Home / नवीन योजना / राम मंदिरात बसवणार योगीराज यांनी बनवलेली खास प्रभू श्रीरामांची मूर्ती

राम मंदिरात बसवणार योगीराज यांनी बनवलेली खास प्रभू श्रीरामांची मूर्ती

राम मंदिरात बसवणार योगीराज यांनी बनवलेली खास प्रभू श्रीरामांची मूर्ती

 

कर्नाटकचे सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी बनवलेली खास प्रभू श्रीरामांची मूर्ती 22 जानेवारी रोजी प्राण-प्रतिष्ठापनेवेळी राम मंदिरातील गर्भगृहात स्थापित केली जाणार

 

ram1

 

 

२२ जानेवारीला प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरात करण्यात येणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असतील.

अयोध्येतील मंदिराच्या गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात येणारी मूर्ती साकारण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून तीन मूर्तीकारांची निवड करण्यात आली होती. अरुण त्यातले एक होते. तीन मूर्तीकारांमध्ये निवड झाल्याबद्दल अरुण यांनी आनंद व्यक्त केला. राम मंदिरात अरुण यांनी घडवलेली मूर्ती बसवण्यात येईल.

 

अरुण योगीराज कोण आहेत

अरुण योगीराज कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबात अनेक प्रसिद्ध मूर्तीकार होऊन गेले. अरुण यांनी साकारलेल्या मूर्तींना विविध राज्यांमधून मागणी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या प्रतिभेचं, कौशल्याचं कौतुक केलं आहे. अरुण यांनी आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम मूर्ती घडवल्या आहेत.

 

 

अरुण यांचे वडील योगीराजदेखील उत्तम मूर्तीकार आहेत. त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना म्हैसूरच्या राजानं संरक्षण दिलं होतं. अरुण योगीराज यांना लहानपणापासूनच मूर्ती घडवण्याची आवड होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!