Home / शेती (Agriculture) / रक्त चंदन” – लाल सोन.

रक्त चंदन” – लाल सोन.

रक्त चंदन” लाल सोन.

भारतात विशेष ठिकाणी आढळणाऱ्या लाल चंदनाला विशेष महत्त्व आहे. रक्त चंदन, ज्याला Pterocarpus Santalinus या वैज्ञानिक नावाने ओळखले जाते, हे आंध्र प्रदेशातील जंगलांमध्ये आढळणारे एक झाड आहे, ज्याच्या कारणावरून खूप रक्तपात झाला आहे. चीनमध्ये या झाडाला विशेष मागणी असून, त्यासाठी तस्करीही होत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या झाडांच्या संरक्षणासाठी एक विशेष टास्क फोर्स तैनात करण्यात आला आहे.

रक्त चंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रव पदार्थ असतो, त्यामुळेच या झाडाला “रक्त चंदन” असे म्हटले आहे. या झाडाचे वाळलेले लाकुडही लाल रंगाचेच असते.चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे पण या चांदनाप्रमाणे रक्त चांदनाच्या झाडाला मुळीच सुगंध येत नाही.

हिंदू धर्मात लाल चंदनाचे झाड अतिशय पवित्र मानले जाते. शैव आणि शाक्त पंथाचे पालन करणारे लोक या लाकडाचा पूजेत वापर करतात. रक्त चंदनाला पांढर्‍या चंदनासारखा सुगंध नसतो. ते जोरदार प्रभावी आहे. औषधी गुणधर्मांसोबतच सौंदर्य वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो. महागड्या फर्निचर आणि सजावटीच्या कामासाठीही रक्त चंदन लाकडाला मोठी मागणी आहे. यासोबतच मद्य आणि सौंदर्यप्रसाधनांमध्येही याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याच्या लाकडाची किंमत खूप जास्त आहे. आंतरराष्ट्रीय करारानुसार रक्त चंदन वृक्षांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारताची आहे.

रक्तचंदन वृक्ष सु. ८ मी. पर्यंत उंच वाढतो. तो कमी मातीच्या जमिनीत वाढत असून त्याची वाढ जलद होते. तीन वर्षांत सु. ५ मी.पर्यंत त्याची उंची वाढते. त्याचे खोड सरळ वाढत असून साल खडबडीत असते. पाने संयुक्त व लहान असून त्याच्या लहान संयुक्त पानाला बहुधा तीन एकाआड एक दले असतात. प्रत्येक दल ३–९ सेंमी. लांब असते. फुलोऱ्यात फुले थोडी असून ती पिवळी आणि लहान असतात.

रक्तचंदनाची तस्करीही मोठ्या प्रमाणावर होते. 2.25 लाख हेक्टरमध्ये पसरलेल्या शेषाचलम टेकडीच्या अनेक भागांमध्ये आढळणाऱ्या या विशेष लाकडांची संख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. पाच वर्षांपूर्वी 2015 मध्ये 20 तस्करही चकमकीत मारले गेले होते. यासोबतच मोठ्या प्रमाणात अटकही करण्यात आली आहे. तस्करी आढळल्यास 11 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

रक्तचंदनाचे लाकूड पूर्वापार काळापासून वापरात आले आहे. लाकूड रंगाने गडद लाल, कठीण असून ते चवीला तुरट असते. तसेच त्याला सहजासहजी वाळवी लागत नाही.

रक्तचंदनाच्या लाकूडचा उपयोग

रक्तचंदनाच्या खोडाच्या मध्यभागातील लाकडापासून बाहुल्या, दागिन्यांच्या पेट्या, देवांच्या मूर्ती, बुद्धिबळाच्या सोंगट्या व फर्निचर अशा विविध वस्तू तयार करतात. रक्तचंदन या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते.

पानांचा रस कृमिनाशक व सूक्ष्मजीवरोधी आहे. जखमा स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करतात.

लाकूड सहाणेवर उगाळून त्याचा लेप सांधेदुखी, सूज व त्वचादाह कमी करण्यासाठी लावतात.

जरी या झाडाला सुंगध नसला तरीही या झाडाचे लाकूड मात्र फारच उपयोगी असते. किमती फर्निचर बविण्यासाठी या लाकडाचा वापर केला जातो. त्यामुळे या लाकडाला चीन, जपान, सिंगापूर देशात भरपूर मागणी असते.

रक्तचंदनाच्या लाकडापासून सँटॅलीन नावाचे रंगीत राळेसारखे रसायन मिळते. त्याचा उपयोग औषधांना रंग येण्यासाठी आणि लाकूड, रेशीम व चामडे रंगविण्यासाठी करतात.

रक्तचंदनाच्या लाकूडचा धार्मिक कार्यात उपयोग

चंदनाच्या लकडाप्रमाणे याचे लाकूड होम हवन विधीमध्येदेखील करण्यात येतो. याच्या नैसर्गिक रंगाचा सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी देखील उपयोग केला जातो. रक्त चंदनाचे विविध फेसपॅक बाजारात उपलब्द्ध आहेत. याच्या वापराने चेहऱ्यावरील त्वचा चमकदार आणि उजळ बनते.

रक्तचंदनाच्या लाकूडचा ओषधी उपयोग

रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते.

मुकामार लागल्यामुळे त्या जागी सूज येऊन त्वचा लाल झाली असल्यास ठणके मारतात.अशावेळी रक्तचंदन सहाणेवर पाणी घेऊन त्यावर उगाळून व त्याचा जाडसर लेप सुजेच्या जागी लावतात व तो लेप वाळल्यावर त्यावर रुग्णास सोसवेल इतक्या गरम मिठाचा शेक द्यावा.

 

 

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!