SIP हा म्हणजे “Systematic Investment Plan” (सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन).
हे एक नियमित पैसे निवेश योजना आहे. SIP हा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटचा एक प्रकार आहे जो तुम्हाला वेळेवर इन्व्हेस्ट करण्याची परवानगी देतो. आहे ज्यामुळे तुम्ही नियमितपणे गुंतवणूक करू शकता SIP मध्ये सातत्याने गुंतवणूक केली तर तुमच्या आर्थिक ध्येयांपर्यंत नक्की पोचू शकता.
भारतातील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये एसआयपीची लोकप्रियता वाढत आहे, कारण याने शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करता येते आणि बाजाराच्या चढ-उतारांची आणि बाजाराच्या वेळेची काळजी करण्याची गरज नसते. म्युच्युअल फंडचे सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन्स दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहेत. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे फार महत्त्वाचे आहे, म्हणूनच आपल्याला गुंतवणूक करणे लवकर सुरू करायला पाहिजे ज्याने आपल्याला शेवटी परतावा अधिक मिळेल.
एसआयपी कसे काम करते
आपण SIP निवडला की, ती रक्कम आपोआप आपल्या बँक खात्यातून डेबिट होईल आणि आपण खरेदी केलेल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाईल. गुंतवणूक केल्यानंतर, आपल्याला आपल्या म्युच्युअल फंडाचे युनिट्स वाटप केले जातील जे त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्यावर अवलंबून असतात.
SIP योजनेतील प्रत्येक गुंतवणुकीसह, बाजार दरानुसार कोणतेही अतिरिक्त युनिट आपल्या खात्यात जोडले जातील. केलेल्या प्रत्येक गुंतवणुकीसह, आपण पुनर्गुंतवणूक केलेली रक्कम त्या गुंतवणुकीवर आपल्याला दिसणार्या कोणत्याही परताव्याव्यतिरिक्त मोठी असेल. गुंतवणूकदार एसआयपीची मुदत संपल्यावर किंवा कोणत्याही वेळोवेळी परतावा मिळवायचा की नाही हे ठरवतो.
SIP च्या मुख्य फायदे: –
नियमित गुंतवणूक :
SIP द्वारे आपल्याला नियमितपणे गुंतवणूक करण्याची संधी मिळते, ज्यामुळे आपल्याला गुंतवणूक करण्याची सवय लागते आणि आपल्या संपत्ती मध्ये वाढ होते.
सहजीकरण:
SIP मध्ये तुमच्या खात्यातून रक्कम काढून घेते आणि निर्दिष्ट तारखेला तुमच्या निवडलेल्या SIP प्लॅनमध्ये जमा करते. आपण SIP चालू करताना बँक खाते SIP योजनाच्या खात्याला जोडलेले असते. SIP ची रक्कम ठराविक तारखेला दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून ठराविक तारखेला हस्तांतरित केली जाते. SIP मध्ये पाठवलेले पैसे युनिट्स खरेदी करण्यासाठी वापरले जातात.
कमी गुंतवणूक:
SIP मध्ये पूर्वनिश्चित कालावधीत केवळ एक ठराविक रक्कम गुंतवणूक असल्याने, तुमच्या सामान्य उत्पन्नातून आणि जाणार्या खर्चातून आवश्यक रक्कम वजा करणे अगदी सोपे आहे. नियमित अंतराने दीर्घकाळ गुंतवणूक करून, तुम्ही मोठ्या प्रमाणात कमाई करू शकता. SIP मध्ये दर महिन्यला ५००/- तुम्ही गुंतवू शक्त आकदि काही काही म्युच्युअल फंडमध्ये तुमी म्हणयला १००/- रुपये पण गुंतवू शकता.
आरोग्यवर्धक:
SIP मध्ये गुंतवणूक हि लाभकारक आहे आणि दीर्घकालिक निवेशक्षमतेला वाढवण्यात मदतीकारक आहे. एसआयपी गुंतवणूक करणे खरोखर सोपे आहे. याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. SIP मधील गुंतवणूक सुरक्षित आहे अभ्यासपूर्व गुंतवणूक केलायस SIP गुंतवणूक धोकादायक नाही. SIP एक आरक्षित निवेश योजना आहे, ज्यामुळे व्यक्ती संपूर्ण परिस्थितीत सुरक्षित आहे.
सहजपणे आणि सुलभता:
SIP सुद्धा सुलभ आहे. सापडण्यासाठी आपल्याला केवळ निवेश अंश आपल्या बँकिंग किंवा फायनान्सियल आप्लिकेशनद्वारे निवेदन करावे लागतो.
कर मुक्त
तज्ज्ञांच्या मते जर एसआयपीद्वारे कर लाभ घ्यायचा असेल तर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच ईएलएसएसमध्ये पैसे गुंतवावे लागतील. ELSS ही म्युच्युअल फंडांची अशी योजना आहे, जिथे आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ उपलब्ध आहे. तुमची ELSS म्युच्युअल फंडातील एसआयपी 5 वर्षे कायम असेल तर त्यात दरवर्षी 1.50 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केल्यास कर सूट मिळू शकते.
चक्रवाढ व्याज (Compounding Interest)
चक्रवाढ व्याज म्हणजे व्याज वर व्याज SIP चा हा एक मोठा फायदा आहे. SIP ला एकरकमी गुंतवणुक किवा दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक होते. SIP चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याला चक्रवाढ व्याज (Compounding Interest) फायदा मिळतो. त्यामुळे तुम्ही गुंतवलेले पैसे वाढत राहतात. SIP मध्ये गुंतवणूक केलेल्या आपल्या गुंतवणुकीला व्याज भेटते ते आपण पुन्हा SIP मध्ये RE –INVEST केल्यास त्या व्याज वर पण व्याज भेटेते याला आपण चक्रवाढ व्याज म्हणतो.