
घरगुती सोलर पॅनल (सौर ऊर्जा)
राज्य सरकारने अपारंपरिक उर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत राज्य सरकारचा उर्जा विभाग सौर ऊर्जा निर्मितीसाठी घरावर सोलर पॅनल बसवण्याची योजना चालू केली आहे. या योजनेची माहिती घेऊयात.
देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडी कोळसा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे. त्यामुळे पारंपरिक वीज निर्मिती साधने अपुरी पडत आहेत भविष्यात विजेच्या संकटाना सामोरे जावे लागणार आहे. या साठी ऊर्जा मंत्रालयाने घरगुती सोलर पॅनल (सौर ऊर्जा) योजना राबविण्याचा विचार केला आहे.
घरगुती सोलर पॅनल (सौर ऊर्जा) योजने अंतर्गत घरगुती, गृहनिर्माण संस्था, सोसायट्या व निवासी कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा (सोलर पॅनल) बसविण्यात येणार आहे त्यासाठी शासनाकडून ४०% अनुदान दिले जाणार आहे. समजा घराच्या छतावर 2 किलोवॅट सोलर पॅनल बसवले. त्यासाठी आपल्यला १ लाख २० हजार रुपयांचा खर्च येतो. त्यातील ४०% खर्च म्हणजे सरकारकडून ४८ हजार रुपये सबसिडीच्या स्वरुपात तुम्हाला परत मिळतो. केवळ ७२ हजार रुपयांमध्ये तुम्ही सौरउर्जा निर्मिती करून वापरू शकता. यातून तुम्हाला सुमारे पुढील 25 वर्ष अक्षय्य उर्जेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी तुम्हाला राज्य सरकारच्या वीजवितरण विभागाकडे अर्ज करावा लागेल. या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल तसेच जास्तीची वीज नेट मीटरिंगद्वारे महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकांना आर्थिक मदत फायदा होईल.
घरगुती सोलर पॅनल (सौर ऊर्जा) योजनेचे नियम?
- 3kwp ते 10 Kwp क्षमतेच्या सोलर पॅनल (सौर ऊर्जा) पॅनल साठी 20% अनुदान मिळेल
- 10Kwp पेक्षा जास्त सोलार पॅनलसाठी सबसिडी मिळणार नाही
- 3 kwp पर्यंत क्षमतेसाठी 40% अनुदान मिळेल.
- अर्जाच्या वेळी ग्राहकाकडे कोणतीही थकबाकी नसावी.
- सोलार पॅनल बसवण्यासाठी Mahadiscom च्या ठेकेदाराची निवड करावी लागेल
- ‘Mahadiscom अर्ज करावा, त्यानंतर नॅशनल पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक
घरगुती सोलर पॅनल (सौर ऊर्जा) ग्राहकांचा फायदा
ग्राहकांचा भारनियमानाच्या त्रासातून सुटका होणार आहे.
अतिरिक्त वीज विकण्यासाठी तुम्हाला महवितरण अथवा‘आरएडीए’शी (RADA) कडे अर्ज करावा लागतो. आणि त्यांना वीज विकता येते फायदा पण होतो.
ग्राहकांना 2 किलोवॅटच्या सोलर पॅनल पासून अंदाजे तासाला एक युनिट वीज उपलब्ध होणार आहे.
सुर्य प्रकाशाच्या कालावधीत म्हणजे साधारणत: दिवसाला 10 युनिट वीजनिर्मिती होते. आणि महिन्याला 300 युनिट वीज मोफत उपलब्ध होणार आहे.
रूफटॉप सोलर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला.
- आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- बचत बँक खाते
- घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे (८ अ उतारा)
- घरातील सह-हिस्सेदारांचे संमतीपत्र
- वीज बिल
- पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
- रहिवासी दाखला
घरगुती सोलर पॅनल (सौर ऊर्जा) अर्ज कसा करवा
- सर्वप्रथम www.mahadiscom.in च्या ऑफिशियल संकेतस्थळावर भेट द्या.
- त्यानंतर तुम्ही Consumer Portal वर जा
- तुमचा वीज ग्राहक क्रमांक टाकून मोबाईल नंबर टाका
- या पेजवर तुम्ही Renewable Energy Portal वर जा
- या ठिकाणी तुम्हाला Solar Rooftop या योजनेवर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर RE Rooftop Apply यावर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला दोन स्टेप मधील फॉर्म भरायचा आहे
- पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे
- दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला पेमेंट करायचे आहे
- या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला 500 रुपये शुल्क भरावे लागेल