लहान रकमेची गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग.

लहान रकमेची गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग.

अनेक प्लॅटफॉर्म आणि शैक्षणिक मार्गदर्शकांच्या उदयामुळे, गुंतवणूक सुरू करणे सोपे झाले आहे. गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी आणि गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय काय आहेत आहे याची माहिती आपल्याला सहज मिळत जाते. दरवर्षी अधिकाधिक लोक त्यांची आर्थिक साक्षरता सुधारतात आणि स्थिर निष्क्रिय उत्पन्न आयोजित करण्याचा प्रयत्न करतात. गुंतवणूक करणे यापुढे श्रीमंत लक्षाधीश किंवा वॉल स्ट्रीट व्यापार्‍यांचा विशेषाधिकार राहिलेला नाही. अगदी लहान रक्कमाही तुमच्यासाठी काम करू शकतात.

सामन्य माणूस अनकेदा हा  विचार करतो कि तो गुंतवणूक करू शकत नाही कारण त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पुरसे पैसे नाहीत. पण खरा सांगू का, तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या पैसेची गरज नाही. फक्त तुम्हाला बचत जास्तीत जास्त करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि लगेच नियमित गुंतवणूक सुरू करणे आवश्यक आहे.

गुंतवणूकीस लवकर सुरवात करा

गुंतवणूक लवकर सरू केली पाहिजे करिअरची सुरुवात करतो तेव्हा पासून गुंतवणूक केली पाहिजे. काही लोक  लोक एकतर वृद्धापकाळाशी किंवा जेव्हा ते अतिरिक्त पैसे कमवू लागतात तेव्हा ते  गुंतवणूक सुरु करतात आसे करणे मोठी चूक आहे कारण गुंतवणूक करण्यासठी वय लागत नाही लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत लहान गुंतवणूक लवकर सुरु केली तर ती दीर्घ काळामध्ये मोठे  योगदान देते  जेव्हा तुम्ही लवकर गुंतवणूक करता, तेव्हा तुमची भांडवल अधिक रिटर्न कमवते.

लवकर गुंतवणुकीचे फायदे

सुरक्षित भविष्य.

चक्रवाढ व्याजाची शक्ती.

खर्च करण्याच्या सवयी सुधारते.

कर लाभ.

म्युच्युअल फंड:-

म्युचुअल फंड म्हणजे तज्ञ मंडळीकडून सांभाळल्या जाणाऱ्या अशा पैशांचा स्रोत जो की, एखाद्या गुंतवणूकदारांच्या समूहाकडून आलेला असतो. म्युचुअल फंडाचमध्ये भरपूर गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केलेले असतात आणि सर्वे पैसा शेअरमध्ये, विविध रोखेमध्ये किंवा बाजारातील अन्य पर्याय्मध्ये गुंतवतात. यात फंडांचे गुंतवणुक उदिष्ट ठरलेले असते.

म्युचुअल फंडमध्ये तज्ञांकडून व्यवस्थापन करून पैसा त्या फंडामध्ये गुंतविला जातो. म्युचुअल फंडाचे युनिट घेणे सोपे आहे. पुष्कळ बँका त्यांचे स्वतःचे म्युचुअल फंड उपलब्ध करून देतात व  गुंतविण्याची रक्कम देखील लहान असते.ह्या मध्ये कमीत कमी १००/- पासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि पाहिजे तितके म्युचुअल फंड घेवू शकता.

लहान शेअर्स (स्टॉक) खरेदी करा

शेअर्स मार्केट मध्ये  लहान  (स्टॉक) शेअर्स आहेत जे स्वस्त दरात उपलब्ध असतात आणि भविष्यात प्रचंड नफा देण्याची क्षमता ठेवतात. तथापि पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे देखील नुकसानदायी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यासाठी स्वता अभ्यास करून लहान शेअर्स (स्टॉक) खरेदी करा. चांगला अभ्यास करून गुंतवणूकदार चांगल्या कंपनीच्या कमी किमतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवू शकतात. भारतीय शेअर बाजारात अशा अनेक पेनी शेअर्सचा जबरदस्त इतिहास आहे ज्यामुळे गुंतवणूकदारांची बंपर कमाई झाली आहे.

(टीप – यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

रिकरिंग डिपॉझिट

लहान रकमेची गुंतवणूकी मध्ये रिकरिंग डिपॉझिट हा के उत्तम मार्ग आहे. दर महिन्याला पैसे जमा करण्याची योजना मध्ये तुम्ही रिकरिंग डिपॉझिट स्कीम निवडू शकता. तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कुठेही RD (आरडी)  सुरू करू शकता. तुम्ही बँकेत किती हि वर्षांसाठी RD उघडू शकता, फक्त पोस्ट ऑफिसमध्ये किमान 5 वर्षांसाठी आरडी खाते उघडावे लागते.  येते तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागेल, ज्यावर तुम्हाला व्याज मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर ६.५ % व्याज मिळते. बँकांमध्ये व्याजदर वेगवेगळा आहे. तुम्ही दर महिन्याला पैसे जमा करण्याची योजना शोधत असाल, तर तुम्ही रिकरिंग डिपॉझिट RD स्कीम निवडू शकता. तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कुठेही आरडी सुरू करू शकता. मॅच्युरिटी नंतर तुम्हाला व्याजासह पैसे मिळतील.

SIP (Systematic Investment Plan)

गुंतवणूकदारांना त्यांच्या अल्पकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी SIP योजना मदत करते. SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणूकदार बनवतो

SIP ही एक गुंतवणूक पद्धत आहे जिथे गुंतवणूकदार नियमित अंतराने (मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक) ठराविक रक्कम गुंतवू शकतात. ही रक्कम निर्दिष्ट तारखेला तुमच्या खात्यातून आपोआप वजा केली जाते. शिवाय, SIP मध्ये गुंतवणूक केल्याने जोखीम कमी होते आणि शिस्तबद्ध आर्थिक नियोजनाला चालना मिळते.

SIP मध्ये गुंतवणुकीचे फायदे

जोखीम कमी

आर्थिक शिस्त लागते

वैविध्यपूर्ण गुंतवणूक

कंपाउंडिंग चक्रवाढ व्याज

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved