१२% पर्यंत परतावा देणाऱ्या ४ सर्वोत्तम सरकारी गुंतवणूक योजना – सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय

१२-१३% पर्यंत परतावा देणाऱ्या ४ सरकारी इन्व्हेस्टमेंट स्कीम्स – प्रत्येकासाठी फायदेशीर!
सरकारी पाठबळ असलेल्या अशा ४ इन्व्हेस्टमेंट स्कीम्स जाणून घ्या ज्या सीनियर सिटीझन्स, यंग पेरेंट्स, वर्किंग प्रोफेशनल्स आणि तरुणांसाठी आदर्श आहेत. १२% पर्यंत हमीशीर रिटर्न मिळवण्याचा सुरक्षित मार्ग.

आजच्या आर्थिक परिस्थितीत सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय शोधणं ही सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी गरज बनली आहे. सीनियर सिटिझन्स असोत, वर्किंग प्रोफेशनल्स, यंग पेरेंट्स किंवा तरुण व्यावसायिक – प्रत्येकाला असा पर्याय हवा असतो जो एकीकडे सुरक्षित असावा आणि दुसरीकडे चांगला परतावा देणारा असावा. म्हणूनच आपण अशा काही सरकारी योजना पाहणार आहोत ज्या १२% ते १३% पर्यंत परतावा देऊ शकतात आणि त्याचबरोबर सरकारी संरक्षणामुळे संपूर्णपणे सुरक्षित आहेत.

चला तर मग एकेका करून या चार सर्वोत्तम स्कीम्स पाहूया:


१. सीनियर सिटीझन सेविंग स्कीम (SCSS): सेवानिवृत्त व्यक्तींना लाभदायक व सुरक्षित गुंतवणूक

जर तुमचे आई-वडील ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील आणि त्यांच्या हातात पीएफ, ग्रॅच्युटी किंवा इन्शुरन्समधून आलेली मोठी रक्कम असेल, तर ती कुठे गुंतवायची असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. अशा वेळी सीनियर सिटीझन सेविंग स्कीम म्हणजे SCSS हा एक आदर्श पर्याय आहे.

या योजनेची वैशिष्ट्ये:

  • फिक्स्ड आणि गॅरंटीड रिटर्न: सध्या या स्कीमवर ८.२% रिटर्न मिळतो. अनेक बँकांच्या FD रेटपेक्षा जास्त रेट ही योजना देते.

  • सुरक्षा आणि स्थैर्य: सरकारच्या पाठबळामुळे रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. त्यामुळे रिस्कचा प्रश्नच नाही.

  • गुंतवणुकीची मर्यादा: कमीतकमी ₹१००० पासून सुरुवात करता येते आणि जास्तीत जास्त ₹३० लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.

  • मॅच्युरिटी आणि लॉक-इन पिरियड: ५ वर्षांचा लॉक इन कालावधी असून, पुढे ३ वर्षांसाठी वाढवता येतो.

  • पेनल्टी नियम: १ वर्षाआधी पैसे काढल्यास ०.५% आणि १ वर्षानंतर १% पेनल्टी लागू होते.

  • करसवलत: सेक्शन 80C अंतर्गत ₹१.५ लाखांपर्यंत करसवलत मिळते.

या सगळ्या गोष्टी लक्षात घेता, सीनियर सिटीझन्ससाठी ही योजना एक उत्कृष्ट पर्याय आहे. सेवानिवृत्तीनंतरचा पैसा सुरक्षित ठेवत चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर यापेक्षा योग्य पर्याय नाही.


२. सुकन्या समृद्धी योजना: मुलीच्या भविष्यासाठी सर्वोत्तम सरकारी योजना

जर तुमच्या कुटुंबात १० वर्षांखालील वयाची मुलगी असेल, तर सुकन्या समृद्धी योजना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ही योजना केंद्र सरकारने खास मुलींच्या शिक्षण व विवाह खर्चासाठी सुरू केली आहे.

मुख्य वैशिष्ट्ये:

  • गुंतवणुकीची अट: फक्त १० वर्षांखालील मुलींसाठीच खाते उघडता येते. दरवर्षी खाते चालू ठेवण्यासाठी गुंतवणूक आवश्यक आहे.

  • रिटर्न: सध्या या योजनेवर ८.२% रिटर्न मिळतो जो की गॅरंटीड आहे.

  • मॅच्युरिटी पिरियड: मुलीच्या वयाची २१ वर्षे किंवा तिचा विवाह – यापैकी जे आधी होईल ते.

  • करमुक्त रक्कम: मॅच्युरिटी नंतर मिळणारी संपूर्ण रक्कम पूर्णपणे करमुक्त असते.

  • शिक्षणासाठी विथड्रॉअल: शिक्षणासाठी, जमा केलेल्या रकमेच्या ५०% पर्यंत पैसे कोणतीही पेनल्टी न भरता काढता येतात, फक्त ऍडमिशनचा पुरावा लागतो.

  • करसवलत: दरवर्षी गुंतवणुकीवर 80C अंतर्गत ₹१.५ लाखांपर्यंत टॅक्स बचत मिळते.

मुलीच्या उज्वल भविष्यासाठी, शिक्षण आणि विवाहासाठी निधी साठवण्यासाठी ही योजना उत्तम पर्याय ठरते.


३. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC): वर्किंग प्रोफेशनल्ससाठी सुरक्षित गुंतवणूक

तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल आणि तुम्हाला सध्यातरी मोठी जोखीम न घेता सरकारी पाठबळ असलेली आणि करसवलत मिळवणारी गुंतवणूक करायची असेल, तर नॅशनल सेविंग सर्टिफिकेट हा पर्याय उत्तम आहे.

महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • फिक्स रिटर्न: सध्या या योजनेवर ७.६०% परतावा मिळतो, जो निश्चित असतो.

  • मॅच्युरिटी पिरियड: पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी, त्यानंतरच पैसे काढता येतात.

  • करसवलत: दरवर्षी 80C अंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर टॅक्स रिबेट मिळतो.

  • टॅक्सेबल मॅच्युरिटी: मॅच्युरिटी नंतर मिळणारी रक्कम मात्र टॅक्सेबल असते.

  • सुरक्षितता: ही स्कीम संपूर्णपणे सरकारी असल्यामुळे रिटर्न्स हमीशीर आणि रिस्क फ्री आहेत.

एफडीसारखीच सुरक्षितता, पण त्याहून थोडा अधिक परतावा मिळवण्यासाठी NSC हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे.


४. नॅशनल पेन्शन स्कीम (NPS): तरुण व्यावसायिकांसाठी लॉंग टर्म सुरक्षितता

जर तुम्ही २५ ते ४० वयोगटातले असाल, नुकतीच नोकरी किंवा व्यवसाय सुरू केला असेल, आणि एक स्थिर पेन्शनचा पर्याय हवा असेल, तर NPS हा एक उत्तम पर्याय आहे.

वैशिष्ट्ये:

  • मिश्रित गुंतवणूक: यात तुमचे पैसे इक्विटी आणि डेट (बॉन्ड्स इ.) मध्ये गुंतवले जातात. तुम्ही इक्विटीमध्ये जास्तीत जास्त ७५% गुंतवू शकता.

  • रिटर्न्स: इक्विटीमुळे १२-१५% पर्यंत परतावा मिळण्याची शक्यता असते. सरासरी १०-१२% परतावा सहज मिळू शकतो.

  • मॅच्युरिटी व पेन्शन: वयाच्या ६० व्या वर्षानंतर ६०% रक्कम लमसम मिळते आणि उर्वरित ४०% पेन्शनच्या रूपात दरमहा मिळते.

  • करसवलत: 80C अंतर्गत ₹१.५ लाख आणि 80CCD(1B) अंतर्गत ₹५०,००० पर्यंतची अतिरिक्त टॅक्स सवलत.

  • गव्हर्मेंट बॅकअप: सरकारी पाठबळामुळे गुंतवणूक सुरक्षित आणि स्थिर असते.

NPS ही योजना खास करून त्यांच्या भविष्यासाठी नियमित पेन्शनची योजना आखू पाहणाऱ्या तरुणांसाठी आदर्श आहे.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved