Home / इतर / राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी 5 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी 5 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी 5 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, सातारा

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, सातारा मार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 करीता मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबहेरील अभ्यास दौऱ्याचे जानेवारी 2024मध्ये आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महिला लाभार्थी यांनी 5 जानेवारी 2024 पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावेत.

यामध्ये परराज्यातील कृषि विद्यापीठे, राष्ट्रीय कृषि संशोधन संस्था, फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या खासगी कंपन्या/संस्था, कृषि विभागाची विविध प्रक्षेत्रे, कृषि विज्ञान केंद्रे, हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटर व भारतीय कृषि संशोधन संस्था अंतर्गत संशोधन संस्था सारख्या संस्थांमध्ये जाऊन नव नवीन शोध, प्रगत तंत्रज्ञान, विविध पिक पद्धती, आधुनिक शेतीबाबतची माहिती घेता  येणार आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!