सरकारी नोकरीसाठी लागणारे दाखले – 

सरकारी नोकरीसाठी लागणारे दाखले – 

आपण सरकारी नोकरीसाठी लागणारे दाखले व दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची माहिती घेऊ या:

१. Income Certificate –उत्पन्न दाखला – (१ किवा ३ वर्षे करीता) 

a) अर्जदार स्वयंघोषणा पत्र फोटो सहित.

b) फॉर्म न १६ – खाजगी किवा सरकारी नोकरी असलेल्या व्यक्तींसाठी.

c) संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड

d) ITR (Income Tax Return) खाजगी नोकरी किवा उद्योगधंदे / व्यापारी.

e) तलाठी अहवाल – कामगारमोलमजुरी इतर.

उत्पन्न दाखला हा १ किवा ३ वर्षे या करीता मिळेल, दाखल्यची ची वेलेडिटी हि १ वर्ष असेल.

तलाठी अहवाल हा संबंधित तलाठी कडून आणावा , सदर अहवाल हा ५ दिवस पेक्षा जुना नसावा.

स्वयंघोषणा पत्र चा नमुना आपणास कोणत्याही XEROX दुकनात भेटेल त्याला आपला फोटो चिकटवून व माहिती भरून तो कोणत्याही इ केंद्र वर द्यावा.

नोट:-   उत्पन्न दाखला मिळण्याचा सरकारी कालावधी १५ दिवस आहे. 

२. डोमेसाईल Age, Nationality and Domicile certificate.

a) अर्जदाराचे आधार कार्ड (अर्जदार १८ वर्षे पेक्षा कमी असल्यास वडिलांचे आधार कार्ड पण लागेल)

b) अर्जदार स्वयंघोषणापत्र फोटो सहित.

c) शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र.

d) महानगर पालिका किवा नगरसेवक यांचा रहिवासी दाखला (चालू वर्षTAX पावती पण चालेल).

e) अर्जदार स्वयंघोषणापत्र फोटो सहित.

या मध्ये डोमेसाईल दाखला हा आजीवन कालावधी करीता मिळेल.

रहिवासी दाखला हा संबंधित महानगर पालिका / नगर सेवक, ग्रामपंचायत मधून (सरपंच) कडून आणावा.

चालू वर्षाची TAX पावती चालेल सदर अहवाल हा चालू वर्ष मधीलच असावा अन्यथा तो ग्राह्य नसेल.

शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र  या वर जन्म कुठे झाला म्हणजेच जन्म स्थळ चा उल्लेख तसेच जन्म तारीख चा उल्लेख हा असलाच पहिले अन्यथा ते ग्राह्य धरले जाणार नाही.

नोट:-    डोमेसाईल दाखला मिळण्याचा सरकारी कालावधी १५ दिवस आहे. 

३. नॉन क्रीमीलेयर दाखला – Non Creamy Layer Certificate –

 a) आधार कार्ड (वडील व पाल्य मुलगा/मुलगी दोघांचे )

b) शाळा सोडल्याचा दाखला (मुलगा/मुलगी दोघांचे )

c) रेशन कार्ड

d) ३ वर्षाचा उत्पन्न दाखला (तहसीलदार यांचा हा सेतू वरून पहिले काढून घ्यावा )

e) मुलगा/मुलगी चा जातीचा दाखला

f) महानगर पालिका / नगर सेवक, ग्राम पंचायत मधून (सरपंच) कडूनरहिवासी दाखला (चालू वर्षTAX पावती पण चालेल)

g) अर्जदार स्वयंघोषणापत्र फोटो सहित

नॉन क्रिमीलेयर दाखला हा कमीत कमी १ किवा जास्तीत जास्त ३ वर्षे कालावधी करीता मिळेल.

हा दाखला काढताना सर्वात पहिले वडिलांचा ३ वर्षाचा उत्पन्न दाखला (तहसीलदार यांचा) काढणे आवश्यक आहे.

स्वयंघोषणापत्र  फोटो सहित वडिलांच्या नावाने भरावे.

अन्य तालुक्यातील किवा महाराष्ट्र मधील कोणत्याही जिल्ह्याचे जातीचे प्रमाण पत्र असले तरीही आपण आज रहिवासी असलेल्या तालुक्यातून नॉन क्रिमीलेयर दाखला काढू शकतो फक्त अर्जदार यांचे कागदपत्र यावरील पत्ते हे त्या दिवशी दाखल करत असलेल्या तालुक्यातील असणे गरजेचे आहे. कागदपत्र मूळ सदर करावे .

नोट:-   नॉन क्रिमीलेयर  दाखला मिळण्याचा सरकारी कालावधी २१ दिवस आहे. 

४. जातीचा दाखला  State Caste Certificate – OBC, SC, ST, VJNT –

a) आधार कार्ड (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )

b)  रेशन कार्ड.

c) अर्जदार स्वयंघोषणापत्र फोटो सहित

d) शाळा सोडल्याचा दाखला (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )

e) आजोबाTC / कोतवाल बुक नक्कल / हक्क नोंदणी /शाळा प्रवेश नोंद वही उतारा /कोणताही महसूल पुरावा

f) महानगर पालिका / नगर सेवक, ग्राम पंचायत मधून (सरपंच) कडूनरहिवासी दाखला (चालू वर्षTAX पावती पण चालेल)

g) जात प्रमाण पत्र साठी शपथपत्र (नमुना २ व नमुना ३ )

h) वडील किवा नातेवाईक यांचा जात किवा जात वैधता प्रमाण पत्र (उपलब्ध असल्यास) जातीचा दाखला हा आजीवन कालावधी करीता मिळतो.

दाखला काढताना याचे २ भाग पडतील.

क्रमाक ३ मधील नोंदवलेली  आजोबा TC / कोतवाल बुक नक्कल / हक्क नोंदणी /कोणताही महसूल पुरावा हि कागद पत्रे कोणत्या तालुक्यातील आहे ते तपासून बघावी.\

कागदपत्रे हि जाती नुसार OBC (वर्ष 1967 च्या पूर्वीचे) , SC ST (वर्ष1950 च्या पूर्वीचे) असणे आवश्यक आहे.

संबंधित कागद हा २ सप्टेंबर २०१२ च्या शाषण निर्णय नुसार आजोबा TC / कोतवाल बुक नक्कल / हक्क नोंदणी /कोणताही महसूल पुरावा हा ज्या तालुल्यातील असेल त्याच तालुक्यात दाखल किवा सादर करता येतो .

अन्य कोणत्याही ठिकाणी तो सादर करता येणार नाही.

कागदपत्र यावर संबंधित व्यक्तीचा व त्याच्या जातीचा स्पस्ट उल्लेख असावा.

नोट:-   जातीचा  दाखला मिळण्याचा सरकारी कालावधी २१ दिवस आहे. 

५. सेन्ट्रल नॉन क्रिमीलेअर दाखला – Central Non creamy Layer Certificate –

a)आधार कार्ड (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )

b)  रेशन कार्ड

c) मुलगा/मुलगी चा जातीचा दाखला

d) ३ वर्षाचा उत्पन्न दाखला

e) शाळा सोडल्याचा दाखला (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )

f) महानगर पालिका / नगर सेवक, ग्राम पंचायत मधून (सरपंच) कडूनरहिवासी दाखला (चालू वर्षTAX पावती पण चालेल)

g) अर्जदार स्वयंघोषणापत्र फोटो सहित

सेन्ट्रल नॉन क्रिमीलेयर दाखला हा  जास्तीत जास्त १ वर्षे कालावधी करीता मिळतो.

सेन्ट्रल नॉन क्रिमीलेयर दाखला काढताना सर्वात पहिले वडिलांचा ३ वर्षाचा उत्पन्न दाखला (तहसीलदार यांचा) काढणे आवश्यक आहे.

स्वयंघोषणापत्र फोटो सहित वडिलांच्या नावाने भरावे.

अन्य तालुक्यातील किवा महाराष्ट्र मधील कोणत्याही जिल्ह्याचे जातीचे प्रमाण पत्र असले तरीही आपण आज रहिवासी असलेल्या तालुक्यातून सेन्ट्रल नॉन क्रिमीलेयर दाखला काढू शकतो फक्त अर्जदार यांचे कागदपत्र यावरील पत्ते हे त्या दिवशी दाखल करत असलेल्या तालुक्यातील असणे गरजेचे आहे.

नोट:- सेन्ट्रल नॉन क्रिमीलेयर दाखला  मिळण्याचा सरकारी कालावधी २१ दिवस आहे. 

६. सेन्ट्रल जातीचा दाखला – Central Caste Certificate –

a) आधार कार्ड (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )

b) अर्जदार स्वयंघोषणापत्र फोटो सहित

c) मुलगा/मुलगी चा जातीचा दाखला

d) ३ वर्षाचा उत्पन्न दाखला

e) शाळा सोडल्याचा दाखला (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )

f) महानगर पालिका / नगर सेवक, ग्राम पंचायत मधून (सरपंच) कडूनरहिवासी दाखला (चालू वर्षTAX पावती पण चालेल)

g) रेशन कार्ड

सेन्ट्रल जातीचा दाखला हा  जास्तीत जास्त १ वर्षे कालावधी करीता मिळेतो.

हा दाखला काढताना सर्वात पहिले वडिलांचा ३ वर्षाचा उत्पन्न दाखला (तहसीलदार यांचा) काढणे आवश्यक आहे.

स्वयंघोषणापत्र  फोटो सहित वडिलांच्या नावाने भरावे.

अन्य तालुक्यातील किवा महाराष्ट्र मधील कोणत्याही जिल्ह्याचे जातीचे प्रमाण पत्र असले तरीही आपण आज रहिवासी असलेल्या तालुक्यातून सेन्ट्रल  जातीचा दाखला काढू शकतो फक्त अर्जदार यांचे कागदपत्र यावरील पत्ते हे त्या दिवशी दाखल करत असलेल्या तालुक्यातील असणे गरजेचे आहे.

नोट:-   सेन्ट्रल जातीचा दाखला मिळण्याचा सरकारी कालावधी २१ दिवस आहे. 

७. सेन्ट्रल EWS १० टक्के आरक्षण दाखला Central EWS Certificate 10% Reservation –

a) आधार कार्ड (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )

b)  रेशन कार्ड

c) महानगर पालिका / नगर सेवक, ग्राम पंचायत मधून (सरपंच) कडूनरहिवासी दाखला (चालू वर्षTAX पावती पण चालेल)

d) शाळा सोडल्याचा दाखला (वडील व मुलगा/मुलगी दोघांचे )

e) आजोबाTC / कोतवाल बुक नक्कल / हक्क नोंदणी /शाळा प्रवेश नोंद वही उतारा /कोणताही महसूल पुरावा

f) जात प्रमाण पत्र साठी शपथपत्र (नमुना २ व नमुना ३ )

g) अर्जदार स्वयंघोषणा पत्र (फोटो सहित ) (वडील व लाभार्थी दोघांचेही )

h) वडील किवा नातेवाईक यांचा जात किवा जात वैधता प्रमाण पत्र (असल्यास)

i) १० % इंग्लिश प्रतिज्ञा व लेख (महा ई सेवा केंद्र किवा सेतू मधून मिळेल)

j) Online स्वयंघोषणा पत्र (महा ई सेवा केंद्र किवा सेतू मधून मिळे )

सेन्ट्रल EWS  दाखला हा  जास्तीत जास्त १ वर्षे कालावधी करीता मिळेतो .

सेन्ट्रल EWS  दाखला काढताना सर्वात पहिले वडिलांचा १ वर्षाचा उत्पन्न दाखला (तहसीलदार यांचा) काढणे आवश्यक आहे.

स्वयंघोषणापत्र  फोटो सहित वडिलांच्या नावाने भरावे.

अन्य तालुक्यातील किवा महाराष्ट्र मधील कोणत्याही जिल्ह्याचे १९६७ पूर्वीचा पुराव्वा  असले तरीही आपण आज रहिवासी असलेल्या तालुक्यातून सेन्ट्रल  EWS Certificate दाखला काढू शकतो फक्त अर्जदार यांचे कागदपत्र यावरील पत्ते हे त्या दिवशी दाखल करत असलेल्या तालुक्यातील असणे गरजेचे आहे.

नोट:- सेन्ट्रल EWS  जातीचा दाखला मिळण्याचा सरकारी कालावधी २१ दिवस आहे. 

८. रहिवासी दाखला – Residence Certificate 

a) अर्जदाराचे आधार कार्ड (अर्जदार १८ वर्षे पेक्षा कमी असल्यास वडिलांचे आधार कार्ड पण लागेल)

b) अर्जदार स्वयंघोषणा पत्र फोटो सहित

c) शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र

d). महानगर पालिका / नगर सेवक, ग्राम पंचायत मधून (सरपंच) कडून रहिवासी दाखला (चालू वर्ष TAX पावती पण चालेल)

रहिवासी दाखला हा १ वर्षे  कालावधी करीता  मिळेतो .

रहिवासी दाखला हा संबंधित महानगर पालिका / नगर सेवक, ग्राम पंचायत मधून (सरपंच)  कडून आणावा , चालू वर्षाची TAX पावती चालेल सदर अहवाल हा चालू वर्ष मधीलच असावा अन्यथा तो ग्राह्य नसेल.

शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र  या वर जन्म कुठे झाला म्हणजेच जन्म स्थळ चा उल्लेख हा असलाच पहिले अन्यथा ते ग्राह्य धरले जाणार नाही.

नोट:-  रहिवासी दाखला मिळण्याचा कालावधी १५ दिवस आहे. 

 

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved