुण पिढीतही झपाट्याने वाढतोय.

डॉक्टरांची औषधे, इन्सुलिन इंजेक्शन्स हे उपचार महत्वाचे आहेतच. पण त्याचबरोबर काही घरगुती उपाय (Home Remedies for Diabetes in Marathi) नियमित केल्यास रक्तातील साखर नैसर्गिक पद्धतीने नियंत्रित राहते.

मग चला, जाणून घेऊया डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय, आहार टिप्स, योगासनं आणि जीवनशैली बदल.

१. मेथी दाणे – डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय (Fenugreek Seeds for Diabetes)

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेथी दाणे ज्याला आपण इंग्लिश मध्ये “Fenugreek Seeds” म्हणतो हा सर्वात सोपा आणि पारंपरिक घरगुती उपाय आहे. आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा हा घटक रक्तातील साखरेवर थेट परिणाम करतो.

फायदे

  1. घुलनशील फायबर (Soluble Fiber) मेथी दाण्यात भरपूर प्रमाणात फायबर असते. हे शरीरातील कार्बोहायड्रेटचे शोषण मंदावते, त्यामुळे जेवल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
  2. टाइप २ मधुमेह नियंत्रण  अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की मेथी दाणे नियमित घेतल्यास टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांचे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
  3. इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते  मेथी दाणे शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव सुधारतात.

वापरण्याची पद्धत

  • रात्री एका ग्लास पाण्यात १ चमचा मेथी दाणे भिजवा.
  • सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या आणि दाणे खा.
  • सातत्याने २-३ महिने केल्यास चांगला परिणाम जाणवतो.
  • काही लोक मेथी दाण्याची पूड करून ती दुधात किंवा कोमट पाण्यातही घेतात.

प्रत्येकाची शारीरिक प्रकृती वेगळी असते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपाय सुरू करावा. नियमित रक्त तपासणी करून साखरेची पातळी तपासावी. जर औषधं किंवा इन्सुलिन सुरू असेल तर ते थांबवू नयेत. मेथी दाणे हे फक्त सहाय्यक उपाय आहेत.

२. कारले – डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय (Bitter Gourd for Diabetes Control)

कारले ही कडू भाजी असली तरी डायबेटीससाठी ती रामबाण घरगुती औषध मानली जाते. कारल्यामध्ये असलेले पोलिपेप्टाइड-P आणि चारंटिन हे घटक शरीरात नैसर्गिक इन्सुलिनसारखे कार्य करतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यात करेला थेट मदत करतो.

कारल्याचे डायबेटीसवरील फायदे

  1. इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतो – पोलिपेप्टाइड-P आणि चारंटिन हे घटक पेशींना इन्सुलिनसाठी अधिक प्रतिसाद देण्यास मदत करतात. यामुळे रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये नीट वापरला जातो.
  2. लिव्हर आणि पॅन्क्रियाजचे कार्य सुधारतो – करेला पचनक्रिया आणि इन्सुलिन स्राव वाढवतो, ज्यामुळे टाइप २ डायबेटीससाठी उपयुक्त ठरतो.
  3. डायबेटीसची लक्षणे कमी करतो – थकवा, प्यास, वारंवार लघवी यांसारखी लक्षणे नियमित करेला सेवनाने कमी होतात.
  4. वजन नियंत्रणात ठेवतो – करेल्यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स वजन कमी करण्यास मदत करतात.

वापरण्याची पद्धत

  • कारल्याचा रस:
  • सकाळी रिकाम्या पोटी ५०-६० मि.ली. ताजा करेल्याचा रस प्यावा.भाजी किंवा भजी:
  • आठवड्यातून २-३ वेळा कारल्याची  भाजी किंवा भजी खावी.
  • रस तयार करताना:
  • कारले नीट धुवा, तुकडे करा आणि थोडं पाणी घालून ग्राइंडरमध्ये फिरवा.

कारल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचनसंस्था मजबूत होते. काहींना कारल्याचा रस अतिशय कडू वाटतो. अशावेळी सुरुवातीला कमी प्रमाणात सुरू करावा आणि नंतर वाढवावा. कारले नियमित घेतल्यास इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते. आयुर्वेदात कारले हा मधुमेह नियंत्रणासाठी सिद्ध, नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय मानला जातो.

३. दालचिनी – डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय (Cinnamon for Diabetes)

दालचिनी ही केवळ मसाल्यांमधली सुवासिक घटकपदार्थ नाही तर ती मधुमेह नियंत्रणासाठी महत्त्वाचा नैसर्गिक उपाय आहे. संशोधनांनुसार, दालचिनी नियमित सेवन केल्यास इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण हळूहळू कमी होते.

हे ही वाचा:- योगा करण्याचे फायदे | Yoga Benefits in Marathi

दालचिनीचे डायबेटीसवरील फायदे

  • इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते

दालचिनी शरीराला इन्सुलिन योग्यरीत्या वापरण्यास मदत करते.

यामुळे ग्लुकोज पेशींमध्ये नीट शोषला जातो आणि रक्तातील साखर कमी होते.

जेवल्यानंतरची रक्तातील साखर कमी करते

दालचिनी कार्बोहायड्रेटचे पचन मंदावते, ज्यामुळे जेवल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढत नाही.

  • हृदयासाठी फायदेशीर

दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात.

डायबेटीस रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असल्याने हा गुणधर्म अतिशय उपयुक्त आहे.

  • वजन नियंत्रण

दालचिनी मेटाबॉलिझम सुधारते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

वजन नियंत्रण हे डायबेटीस व्यवस्थापनात महत्त्वाचे पाऊल आहे.

वापरण्याची पद्धत

  • दालचिनीचे पाणी एका ग्लास कोमट पाण्यात ½ चमचा दालचिनी पूड टाकून रोज सकाळी प्या.
  • दालचिनी चहा चहा करताना १-२ दालचिनीचे तुकडे घाला. हा चहा साखर न घालता पिणे सर्वोत्तम.
  • जेवण बनवताना वापर दालचिनीचा बारीक पूड उपमा, दलिया किंवा सूपमध्ये घालूनही वापरता येतो.

दालचिनीचे सेवन अति करू आरोग्यासाठी चांगले नाही दररोज १-२ ग्रॅम पुरेसे आहे. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी दालचिनीचा औषधी स्वरूपात वापर टाळावा. तसेच नियमित औषधं घेत असाल तर दालचिनी खाण्यापूर्वी  डॉक्टरांचा सल्ला घ्या.

४. कडूनिंबाची पाने – रक्त शुद्धीकरण व डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय (Neem Leaves for Diabetes)

कडूनिंब ही आयुर्वेदात रक्त शुद्ध करण्यासाठी आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे. तिची पाने नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून कार्य करतात.

डायबेटीस रुग्णांसाठी कडूनिंबाची पाने विशेष फायदेशीर आहेत कारण ती रक्तातील विषारी द्रव्ये काढून टाकतात, रक्त स्वच्छ ठेवतात आणि शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात.

कडूनिंबाची पाने – फायदे

  • रक्त शुद्धीकरण (Blood Purification)

कडूनिंबाची पाने रक्त शुद्ध करतात आणि त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.

हे डायबेटीस रुग्णांच्या पचनक्रियेवर आणि त्वचेवर चांगला परिणाम घडवते.

  • इन्सुलिन कार्यक्षमता सुधारते

नियमित सेवनाने शरीरातील इन्सुलिन नीट कार्य करू लागते.

त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण हळूहळू कमी होते.

  • प्रतिरोधक शक्ती वाढवते

कडूनिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

त्यामुळे शरीर आजारांविरोधात लढण्यास सक्षम होते.

  • डायबेटीसवरील सहाय्यक उपाय

नियमित सेवनाने थकवा, प्यास, वारंवार लघवी अशी लक्षणे कमी होण्यास मदत मिळते.

वापरण्याची पद्धत

  • थेट पाने खाणे रोज सकाळी रिकाम्या पोटी ५ ते ७ कडूनिंबाची पाने चावून खा.
  • कडूनिंबाचा रस पानांचा रस काढून १ चमचा प्या.
  • कडूनिंब पानाची पावडर कडूनिंबाची पाने वाळवून त्याच्या पानाची पावडर बनवली जाते. किवा आयुर्वेदिक दुकानात पावडर मिळते ती घेवून सेवेन करा. 

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी कडूनिंबाचा औषधी स्वरूपात वापर टाळावा. कडूनिंब हे फक्त सहाय्यक उपाय आहेत, औषधोपचारांची जागा घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अतिप्रमाणात सेवन करणे टाळा. नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या उपायांचा वापर करावा.

५. कोरफड रस – पचन सुधारण्यासाठी व डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय (Aloe Vera Juice for Diabetes

कोरफड ही केवळ त्वचेसाठी किंवा केसांसाठी उपयुक्त नाही, तर तिचा रस डायबेटीससाठी देखील फायदेशीर ठरतो. पचन सुधारण्यासाठी, शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरफड रस प्रभावी उपाय मानला जातो.

कोरफडीचे डायबेटीसवरील फायदे

  • पचन सुधारते

कोरफड रसामुळे पचनक्रिया नीट होते आणि पोटातील अडथळे कमी होतात.

योग्य पचनामुळे कार्बोहायड्रेट्स नीट शोषले जातात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढत नाही.

  • इन्सुलिन रेग्युलेशन सुधारते

कोरफड रसामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात.

यामुळे पॅन्क्रियाजचं कार्य सुधारून इन्सुलिन नीट कार्य करते.

  • रक्तातील साखर कमी होते

संशोधनानुसार, नियमित कोरफड रस सेवन केल्याने टाइप २ डायबेटीस रुग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहते.

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

कोरफड रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात जी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.

वापरण्याची पद्धत

  • रोज सकाळी ३० मि.ली. कोरफड रस घ्यावा.
  • तो कोमट पाण्यासोबत मिसळून पिणे सर्वोत्तम.
  • नियमित सेवन केल्यास काही आठवड्यांत सकारात्मक बदल जाणवतात.

कोरफड रसाचे अति सेवन करू नये; यामुळे पोटदुखी किंवा जुलाब होऊ शकतात. औषधे घेत असाल (विशेषतः डायबेटीस किंवा रक्तदाबासाठी), तर कोरफड रस सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी कोरफड रस औषधी स्वरूपात घेणे टाळावे.

६.  लसूण – रक्तदाब नियंत्रणासाठी व डायबेटीस नियंत्रण घरगुती उपायप्रभावी उपाय (Garlic for Diabetes)

लसूण ही आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाची आणि सहज उपलब्ध होणारी औषधीदृष्ट्या उपयुक्त गोष्ट आहे. यामध्ये असलेले सल्फर कंपाऊंड्स शरीरातील रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात मदत करतात. त्यामुळे डायबेटीस रुग्णांसाठी लसूण हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय ठरतो.

लसणाचे डायबेटीसवरील फायदे

  • रक्तातील साखर नियंत्रण

लसूण रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्यात मदत करतो.

इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवून रक्तातील साखर संतुलित ठेवतो.

  • हृदयाचे आरोग्य सुधारतो

डायबेटीस रुग्णांमध्ये हृयविकाराचा धोका जास्त असतो.

लसूण नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयाची कार्यक्षमता सुधारते.

  • रक्तदाब नियंत्रण

लसूणमधील घटक रक्तवाहिन्या रिलॅक्स करतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.

त्यामुळे डायबेटीससह असलेला हायपरटेन्शनचा धोका कमी होतो.

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो

लसूणमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

वापरण्याची पद्धत

  • दररोज सकाळी रिकाम्या पोटी २-३ लसणाच्या पाकळ्या खाव्यात.
  • सुरुवातीला कच्चा लसूण खायला अवघड वाटल्यास तो बारीक कुटून कोमट पाण्यासोबत घ्यावा.
  • आहारात लसूणाची नियमित भर घालणे (भाजी, सूप, डाळ) देखील फायदेशीर ठरते.

लसूणाचे अति सेवन टाळा; यामुळे पोटदुखी किंवा अ‍ॅसिडिटी होऊ शकते. जर तुम्ही ब्लड थिनिंग औषधे (उदा. Aspirin, Warfarin) घेत असाल तर लसूण नियमित सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जास्त लसुणाचे सेवेन केले तर शरीरात शीतपित्त तयार होते. गर्भवती महिलांनी आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी लसूण औषधी स्वरूपात जास्त प्रमाणात घेऊ नये.

७. हळद – इन्सुलिन कार्यक्षमता वाढवणारा डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय (Turmeric for Diabetes Control)

हळद ही भारतीय स्वयंपाकातील आणि सहज उपलब्ध होणारी आयुर्वेदातील सर्वात महत्वाची औषधी वनस्पती आहे. तिचा वापर केवळ मसाल्यांमध्येच नाही तर औषधी गुणधर्मांसाठीही केला जातो. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन हे घटक नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी म्हणून कार्य करतात.

डायबेटीससाठी हळद उपयुक्त आहे कारण ती शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवते, ज्यामुळे रक्तातील साखर योग्य प्रमाणात नियंत्रणात राहते.

 

हे ही वाचा – सीताफळाचे आरोग्यावर अद्भुत फायदे | सीताफळाच्या पानांचे औषधी उपयोग

 

हळदीचे डायबेटीसवरील फायदे

  • इन्सुलिन कार्यक्षमता वाढवते

हळदीमुळे शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देतात.

त्यामुळे रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये शोषले जाते आणि रक्तातील साखर कमी होते.

  • अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म

डायबेटीस रुग्णांमध्ये शरीरात सूज वाढण्याचा धोका असतो.

हळद ही सूज कमी करून पॅन्क्रियाजच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते.

  • हृदयासाठी फायदेशीर

हळदीमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि रक्त शुद्ध राहते.

डायबेटीस रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

हळदीमुळे शरीरातील प्रतिकारशक्ती मजबूत होते, ज्यामुळे इतर संसर्गापासून बचाव होतो.

वापरण्याची पद्धत

  • एका ग्लास कोमट दुधात ½ चमचा हळद टाकून रात्री झोपण्यापूर्वी प्या.
  • ज्यांना दूध चालत नाही त्यांनी कोमट पाण्यात हळद मिसळून पिऊ शकतात.
  • हळदीचा वापर भाजी, डाळ, सूप, कढी इत्यादी पदार्थांमध्येही करता येतो.

हळदीचे अति सेवन करू नये; यामुळे पोटात जळजळ किंवा अ‍ॅसिडिटी होऊ शकते. जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर हळदीचे औषधी स्वरूपात सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भवती महिलांनी जास्त प्रमाणात हळदीचे सेवन टाळावे.

हे ही वाचा – बदलत्या वातावरणात सर्दी, खोकला आणि ताप टाळण्यासाठी घरगुती उपाय | नैसर्गिक आरोग्य टिप्स

हे ही वाचा – 3 लवंगमध्ये रांजणवाडी कमी करण्याचा सोपा घरगुती उपाय | डोळ्यांची सूज आणि जळजळ थांबवा

 

८. व्यायाम आणि योगा – डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय (Yoga & Exercise for Diabetes)

घरगुती उपायांबरोबरच नियमित व्यायाम आणि योगासनं अत्यंत आवश्यक आहेत.

दररोज ३०-४० मिनिटं चालणे.

सायकलिंग, हलका व्यायाम, पोहणे यामुळे साखरेचे प्रमाण कमी होते.

डायबेटीससाठी उपयुक्त योगासनं:

  1. मंडुकासन
  2. कपालभाती प्राणायाम
  3. अनुलोम-विलोम
  4. भुजंगासन
९. डायबेटीस आहार चार्ट – डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय  (Diabetes Diet in Marathi)

डायबेटीस असलेल्या व्यक्तीने आहारावर विशेष लक्ष द्यायला हवे.

  • खायचे पदार्थ:

पालेभाज्या, Whole Grains, डाळी

सफरचंद, पेरू, जांभूळ, पपई

ओट्स, ब्राउन राईस

कडधान्ये

  • टाळायचे पदार्थ:

साखर, मैदा, पांढरी ब्रेड

तूपकट, तळलेले पदार्थ

थंड पेये, पॅकेज्ड ज्यूस

बिस्किटे, मिठाई

१०. झोप आणि ताण नियंत्रण – डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय (Sleep & Stress for Diabetes Control)

आजच्या धकाधकीच्या जीवनात झोपेला खूप कमी महत्त्व दिले जाते. कमी झोपेमुळे रक्तातील साखर वाढते. ताणामुळे शरीरात कॉर्टिसोल हार्मोन वाढतो, ज्यामुळे डायबेटीस वाढतो.

  • उपाय:

रोज ७-८ तास झोप घेणे आवश्यक.

ध्यान, प्राणायाम, फिरणे यामुळे ताण कमी होतो.

निष्कर्ष

हे सर्व डायबेटीस नियंत्रण घरगुती उपाय तुम्हाला रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत करतील.” डायबेटीस हा आजार आयुष्यभर साथ देतो, पण योग्य आहार, जीवनशैली आणि घरगुती उपायांनी आपण तो सहज नियंत्रणात ठेवू शकतो.

घरगुती उपाय हे फक्त सहाय्यक आहेत, औषधोपचारांची जागा घेऊ शकत नाहीत. नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

FAQ Section (Frequently Asked Questions)

१. डायबेटीस पूर्णपणे बरा होतो का?

➡️ नाही, पण योग्य आहार, व्यायाम आणि घरगुती उपायांमुळे नियंत्रणात ठेवता येतो.

२. मेथी दाणे किती दिवस घ्यावेत?

➡️ दररोज सकाळी १ चमचा मेथी दाणे घेणे सुरक्षित आहे.

३. कारल्याचा रस कधी घ्यावा?

➡️ सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास जास्त फायदा होतो.

४. आहारात काय टाळावे?

➡️ साखर, पांढरी ब्रेड, मैदा, तळलेले पदार्थ, थंड पेये टाळा.

५. घरगुती उपाय केल्याने औषधे बंद करता येतील का?

➡️ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे थांबवू नयेत. घरगुती उपाय फक्त सहाय्यक आहेत.

=============================================================================================

🌸 माहिती In मराठी 🌸

Follow करा आणि नेहमी अपडेट राहा!

🌐 Website 👉 https://www.mahitiinmarathi.in

💬 WhatsApp Channel 👉 https://whatsapp.com/channel/0029Val2tuCJuyAB49GXhp14

📘 Facebook 👉 https://www.facebook.com/profile.php?id=61573551054721

📸 Instagram 👉 https://www.instagram.com/mahitiinm

🧵 Threads 👉 https://www.threads.net/@mahitiinm

📢 Telegram 👉 https://t.me/+8748TkxWbp85YzVl

📧 Email 👉 mahitiinm@gmail.com

#माहितीInमराठी #MahitiInMarathi #FollowUs #SocialMedia #MarathiNews #StayUpdated

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!