Home / इतर / शरद पवार गटाला मिळाले ‘तुतारी’ हे नवे चिन्ह

शरद पवार गटाला मिळाले ‘तुतारी’ हे नवे चिन्ह

 

शरद पवार गटाला मिळाले तुतारी’ हे नवे चिन्ह

निवडणूक आयोगाने अखेर शरद पवार गटाला ‘तुतारीहे नवे चिन्ह मंजूर केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटला अखेर पक्षचिन्ह बहाल केले आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह दिले आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतरर शरद पवार गटाला कोणते नाव किंवा चिन्ह मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत तुतारी हे पक्षचिन्ह शरद पवार गटाकडे राहणार आहे.

कवी केशवसुतांची कविता शरद पवार गटाने पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केली आहे.

एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी!”.

turha ncp symbol

 

तुतारी चिन्ह या चिन्हच महत्त्व?

ऐतिहासिक महत्व: तुतारी हे शौर्याचं आणि लढाईचं प्रतीक मानलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात तुतारीचा वापर संदेशवहन आणि सैनिकांना प्रेरणा देण्यासाठी होत होता.

पवारांची विचारधारा: तुतारी हे सामाजिक न्याय आणि समानतेसाठी लढण्याचं प्रतीक आहे. हे शरद पवारांच्या विचारधारेशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तत्त्वांशी जुळतं.

जनतेशी कनेक्ट: तुतारी हे महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांसाठी ओळखीचं आणि प्रेरणादायी प्रतीक आहे.

पवार गटाची प्रतिक्रिया:

शरद पवार गटाने तुतारी चिन्ह मंजूर झाल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. तसेच, पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल उत्साहाचे वातावरण आहे.

 

तुतारी चिन्हाचा भविष्यावरील परिणाम:

तुतारी चिन्ह निवडणुकीत पवार गटाला फायदा देईल असा अंदाज वर्तवला जात आहे. हे चिन्ह पक्षाला नवीन ऊर्जा देईल आणि मतदारांमध्ये पक्षाविषयी आकर्षण निर्माण करेल.

तुतारी हे शरद पवार गटासाठी एक योग्य आणि प्रेरणादायी चिन्ह आहे. हे चिन्ह पक्षाला भविष्यातील निवडणुकांमध्ये यशस्वी होण्यास मदत करेल अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!