Home / शेती (Agriculture) / सोयापेंड निर्यातीवर तातडीने निर्णय घेऊ – गोयल

सोयापेंड निर्यातीवर तातडीने निर्णय घेऊ – गोयल

सोयापेंड निर्यातीवर तातडीने निर्णय घेऊ – गोयल

सोयाबीन दरवाढीसाठी पामतेलावर आयात शुल्क लावण्यासह यावर्षी सोयापेंड आयात करणार नाही. तसेच सोयापेंड निर्यातीला केंद्र सरकार प्रोत्साहन देईल. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सोयापेंड आयात करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सोयाबीनच्या दरात सध्या मोठी घसरण झाली आहे आणि तशी झाल्याची चर्चा सोशल मीडियावर काही दिवसांपासून सुरू आहे. सोयाबीनच्या दराच्या पावत्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरवर्षी सोयाबीन मार्केटला आल्यावरच त्याचे दर का उतरतात, असा प्रश्न शेतकरी विचारताना दिसून येत आहेत.

शेतकर्याचा शेतात सोयाबीन असते तेव्हा सोयाबीनला चांगला भाव असतो. पण, ती काढणीला आली तर भाव उतरतो. आमचं पीक मार्केटला न्यायची वेळ आली की भाव उतरतो, अशी तक्रार शेतकरी करत आहेत.त्यामुळे मग काढणीला आल्यावरच सोयाबीनचा भाव का उतरतो तर काही कृषीतज्ञच्या मते शेतकऱ्याचा शेतमाल जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा त्यात मॉईश्चर (आर्द्रता किंवा ओल) आहे किंवा इतर कारणं सांगून भाव पाडले जातात. यानंतर व्यापारी हाच माल 2 ते 3 महिने साठवून ठेवतात आणि नंतर अधिक दरानं त्याची विक्री करतात. यातून त्यांना नफा कमावयाचा असतो, कारण हा त्यांचा धंदा आहे. म्हणून वर्षानुवर्षं असं चक्र चालत आलं आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय कारणं कारणीभूत नसतात.”

केंद्र सरकार सोयापेंड निर्यात करणार असेल तर सोयाबीन दर वाढ नक्की होईल याचा शेतकर्याना फायदा होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!