Home / सरकारी योजना (Government Schemes) / मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही एक महत्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश भारतीय कृषी क्षेत्राला सुरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे आहे. या योजनेच्या मध्यमातून, प्रमुख बंध, तलाव, किनारीपथांच्या आसपास खाणींच्या प्रणाली, छोटे नाले, पाइपलाइन व इतर तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानानुसार कृषीसाठी उपयुक्त प्रकल्प सुरू केले जातात. ह्या योजनेच्या माध्यमातून जमीनीच्या निसर्ग संपर्कात राहून गेलेल्या कृषी क्षेत्रांमध्ये पाण्याची सुरक्षा आणि उपलब्धता सुनिश्चित करण्यात आले आहे. या योजनेमध्ये खर्चाची एकांत मोजणी केली जाते आणि शासकीय व गैर-सरकारी संस्थांचे सहकार्य घेतले जाते, याची प्राथमिकता ठरविली जाते. ह्या योजनेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये खासगी जलसंपदा व नागरी विकास विभागांनी कृषी क्षेत्रात पाणीसाठी काही प्रकल्प सक्रीय केले आहेत.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जाते. शेतकऱ्याचे शेतातील उत्पन्न वाढावे,यासाठी सरकारने ही सिंचन योजना‘ आणली आहे.

राज्यामध्ये  बरीच शेती ही पावसावर अवलंबून असते. त्यातही राज्यामधील काही भागात पाऊस भरपूर कमी पडतो. आश्या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेपुरतं देखील शेतीतून उत्पन्न भेटत नाही. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन, ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना’ सुरु केली आहे. यामुळे कमी पाऊस पडणाऱ्या भागात पिकांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करुन दिली जाते. केवळ पावसावर अवलंबून न राहता पाईप, कालवे, फवारे किंवा इतर मानवनिर्मित साधना मार्फत पाणी आणून, पिकांना पाणी दिल्यास, शाश्वत उत्पन्न घेता येते.  ठिबक आणि तुषार सिंचनचा लाभ पण भेटू शकतो.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा उद्देश 

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना चा वापर करून कमी पाण्यामध्ये शेतकऱ्याला भरघोस उत्पादन घेता यावे. उपलब्ध पाण्याचा पूरेपूर वापर  शेतीसाठी करता यावा, यासाठी सिंचन योजना राबविल्या जातात. राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, या दोघांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.

 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अनुदान किती ?

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने मध्ये ठिंबक आणि तुषार संच बसवण्यासाठी अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ %  अनुदान राष्ट्रीय विकास योजनअंतर्गत आणि  २५ % अनुदान मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन  योजन अंतर्गत  असे ८० % एकूण अनुदान दिले जाते. तसेच बहूभूधारक शेतकऱ्यांना अनुक्रमे ४५% ष्ट्रीय विकास योजन अंतर्गत आणि ३०% मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन  योजन अंतर्गत असे एकूण ७५% अनुदान दिले जाते.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेतून ठिबक व तुषार सिंचन संच बसवण्यासाठी महाडिबीटी संकेतस्थळावरुन 24×7 अर्ज प्रक्रिया सुरु आहेसंपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून हार्डकॉपी सादर करण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन सोडत असल्याने प्रक्रीया संपूर्णपणे पारदर्शी आहे.

योजनेअंतर्गत 5 हेक्टरपर्यंत लाभ मर्यादा राहील.

सर्व पिकांसाठी अनुदान दिले जाते.

शेतकऱ्यांच्या आधार जोडणी केलेल्या बँक खात्यामध्ये अनुदान थेट जमा होते.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने तून सूक्ष्म सिंचन संचासाठी ९०%  पर्यंत अनुदान देण्यात येते.

तर अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून ९०% पर्यंत अनुदान देण्यात येते.

 

अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!