ग्रामीण भागामध्ये चालणारे १० व्यवसाय
आपल्या देशातील ७०% लोक ग्रामीण भागामध्ये राहतात, गावातील बहुतेक लोक मोलमजुरी करून आपला उदर निर्वाह करत असतात. अनेकदा लोकांना असे वाटते की हा व्यवसाय फक्त शहरातच होऊ शकतो. पण आज तसं नाहीये, छोट्या गावातही तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करू शकता. गावात राहून पैसे कमवण्याच्या काही उत्तम व्यवसाय बद्दल तसेच कमी भांडवलात तुमचा गावामध्ये उद्योग उभारता येतील ते आपण पाहू.
किराणा दुकान –
किराणा मालाची दुकाने ग्रामीण भागा पासून ते मोठ्या शहरापर्यंत दिसतात. या व्यवसायाची मागणी कधीच कमी होत नाही, कारण तो चांगल्या प्रकारे चालवल्यास दररोज चांगला नफा मिळू शकतो. तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी थोडे फार पैसे असतील, तर ग्रामीण भागात किराणा मालाचे दुकान चालू करू शकता किराणा दुकान ही गावात चालणाऱ्या व्यवसायातील सर्वोत्तम व्यवसाय पद्धत आहे. अनेकजण आपल्या गरजेच्या छोट्या छोट्या वस्तू बाजारात न जाता जवळच्या किराणा दुकानातच विकत घेतात. देशातील कोणत्याही नागरिकाला विविध वस्तूंची गरज असते, त्या या दुकानातून मिळू शकतात. किराणा दुकानात नफा खूप असतो आणि ह्या व्यवसायाला कधीच अंत नाही म्हणून हा व्यवसाय जेवढा योजना बनवून आयडिया लावून कराल तेवढाच तुम्हाला जास्त फायदा आहे. पण हा व्यवसाय करताना बारीक बारीक गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे. ग्रामीण भागात कोरना काळात लोकांना गरजेच्या आणि अति आवशयक वस्तूचा पुरवठा हया किराणा विक्रतेनी केला आहे. कोणतही online shop तेव्हा चालू न्हवते त्यामूळे लोकचा खरेदी करण्यची मानसिकता बदलत चाली आहे आता ग्रामीण भागात लोक किराणा दुकानतून खरेदी करतात. कोणीही किराणा दुकान उघडू शकतो, यासाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला अकाउंटिंगसाठी मूलभूत गणिते माहित असणे आवश्यक आहे. किराणा दुकान उघडत असाल तर सुरुवातीला १ लाख ते १.५ लाख खर्चून तुम्ही महिन्याला किमान २०,०००/- ते ३०,०००/- कमवू शकता.
पापड बनवण्याचा व्यवसाय –
सर्वच वयोगटातील लोकांना हा पदार्थ खायला आवडतो. त्यामुळे बाजारात त्याची मागणीही जास्त आहे. खरंतर आजच्या व्यस्त काळात लोकांकडे स्वतःसाठी घरी पापड बनवायला पुरेसा वेळ नसतो, म्हणून ते रेडिमेड पापड खरेदी करतात. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या मागणीमुळे दुकानदार मोठ्या प्रमाणात पापड खरेदी करतात. याशिवाय काही लोक घरबसल्या हा व्यवसाय करून विविध प्रकारचे पापड बनवून थेट ग्राहकांना विकतात. या व्यवसायाची बाजारात जास्त मागणी आहे, जर तुम्ही देखील हा व्यवसाय केला तर तुम्ही यापेक्षा खूप जास्त कमवू शकता. पापड व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. कोणत्याही शहरात किंवा गावात कोणतेही दुकान घेण्याची गरज नाही कारण तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरातून सुरू करू शकता. तुम्हीही जर योग्य प्रसिद्धी केली तर तुमचा पापड लवकरच एक ब्रँड म्हणून उदयास येईल. तुम्हाला मार्केटिंग करायचे असेल, तर त्यासाठी बॅनर, टेम्प्लेट, जाहिरात बनवणे किंवा सोशल साइटवर जाहिरात मिळवणे, याचा खर्च ३०००/- ते ५०००/- पर्यंत येते. व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान २०,०००/- ते ३०,०००/- रुपये लागतील आणि तुम्ही हा व्यवसाय आरामात सुरू करू शकता.
हळद पावडरचा व्यवसाय –
हळद पावडरचा वापर हजारो वर्षांपासून केला जात आहे. हळद ही आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. आपल्याकडे खाद्य पदार्थांमध्ये हळद वापरली जाते. त्यामुळे हळद पावडरचा व्यवसाय हा पैसा मिळवण्याचा सोपा मार्ग ठरू शकतो. हळदीची नेहमीच आपल्या स्वयंपाक घरात गरज भासणार असल्याने तुम्ही हळद पावडरचा व्यवसाय सुरू करू शकता. ज्यामुळे तुम्ही जास्त नफा मिळवू शकता. तुम्हाला एकतर कच्ची हळद विकत घेवु शकता किंवा आपल्या शेतात उगवू शकता.
एक किलो हळकुंडापासून सुमारे 950 ग्रॅम हळद पावडर मिळते. हळकुंड किंमत, कांडप, पॅकिंग, लेबल आदी धरून एक किलो पावडरनिर्मितीसाठी 89 रुपये खर्च होतो.
राज्यात ठिकठिकाणी भरणाऱ्या कृषी प्रदर्शनांसह धान्य महोत्सवांच्या माध्यमातून आपल्या आपल्या उत्पादनांची विक्री करता येते. हळद पावडर विक्रीतून चांगले अर्थार्जन होते. तुम्ही हळद पावडर परदेशात देखील विकू शकता. तुम्हाला फक्त आवश्यक परवाने आणि नोंदणी करावी लागेल
लग्न समारंभ हॉल –
आज आपण पाहतो लग्न समारंभ, साखर पुडा किवा लहान मुलाचा बारस, वाढ दिवस, सरकारी नोकरीची निवृत्ती, राजकीय किवा सामाजिक इत्यादी कार्यक्रमना मोठ्या हॉलची गरज असते. हे सर्व कार्यक्रम ग्रामीण भागात असतील तर हॉलची गरज भासते, हॉल कोणत्याही कार्यक्रमना भाड्याने १ किवा २ दिवस दिला तर चांगले उत्पन्न मिळो शकते. हया मध्ये एकदाच मोठी गुंतुणूक आहे नंतर परत भाड्यातून चांगले अर्थार्जन होते.
कपड्याचे दुकान-
कपड्यांचा व्यवसाय हा सर्वात फायदेशीर व्यवसाय आहे तो ग्रामीण भागात खूप चांगल्या रित्या चालू ही शकतो कारण यात नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते आणि खूप कमी गुंतवणुकीतून तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. सुरत मध्ये कपड्याची खूप मोठी बाजारपेठ आहे आज देशातील प्रत्येक व्यापारी हा सुरत मधुन कापड खरीदी करून स्वतःचा व्यवसाय चालवत आहे. कपड्यांचा व्यवसाय करण्यासाठी जे प्रश्न येतात त्यातील एक म्हणजे कि कापड कोठून खरीदी करावा कारण जर आपल्याला कापड हा स्वस्त दारात मिळेल तरच आपण त्यामधून आपला नफा मिळवू शकतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांच्या पैकी आपण सर्वात जास्त खर्च करतो तो अर्थातच खाण्यापिण्यावर आणि त्यानंतर नंबर लागतो तो कपड्यांचा. आणि प्रचंड मोठ्या लोकसंख्येमुळे ग्राहकांची सुद्धा काहीच कमी नाही. आणि सध्याचा काळ हा रेडिमेड कपड्यांचा आहे असे म्हणता येईल. कारण य शिंप्यां कडून कपडे शिवून घेण्याचे प्रमाण बरेच कमी झालेले आहे.
जवजवळ ५० ते ७० % नफा असतो काही कपड्यांमध्ये, व्यापाऱ्यांकडून काही वेळेस १ ते १.५ महिन्यांच्या उधारी वर माल मिळतो, गिर्हाईकाने मोल भाव केला तरी पुरेसे मार्जिन सुटते, फॅशन कधीही समाप्त होत नाही त्यामुळे कपडे खरेदी चालूच राहते, दसरा / दिवाळी ला जोरदार उलाढाल होते.
लोणचे बनवणे –
लोणचे म्हटले म्हणजे स्वयंपाक घरात असणारे व जेवणासोबत सगळेजण मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणारा पदार्थ आहे हे आपल्याला माहिती आहे. लोणचे म्हटल्यावर कस तोंडाला पाणी सुटते ना, जेवणाच्या ताटात लोणचे खूप महत्वाचे आहे. लोणच्याशिवाय ताटातील अन्न अपूर्ण वाटते. लोणचे हे बाराही महिने बाजारपेठेत चांगल्या पद्धतीने विकले जाते. त्यामुळे बाराही महिने चांगली मागणी असणारा हा व्यवसाय असून लोणचे तयार करून विकणे या माध्यमातून महिन्याला ३५,०००/- पर्यंत उत्पन्न मिळवू शकता. केवळ अन्नच नाही तर ते तुमच्या उत्पन्नातही भर घालू शकते. बाजारात असलेली नेमकी मागणी, लोणच्याची आकर्षक पॅकिंग आणि बाजारपेठेतील विक्री या गोष्टीवर बारकाईने लक्ष दिले तर तुमच्या नफ्याचे गणित हे कायम बदलत राहाते. तयार लोणचे व्यवस्थित प्रकारे स्टोरेज केले तर जास्त काळ टिकते नफ्या मध्ये वाढ पण होते आणि लोणचे हे थेट खाण्याशी संबंधीत असल्यामुळे त्यामध्ये खूप जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे त्यमुळे ते खराब होवू नये म्हणून काळजी घेणे आवशयक आहे.
यासाठी तुम्ही तयार केलेल्या लोणच्याची कॉलिटी, त्याची पॅकिंग आणि शक्य असेल तर त्यामध्ये विविधता ठेवणे फार आवश्यक आहे.
व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तयार केलेल्या लोणच्याची कॉलिटी, त्याची पॅकिंग आणि शक्य असेल तर त्यामध्ये विविधता ठेवणे फार आवश्यक आहे. सुरवातीला व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरू करावा व बाजारपेठेतील माहिती घेवून आवश्यक तो बदल करून घ्यावेत.
सीएससी (CSC) सेंटर –
कॉमन सर्व्हिस सेंटर्समुळे सरकारी योजना किंवा इतर कामांसाठी प्रत्येकवेळी सरकारी कार्यालयात धाव घ्यावी लागत नाही. CSC मध्ये शेती, आरोग्य, शिक्षण, बँकिंग आणि आर्थिक सेवा इत्यादी कामे होऊ शकतात. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानातंर्गत देशभरात कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) उघडण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये बँकिंग आणि डिजिटल सुविधा पुरवण्याच्यादृष्टीने ही कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु केली जात आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. डिजिटल इंडिया अभियानंतर्गत आतापर्यंत देशभरात 4 लाखांहून अधिक CSC सेंटर उघडली गेली आहेत. या कॉमन सर्व्हिस सेंटर्समुळे सरकारी योजना किंवा इतर कामांसाठी प्रत्येकवेळी सरकारी कार्यालयात धाव घ्यावी लागत नाही. CSC मध्ये शेती, आरोग्य, शिक्षण, बँकिंग आणि आर्थिक सेवा इत्यादी कामे होऊ शकतात. या केंद्रांवर जन्माचा दाखला, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची सुविधा उपलब्ध असते. तुम्ही केवळ दहावी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला संगणकाचे ज्ञान असेल तर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु करु शकता.
ब्युटी पार्लर
महिला ब्युटी पार्लरचा कोर्स करून हा व्यवसाय सुरू करू शकतात. त्यासाठी तुम्ही ब्युटी पार्लरचा शॉर्ट टर्म कोर्स करू शकतो, सध्या ग्रामीण भागामध्ये ब्युटी पार्लर व्यवसाय ला खूप मागणी आहे. तसेच लग्न कार्यामध्ये ब्युटिशनची खूप मागणी असते. हा व्यवसाय तुम्हाला महिन्याला 30 ते 50 हजार रुपये कमवून देऊ शकतो.
डेरी फार्म दुधाचा व्यवसाय
डेरी फार्म सुरू करण्याचा विचार करत असाल तर या आधी तुम्ही डेरी फार्म विषयी डिटेल्स मध्ये अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. डेरी फार्म व्यवसायामध्ये नफा खूप जास्त असतो. डेरी फार्म सारख्या व्यवसायाला सरकार देखील अनुदान देत असते. त्यामुळे गावामध्ये डेअरी फार्म व्यवसाय सुरू करणे हा एक फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो. गावातील प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोन म्हशी किवा गायी असतात. तुम्ही स्वतःचा दूध व्यवसाय देखील चालू करू शकता. दूध व्यवसाय मध्ये मार्जिन जास्त असल्यामुळे हा एक प्रॉफिटेबल बिजनेस ठरू शकतो. पण या व्यवसायामध्ये जोखीम देखील असू शकते. हा व्यवसाय करणे थोडासा खर्चिक असल्यामुळे तुम्ही सरकारी अनुदानाचा लाभ घेऊ शकता.
भाजीपाला विक्री
भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ग्रामीण भागात अति उत्तम आहे. ग्रामीण भागामध्ये सर्व शेती करत असल्यामुळे गावांमध्ये भाजीपाला किमी दारात मिळतो व वाहतूक खर्च ही होत नाही भानजी पाला ताजा मिळतो. भाजीपाला विकणे हे अत्यंत फायद्याचे ठरू शकते. भाजीपाला व्यवसायातून शेतकरी आपल्या मनाप्रमाणे भाजीपाला ग्राहकांना विकू शकतो या व्यवसायामध्ये कोणाही मध्येस्थि नसतो त्यामुळे सर्व प्रॉफिट हा तुमचा असतो. ग्रामीण भागात भाजीपाला बाजार भारतातील फार कमी गावांमध्ये आढळतो, व भाजी घेण्यासाठी लोक आठवडा बाजारातून भाजी खरेदी करतात. काहीवेळा लोकांना भाजी घेण्यासाठी दूरवर शहरात जावे लागते. तुम्ही आपल्या शेतात विविध प्रकारची पालेभाजी व फळभाजी पिकवू शकता व त्यांना बाजारात किंवा गावागावात घरोघरी भाजीपाला विकू शकता तर या व्यवसायातही खूप फायदा होईल.
पिठाच्या गिरणीचा व्यवसाय –
भारतातील जवळपास सर्वच खेड्यांमध्ये शेती केली जाते, परंतु पिठाच्या गिरण्या खेड्यात क्वचितच आढळतात. जर तुम्ही पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरू केला तर ते खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण गावात सकाळी नाश्त्याला व रात्री जेवणात भाकरी हमखास असतेच. व गावात लोक बाजारात पीठ विकत न घेता गिरणीवरच दळतात, म्हणून हा व्यवसाय तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल.
जर तुम्ही पिठाच्या गिरणीचे मशीन घेतले तर त्याची किंमत 30 – 40 हजार आहे आणि वीज आणि परवाना आवश्यक आहे. तुम्ही पिठाच्या गिरणीने तांदूळ, नाचणी, बाजरी, गहू इ. चे पीठ तयार करू शकता, यामुळे तुम्हाला महिन्याला 20 ते 30 हजार रुपये सहज मिळतील.