Home / Trend / ट्रेंड (Trending News & Topics) / शासकीय अनुदान मिळण्यासाठी बँक खाते आधारला कार्ड ला लिंक असणे गरजेचे आहे

शासकीय अनुदान मिळण्यासाठी बँक खाते आधारला कार्ड ला लिंक असणे गरजेचे आहे

शासकीय अनुदान मिळण्यासाठी बँक खाते आधारला कार्ड ला लिंक असणे गरजेचे आहे

 

शासकीय अनुदान मिळण्यासाठी आपले बँक खाते आपल्या आधारला लिंक आहे कि नाही हे आपणच खालीलप्रमाणे तपासू शकता.
1.  वेबसाईट ओपन करा – https://myaadhaar.uidai.gov.in
2. Login वर क्लिक करा
3. आपला आधार क्रमांक टाका
4. कॅप्चा कोड प्रविष्ट करा व पुढे चला आपल्याला OTP येईल तो टाका व पुढे चला (सदर OTP हा ज्या मोबाईल ला आपला आधार लिंक असेल त्याच मोबाईलवर येईल)
5. आपल्या आधार चे पेज ओपन होईल त्यात Bank Seeding Status वर क्लीक करा
आपला आधार कोणत्या बँकेत कोणत्या खात्याला जोडलेलं आहे त्याचे डिटेल्स व स्टेटस आपल्याला माहिती पडेल.
आपल्या आधारमधील पत्ता जर चुकीचा असेल तर तोही आपण १४ सप्टेंबर,२०२४ पर्यंत आपण स्वतःच विनाखर्च अपडेट्स करू शकता.
आधार सीडिंग आर्थिक व्यवहार सुलभ करते, कागदपत्रे कमी करते आणि सुरक्षितता वाढवते. निर्बाध DBT आणि त्रासमुक्त बँकिंगचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असल्याची खात्री करा.
Direct Benefit Transfer (DBT) ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक प्रणाली आहे, ज्याद्वारे सरकारी योजनांद्वारे मिळालेल्या पैशाचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!