पेट्रोल पंपावर ग्राहकांचे अधिकार आणि सुविधा

पेट्रोल पंपावर ग्राहकांचे अधिकार आणि सुविधा:-


आज आपल्या प्रत्येकाकडे स्वताच्या मालकीचे वाहन असते. वाहनधारकांना इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल, ल पी जी किवा सी न जी गॅस भरण्यासाठी जावे लागते. तेव्हा आपल्याला काही सुविधा अधिकार आपोआप प्राप्त होतात. एखाद्या पेट्रोल पंपावर जर या सुविधा उपलब्ध नसतील तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता, आणि ते जर नसेल तर त्या पेट्रोलपंपाच लायसन्स देखील रद्द होऊ शकत. त्या सेवा जागरूक ग्राहक जागरूक वाहनधारक म्हणून आपणास माहीत असायलाच हव्यात कोणती आहेत अशा ग्राहकांची विशेष अधिकार आपण पाहूया.

पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांची घनता तपासण्याचा अधिकार –

आपल्यास इंधनाची घनता तपासण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर घनता तपासण्यासाठी 500 एम एल सिलिंडर असेल जो नोजल च्या सहाय्याने सुमारे उंचीवर भरला जातो. या बीकरमध्ये एएसटीएम नावाचे एक साधन बुडविले गेले आहे, जे उत्पादनाचे तपमान आणि घनतेचे वाचन करते. या वाचनाची नोंद रजिस्टर मध्ये नमूद केलेल्याशी केली पाहिजे. हे नोंदणी संदर्भ म्हणून कार्य करते आणि सर्व पेट्रोल पंपांवर उपलब्ध असेल. इन्स्ट्रुमेंट आणि रजिस्टरवर दाखवलेली वाचन सारखीच असावी.

आग विझवण्यासाठी लागणारी उपकरणे –

आग विझवण्यासाठी लागणारे उपकरण पंपावर उपलब्ध असणं बंधनकारक आहे. अग्निशामक यंत्र आणि वाळूच्या बादल्या, पाणी जवळ सलेल्या अग्निशामक ऑफिसचा टोल फ्री नंबर इत्यादि गोष्ठी. प्रत्येक पेट्रोल पंपावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गोष्टी उपलब्ध असणं अनिवार्य आहे नसल्यास तुम्ही तक्रार करू शकता.

पेट्रोल आणि डिझेलची गुणवत्ता व प्रमाण तपासण्याचे अधिकार तपासण्याचा अधिकार-

पेट्रोल पंपवर पेट्रोल आणि डिझेलची गुणवत्ता तपासण्याचा आपल्याला सर्व अधिकार आहे. आपण देय असलेल्या पैशासाठी आपल्याला इंधनाची योग्य गुणवत्ता मिळत आहे की नाही हे जाणून घेण्याचे आपण पात्र आहात. जर आपल्याला पेट्रोल पंपांवर गुणवत्ता तपासण्याची परवानगी नसेल तर आपण त्यांच्या रजिस्टरमध्ये तक्रार नोंदवू शकता किंवा पीजी पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता

मोफत पिण्याची पाण्याची सुविधा

पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे पंप मालकाचं कर्तव्य आहे. पेट्रोल डिझेल व गॅस भरण्यासाठी आलेले ग्राहक पिण्याच्या पाण्याची मागणी करू शकतात. पिण्याचं पाणी मोफत उपलब्ध करुन देणं पंप मालकाची जबाबदारी आहे. यासाठी पेट्रोल पंपवर आरओ, फ्रिजर फ्रिजकिंवा वॉटर प्युरिफायर ठेवावेत जर आपणास पेट्रोलपंपावर पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळाली नाही तर तुम्ही तक्रार करू शकता.

मोफत प्रथमोपचार कीट बॉक्स –

मोफत प्रथमोपचार कीट प्रत्येक पेट्रोल पंपावर उपलब्ध असणं बंधनकारक आहे. मोफत प्रथमोपचार कीटमध्ये प्राथमिक उपचारासाठीची काही औषधं, उपकरणं यांचा समावेश असतो. रस्त्यावर कोणताही अपघात घडल्यास रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी या औषधांचा उपयोग होऊ शकतो. पेट्रोलपंपावर प्रथमोपचार पेटी न दिल्यास तर तुम्ही तक्रार करू शकता.

मोफत हवा भरणे चेक करणे –

मोफत हवा भरणे व चेक करणे ही सुविधा प्रत्येक पेट्रोल पंपावर असणे गरजेचे आहे. वाहनात मोफत हवा भरण्यासाठी मशीन आणि एक कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहे. आपण पहातो की पंपाच्या बाहेरील मार्गावर एका कोपऱ्यात मशीन असते. आपण वाहनांच्या टायरमध्ये मोफत हवा भरू शकतो. ही सुविधा वाहनचालकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा नियम आहे, हया साठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही आकारलयास तुम्ही तक्रार करू शकता.

डिझेल व पेट्रोल ची किंमत जाणून घेण्याचा अधिकार –

डिझेल , पेट्रोल व ओईल च्या किंमती जाणून घेणेचा अधिकार आपल्आयाला आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर मोठ्या अक्षरात इंधनाच्या (डिझेल व पेट्रोल) किंमती लिहलेल्या असल्या पाहिजेत जर नसेल तर तुम्ही तक्रार करू शकता. 

बिल मागण्याचा अधिकार –

पेट्रोल पंपावर आपल्याला  बिल मागण्याचा अधिकार आहे. खरेदी केलेल्या इंधनाची बिले विचारण्याचा अधिकार आपल्आयाला आहे. या बिलमध्ये आपण भरलेल्या रकमेची आणि करांची माहिती आहे. जर पेट्रोल पंप बिल देत नसेल तर आपण तक्रार दाखल करू शकता

मोफत शौचालय सुविधा –

पेट्रोल पंपावर शौचालयाची सुविधा असणे आवश्यक  आहे. ही सुविधा  मोफत असावी यासाठी कोणतंही फी आकारलेली नसवी.  पंप चालकाने काळजी घेणं बंधनकारक आहे. यासोबत पेट्रोल पंपावरील शौचालयं स्वच्छ आणि सुयोग्य असावीत. यात कोणत्याही प्रकारची अडचण ग्राहकांना येत असेल तर त्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे. 

मोफत फोन कॉल सुविधा –

पेट्रोल पंपावर मोफत फोन कॉल सुविधा असते कधी कधी मोबाईलच्या नेटवर्क समस्येमुळे आपत्कालिन परिस्थितीत, कुणाला फोन करायचा असेल तर पेट्रोल पंपावर टेलिफोनची व्यवस्था असवीं  नसल्यास क्रार करण्याचा अधिकार आहे. 

तक्रार रजिस्टर आणि तक्रार पेटी –

पेट्रोल पंपावर तक्रार रजिस्टर व तक्रार पेटी असणे  बंधनकारक आहे.  जर ग्राहक तिथे असलेल्या सेवा व सुविधा बद्दल खुश नसेल पेट्रोल पंपावर किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दखल घेतली नाही  तर तक्रार करण्यासाठी तक्रार पेटी असणे आवश्यक आहे. 

सरकारकडे पुढील मेल व नंबर द्वारे तक्रार करू शकता  dyclmkokan@yahoo.in dclmms_complaints@yahoo.com 022 22622022, 022 22886666 What’s up No.9869691666

 

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved