Home / Trend / ट्रेंड (Trending News & Topics) / लोकसभा निवडणूक २०२४

लोकसभा निवडणूक २०२४

लोकसभा निवडणूक २०२४ भाग -६

मतदान हा दिवस राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचा दिवस आहे. भारत हा तरुणांचा देश असून जास्तीतजास्त तरुणांनी मतदान करुन चांगला उमेदवार देशासाठी निवडून द्यावा. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. मतदानाद्वारे सरकार निवडण्याची सर्वांना संधी आहे. वेळ काढून प्रत्येकाने मतदान करावे. मतदार यादीतील आपल्या नावाच्या माहिती साठी वोटरहेल्पलाईन ॲप ची मदत घ्या.

Lokshabha5

मतदानाच्या दिवशी कितीही महत्त्वाचे काम असले तरी आधी मतदान करा आणि मगच आपल्या कामाला जा! तुमचे एक मत खूप काही बदल घडवू शकते. मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस न समजता राष्ट्रीय जबाबदारीचा दिवस समजवा व मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे.

लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक मतदाराचे मतदान महत्त्वपूर्ण व निर्णायक आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही. राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदानाचे प्रमाण यंदा वाढले पाहिजे.

मतदानाचा हक्क बजावताना परीक्षार्थींच्या हाताला मतदानाची शाई असली तरीही त्यांना परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार असल्याचे नॅशनल टेस्टिग एजन्सी (एनटीए)  कडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चुकीच्या अफवांना बळी पडू नका.

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून प्राप्त १४ हजार ७५३ पैकी १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

प्रत्येकाने आपल्याला मिळालेला मतदानाचा मूलभूत अधिकार बजावलाच पाहिजे. योग्य व्यक्तीला  निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे

या लोकसभेला महाराष्ट्रात मतदार संख्येच्या बाबतीत पुणे जिल्हा आघाडीवर असून पुण्याची मतदारसंख्या ८२ लाख ८२ हजार ३६३ आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्गात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

राज्यात ८ एप्रिलपर्यंत एकूण ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदारांची नोंद यात ४ कोटी ८० लाख ८१  हजार ६३८ पुरुष तर ४ कोटी ४४ लाख ४ हजार ५५१ महिला आणि ५ हजार ६१७ तृतीयपंथी मतदार आहेत. अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार.

रत्नागिरीत एकूण मतदार संख्या १३ लाख ३  हजार ९३९ असून यामध्ये ११ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ३१ हजार १२ असून महिला मतदारांची संख्या ६ लाख ७२ हजार ९१६ इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!