Home / Trend / ट्रेंड (Trending News & Topics) / सॅटेलाईट इंटरनेटमुळे टेलिकॉम मार्केट ढवळून निघणार? | भारतातील इंटरनेट आणि रिचार्ज दरांचे भविष्य

सॅटेलाईट इंटरनेटमुळे टेलिकॉम मार्केट ढवळून निघणार? | भारतातील इंटरनेट आणि रिचार्ज दरांचे भविष्य

resized image 200x200 4
सॅटेलाईट इंटरनेटमुळे टेलिकॉम मार्केट ढवळून निघणार? | भारतातील इंटरनेट आणि रिचार्ज दरांचे भविष्य

 

स्टारलिंक आणि अमेझॉनच्या सॅटेलाईट इंटरनेट सेवेमुळे भारतातील टेलिकॉम मार्केटमध्ये मोठा बदल होणार आहे. VI ची एक्झिट जवळ आली असून इंटरनेट दर कमी होतील की वाढतील यावर चर्चा सुरु आहे.

भारतात टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल होत असून, सॅटेलाईट इंटरनेटच्या आगमनामुळे या क्षेत्रात पुन्हा एकदा जोरदार स्पर्धा रंगणार आहे. एकीकडे इलॉन मस्क यांच्या Starlink ने भारतात पाय रोवलेत, तर दुसरीकडे जेफ बेझोस यांच्या Amazon Project Kuiper च ही भारतात आगमन निश्चित झालं आहे.

 

या दोघांच्या प्रवेशामुळे इंटरनेट अधिक स्वस्त आणि प्रभावी होणार असं भासत असतानाच, दुसऱ्या बाजूला VI (Vodafone Idea) सारख्या कंपन्यांसाठी मात्र परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे.

सॅटेलाईट इंटरनेट म्हणजे काय?

सॅटेलाईट इंटरनेट म्हणजे उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेटची सेवा देणारी एक अत्याधुनिक पद्धत. यामध्ये मोबाईल टॉवर किंवा फायबर केबलची गरज नसते. त्यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्येही जलद इंटरनेट पोहोचवणे शक्य होते. यासाठी ग्राहकांच्या घरांवर सॅटेलाईट डिस्क बसवली जाते, जी सिग्नल थेट उपग्रहाकडे पाठवते आणि तिथून पुन्हा डेटा परत आपल्या डिव्हाईसवर येतो.

स्टारलिंक विरुद्ध अमेझॉन : भारतातील स्पर्धा

Starlink ने भारतात 6000 सॅटेलाईट्स तैनात करण्याची तयारी केली आहे. त्यांचे सॅटेलाईट्स लो अर्थ ऑर्बिट मध्ये फिरत असल्याने सिग्नल अधिक वेगाने पोहोचतात.

Amazon ने ‘Project Kuiper’ अंतर्गत 3200 सॅटेलाईट्स लाँच करण्याचं नियोजन केलं आहे. भारतात 10 गेटवे स्टेशन आणि मुंबई-चेन्नईत डेटा सेंटर्स (Points of Presence) उभारण्याचा त्यांचा प्लॅन आहे.

याशिवाय, Airtel-OneWeb कडे 648 सॅटेलाईट्स आहेत, जे भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा देण्यासाठी सज्ज आहेत.

Jio SES या जिओच्या भागीदारीतून सुरू असलेल्या कंपनीचे सॅटेलाईट्स मिडियम अर्थ ऑर्बिट मध्ये आहेत.

VI ची बिकट अवस्था – एक्झिट जवळ?

 

जिओच्या सस्त्या इंटरनेटमुळे VI चे बरेच ग्राहक गमावले गेले. कंपनीने नंतर प्लॅन स्वस्त केले, पण त्याचा फायदा झाला नाही. आजही VI वर कर्जाचा मोठा बोजा आहे.

 

13 मे रोजी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेत VI ने म्हटलं की, जर बँक फंडिंग मिळालं नाही, तर 2025-26 नंतर कंपनीचे ऑपरेशन्स बंद करावी लागतील.

 

सरकारचा व्हीआयमध्ये 49% वाटा असूनही, सरकार आता अधिक मदत करायला इच्छुक नाही.

 

व्हीआयचे दरवर्षीचे उत्पन्न सुमारे 8-9000 कोटी असताना, सरकारकडे 18,000 कोटी रुपये एजीआर भरायचे आहेत.

भारतात सॅटेलाईट इंटरनेटमुळे काय बदल होणार?
स्पर्धा वाढल्याने दर कमी होण्याची शक्यता:

सॅटेलाईट इंटरनेट कंपन्या मोठ्या टेक्नॉलॉजीसह आणि गुंतवणुकीसह आल्यामुळे, इंटरनेट सेवा अधिक स्वस्त आणि व्यापक होऊ शकते.

VI सारख्या कंपन्यांची स्पर्धेतून एक्झिट:

जर सरकार किंवा बँकांकडून मदत मिळाली नाही, तर VI सारख्या कंपन्या टेलिकॉम क्षेत्रातून बाहेर पडू शकतात.

इंटरनेट सेवा दुर्गम भागातही पोहोचणार:

भारतात अजूनही बऱ्याच गावांमध्ये इंटरनेट पोहोचलेलं नाही. सॅटेलाईट इंटरनेटमुळे ही दरी भरून निघू शकते.

रिचार्ज दरांवर दुपदर्शी परिणाम:

जर स्पर्धा टिकून राहिली तर दर कमी होऊ शकतात. पण जर VI एक्झिट घेतली, तर स्पर्धा कमी होऊन दर वाढू शकतात.

निष्कर्ष

भारतातील टेलिकॉम क्षेत्र एक मोठ्या संक्रमणाच्या उंबरठ्यावर उभं आहे. Starlink आणि Amazon Project Kuiper सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रवेशामुळे स्पर्धा वाढणार हे निश्चित. परंतु याच स्पर्धेमुळे काही स्थानिक कंपन्यांसाठी संकट निर्माण होऊ शकतं.

 

भारतीय ग्राहकांसाठी ही एक संधीही आहे आणि आव्हानही – कारण इंटरनेट सेवा स्वस्त आणि जलद होण्याची शक्यता आहे, पण त्याचवेळी स्थिर आणि टिकाऊ स्पर्धा राहणंही आवश्यक आहे.

 

तुम्हाला काय वाटतं – अमेझॉन आणि स्टारलिंक भारतात सेटल होतील का? आणि व्हीआय टेलिकॉम स्पर्धेत टिकेल का? तुमचे मत खाली कॉमेंटमध्ये जरूर लिहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!