Home / इतर / पोस्ट ऑफिस योजना

पोस्ट ऑफिस योजना

पोस्ट ऑफिस योजना

पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम 5 योजना

 आता आपण जाणून घेऊ पोस्ट ऑफिसची सर्वात चांगल्या  योजना कोणत्या आहेत

आज आम्ही तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या ५ योजनाची माहिती घेऊन आलो आहोत. आपण पोस्ट ऑफिस बचत योजनेबद्दल माहिती घेऊ.  

 बँकांप्रमाणे, पोस्ट ऑफिस देखील अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते, आणि पोस्ट ऑफिस मधील गुंतुवणूक ही खात्रीशीर मानली जाते. पोस्ट ऑफिस मधील गुंतुवणूक ही धोकादायक नसते, पोस्ट ऑफिस मधील गुंतुवणूक बुडणारी नसते  पोस्ट ऑफिस मधील गुंतुवणूकीमध्ये  लोकांना पैसे वाचवणे सोपे वाटते.

इतर बँक प्रमाणे पोस्ट ऑफिस बचत योजनेंतर्गत लोकांना चांगला व्याजदर देते तसेच करात सूट आणि इतर सुविधा ही देते. पोस्ट ऑफिस बचत योजने अंतर्गत अशा अनेक बचत योजना आहेत, ज्यामुळे लोकांना पैसे गुंतुवणूक करणे सोपे जाते. या लेखात त्या योजनांची सर्व माहिती मुद्देसूद सांगणार आहे.

पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना कोणती आहे? 

१. पोस्ट ऑफिस मुदत ठेव. 

पोस्ट ऑफिस मुदत ठेव या योजने अंतर्गत गुंतवणुकीसाठी कमीत कमी  २०० रुपये रक्कम निश्चित करण्यात आली आहे आणि पोस्ट ऑफिस मुदत ठेव या योजने अंतर्गत उघडलेले खाते दुसर्‍या खात्यात देखील हस्तांतरित केले जाऊ शकते. योजने अंतर्गत गुंतवणुकीसाठी वेगवेगळे कालावधी ठेवण्यात आले आहेत, ज्यामध्ये १, २ वर्षे किवा ३ वर्षांसाठी ५.५ % आणि ५ वर्षांसाठी थोडा व्याजदरा मध्ये वाढ होते ६.७% मिळते.

२. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 

 नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम अंतर्गत गुंतवणुकीचा कालावधी 5 वर्षांचा आहे, ज्यामध्ये कमीत कमी १०००  रुपये ते जास्तीत जास्त ९ लाख गुंतवणूक केली जाते आणि त्याचा व्याज दर ७.४% निश्चित करण्यात आला आहे. कोणतीही निश्चित कमाल रक्कम नाही.

३. सुकन्या समृद्धी योजना. 

 सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये कमीत कमी २५० रुपये ते जास्तीत जास्त १ .५ लाख गुंतवणूक केली जाते, ज्यामध्ये ७.६ % व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. १५ वर्षांसाठी किमान रक्कम गुंतवणे अनिवार्य आहे, त्याची एक निश्चित वेळ आहे. सुकन्या समृद्धी योजना मधील गुंतवणूक करमुक्त आहे.

 ४. किसान विकास पत्र. 

 किसान विकास पत्र योजना शेतकऱ्यांसाठी असून ज्यामध्ये कमीत कमी १००० रुपये ते जास्तीत जास्त रक्कम निश्चित केलेली नाही. किसान विकास पत्र योजना चा कालावधी ९  वर्षे ४  महिन्यांचा असून यामध्ये ७.५  % व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. 

 ५. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी EPFO Yojana  

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये निश्चित कालावधी १५ वर्षे आहे आणि त्यात ७.१ % व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम रु. ५००/- आणि कमाल रक्कम रु. १,५०,०००/- आहे.

 या शिवाय आजून ही बऱ्याच पोस्ट ऑफिस योजना आहेत त्या आपण नंतर पाहू ……………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!