राज्यातील वीज दर कपातीचा ऐतिहासिक निर्णय – सर्वसामान्यांना मोठा दिलासा!
महाराष्ट्र वीज ग्राहकांसाठी ऐतिहासिक दिलासा
राज्यभरातल्या वीज ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने वीज दरात ऐतिहासिक कपात जाहीर केली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना महागड्या वीज बिलांपासून मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, हे दर कमी होणे टप्प्याटप्प्याने पुढील पाच वर्षांमध्ये तब्बल 26% पर्यंत असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सोशल मिडियावरून या निर्णयाची माहिती दिली. वीज दर कपातीचा फायदा घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना मिळणार आहे.
महावितरणचा प्रस्ताव आणि नियामक आयोगाचा निर्णय
महावितरण कंपनीने वीज दर कपातीसाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. यावर आयोगाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, पुढील पाच वर्षांमध्ये सर्वच वर्गातील ग्राहकांच्या वीज दरात कपात करण्यात येणार आहे.
याआधी राज्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्व स्तरांवरील वीज दरात कपात झालेली नव्हती. त्यामुळे हा निर्णय सर्वांसाठी ऐतिहासिक ठरत आहे.
वीज दर कपातीचा टप्प्याटप्प्याने फायदा कसा मिळणार?
राज्यात वीज दर कपात 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहे. पुढीलप्रमाणे दर टप्पे निश्चित करण्यात आले आहेत:
-
0 ते 100 युनिट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी
- सध्याचा दर: 6.32 रुपये प्रति युनिट
- 1 जुलैपासून: 5.74 रुपये प्रति युनिट
- 2029-30 पर्यंत अंतिम दर: 4.34 रुपये प्रति युनिट
70% ग्राहक या श्रेणीत येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
-
101 ते 300 युनिट वापरणाऱ्यांसाठी
- सध्याचा दर: 12.23 रुपये प्रति युनिट
- 1 जुलैपासून: 12.57 रुपये प्रति युनिट (थोडी वाढ)
- 2029-30 पर्यंत अंतिम दर: 12.15 रुपये प्रति युनिट
पहिल्या वर्षी थोडी वाढ होणार असली तरी नंतर दर कपात होणार आहे.
-
301 ते 500 युनिट वापरणाऱ्यांसाठी
- सध्याचा दर: 16.77 रुपये प्रति युनिट
- 1 जुलैपासून: 16.85 रुपये प्रति युनिट
- 2029-30 पर्यंत अंतिम दर: 14.61 रुपये प्रति युनिट
-
500 युनिट पेक्षा जास्त वापरणाऱ्यांसाठी
- सध्याचा दर: 18.93 रुपये प्रति युनिट
- 1 जुलैपासून: 19.15 रुपये प्रति युनिट
- 2029-30 पर्यंत अंतिम दर: 18.20 रुपये प्रति युनिट
(अधिक…)