Home / आरोग्य / रात्री उशीरा जेवताय हि सवय पडू शकते महागात

रात्री उशीरा जेवताय हि सवय पडू शकते महागात

रात्री उशीरा जेवताय हि सवय पडू शकते महागात

              सध्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा योग्य वेळेत जेवत नाही. आपण एकाच वेळेस अनेक कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्या समोर ही समस्या निर्माण होते. ऑफिस आणि इतर कामाच्या व्यस्ततेमुळे आपण रात्री उशिरा जेवायला बसतो. पण काहीजणांना रोज रात्री उशीरा जेवायची सवय लागते. पण रात्री उशीरा जेवल्यामुळे आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अनेकांना माहित नसते. तज्ञांच्या मतानुसार रात्री ८ वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे. रात्री उशीरा जेवल्याने पचनाबरोबर आणखी कोणत्या समस्या उद्भवू शकतात जाणून घ्या.

पचनाशी निगडित समस्या :

             रात्री उशीरा जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे पचनाशी निगडित समस्या उद्भवू शकतात. तुमची पचन क्रिया मंदावते उशिरा जेवलेलं पचत नाही. 

 
शरीरातील ऊर्जा कमी होणे :
रात्री उशीरा जेवल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी बद्धकोष्ठता, डोकेदुखी किंवा इतर काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याचे जाणवते. अशक्तपणा जाणवतो उस्ताह राहत नाही सतत मरगळ येत.

झोप पूर्ण न होणे :
रात्री उशीरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊन, झोपल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामळे झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते. पित्त गॅस होता झोपण्यात व्यत्यय येतो

वजन वाढणे:
रात्री उशीरा जेवल्याने वजन वाढू शकते. अनेकांना डाएट करून किंवा नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही, याचे कारण रात्री उशिरा जेवणे असू शकते. रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे.

 रक्तदाब अनियंत्रित होणे :
रात्री उशीरा जेवल्याने रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री उशिरा जेवण टाळावे.आयुर्वेद मध्ये रात्री चे जेवण सर्वात कमी आणि सूर्य अस्ता च्या आत करावे आसे सांगितले आहे. आसे असले तरी आता धावपळीच्या  युगा मध्ये ते शक्य नाही तरी पण कमीत कमी रात्रीचे जेवण ८ वाजे पर्यंत करावे. रात्री  पचनास जड असेलेले अन्न खाऊ नये.   रात्री उशिरा अन्न खाण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे चरबी वाढण्याची शक्यता वाढते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!