Home / आरोग्य / मूळव्याध -Haemorrhoids

मूळव्याध -Haemorrhoids

मूळव्याध

गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात. दरवर्षी २० नोव्हेंबर हा दिवस जगभर जागतिक मुळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो. हा रोग कोणालाही सहजपणे होतो म्हणून व्यायाम करा, त्यामुळे पचन सुधारते.

या रोगास संस्कृतमध्ये ‘अर्श’ असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत – विनारक्तस्राव व रक्तास्रावासहित. या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्राव झाल्यास रक्त कमतरता ॲनिमिया होतो. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होऊ शकतो. या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे.

मूळव्याधाची कारणे

बद्धकोष्ठता- शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अतिउष्ण पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे मुळव्याध होऊ शकते.

मूलळव्याधाची लक्षणे

  • भूक मंदावणे – शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्त-स्राव होतो या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लाग़तो. परंतु याचा तोटा जास्ती होतो, कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते तसेच मुळव्याधीचा त्रासही वाढतो.
  • अ‍ॅनिमिया- मुळव्याधीमध्ये रक्त-स्राव झाल्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते या अवस्थेला अ‍ॅनिमिया असे म्हणतात.
  • शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना.
  • शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे.
  • गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे.
  • गुदभागी कोम्ब-मोड-कुडी-गाठ येणे.
  • पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहते.
  • रुग्णाचे वजन कमी होते.
  • मुळव्याधीच्या सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.
मूळव्याधावरती घरगुती उपचार
  • हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात. या आजारावर अ‍ॅलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे.
  • गायीच्या सहज पिता येईल अशा १ कप कोमट दूधात अर्ध्या लिंबाचा रस पिळून दूध फाटण्या पूर्वीच त्वरीत प्यावे . हा प्रयोग रक्त मूळव्याधजन्य रक्तस्त्रावाला त्वरीत बंद करतो . उपरोक्त प्रयोग एक किंवा दोन वेळेपेक्षा जास्त वेळा करू नये . आवश्यकता असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
  • रात्री एका वाटीत १ चमचा तूप गरम करून, पातळ करून त्यात साखर घालावी.त्यात अर्धा वाटी पाणी घालून ते प्यावे. सकाळी त्रास कमी होतो.
  • ताजे लोणी खावे. ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.)
  • रक्तस्राव असल्यास निरंजनचे फळ आणून ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करून ते पाणी प्यावे.असे दोन्ही वेळेस करावे.(सकाळी व रात्री)
  • कागदी लिंबू कापून ५ ग्रॅम काथ बारीक वाटून त्या अर्ध्या-अर्ध्या कापलेल्या लिंबावर लावावा व रात्र भर तसाच ठेवावा , सकाळी दोन्ही तुकडे चोखावे. रक्तस्राव बंद करण्यासाठी हे उत्तम औषध आहे, १५ दिवस दररोज हा उपाय करावा.
  • झेंडूची १० पाने आणि ३ ग्रॅम काळी मिरी पाण्यात वाटून गाळून प्यायल्याने मुळव्याध मधून रक्त येणे थांबते.
  • आल्याची एक गाठ वाटून एक कप पाण्यात उकळावी, एक चतुर्थाश पाणी उरल्यावर चूलीवरून उतरून थंड करावे, त्यात एक चमचा साखर घालून रोज सकाळी प्यायल्याने मूळव्याध बरे होतात.
  • एक ग्लास मुळयाचा रस काढून त्यात शुद्ध तुपातली जिलेबी ( १०० ग्रॅम ) टाकून तासभर झाकून ठेवावे, नंतर जिलबी खात – खात मुळयाचा रस पिऊन टाकावा. ८-१० दिवस हा प्रयोग केल्याने मूळव्याध बरे होतात.
  • महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो .
  • कायाकल्प तेलात किंवा जात्यादि तेलात सूती कपडा / कापूस तेलात भिजवून थोडी रात्री गुदा मार्गाच्या आत ठेवावा.
  • नारळाच्या शेंड्या ( भुया ) जाळून राख बनवून चाळून घ्यावी . नारळाचे हे भस्म तीन – तीन ग्रॅम सकाळी , दुपारी उपाशी पोटी ताकाबरोबर आणि सायंकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यावे मूळव्याधीत अपेक्षित फायदा होतो .
  • रुईचा चिक व हळद यांच्या मिश्रणाचा १ ठिबका रोज रात्री मूळव्यधावर लावावा.
मूळव्याधमध्ये पथ्य:-
जास्त तिखट, तळलेले पदार्थ,मासे,अंडी,छोले, मटार,राजमा, उडदाची डाळ, चिकन, धूम्रपान,दारु बंद करणे

 (टीप :- येथे दिलेली माहिती  सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. माहिती In मराठी त्याची हमी देत नाही.)

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!