रोहित्र डी पी ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी आता महावितरण ॲपवर माहिती देण्याची सुविधा.

रोहित्र डी पी ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी आता महावितरण ॲपवर माहिती देण्याची सुविधा.

 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (MSEDCL) रोहित्र डीपी ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी महावितरण ॲपवर माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ग्राहकांना घरबसल्या रोहित्र डीपी ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी तक्रार दाखल करता येणार आहे.

रोहित्र डी पी ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त रोहित्र बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे.

 

यामुळे माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसांत बिघडलेले रोहित्र बदलले जात आहे. तथापि, नादुरुस्त रोहित्र डी पी ट्रान्सफॉर्मरबद्दल माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने ग्राहकांनी महावितरण ॲपच्या माध्यमातून त्वरित माहिती देऊन मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळालेल्या रोहित्राच्या जागी दुरुस्त रोहित्र बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त रोहित्राचा साठा तयार करणे, असे विविध उपाय केले आहेत.

 

रोहित्र डी पी ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी  तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया

 

  1. महावितरण ॲप डाउनलोड करा आणि त्यात नोंदणी करा.
  2. ॲपवर नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा’ टॅबवर क्लिक करा.
  3. रोहित्र किंवा डीपी ट्रान्सफॉर्मरची माहिती भरा.
  4. ग्राहकाचे नाव नंबर दिसेल त्यावर क्लिक करा.
  5. दुरुस्तीची समस्या आणि दुरुस्तीची आवश्यकता सांगा.
  6. संबंधित ट्रान्सफॉर्मरचा फोटो काढून अपलोड करा.
  7. रोहित्र डी पी ट्रान्सफॉर्मरचा क्रमांक ट्रान्सफॉर्मरजवळची खूण कोणती आहे, तक्रारीचे वर्णन
  8. तुमचा आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक प्रदान करा.
  9. तक्रार दाखल करा.
रोहित्र डी पी ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीची तक्रार दाखल करण्याचे फायदे
    • घरबसल्या दुरुस्तीची तक्रार दाखल करता येते.
    • वेळ आणि पैसा वाचतो.
    • दुरुस्तीची कार्यवाही त्वरीत केली जाते.

     

    रोहित्र बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालयस्तरावर रोज घेण्यात येत आहे.

    या सुविधामुळे ग्राहकांना घरबसल्या रोहित्र डीपी ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी तक्रार दाखल करता येणार आहे. यामुळे ग्राहकांना वेळ आणि पैसा वाचणार आहे.

    Share on WhatsApp

    नवीन योजना

    Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
    © Mahiti In Marathi | All rights reserved