Home / नवीन योजना / मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बँकेतून पैसे कट करू नये बँकांना आदेश

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बँकेतून पैसे कट करू नये बँकांना आदेश

Untitled
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बँकेतून पैसे कट करू नये. सर्व बँकांना आदेश शासनाने काढला आहे.

 

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली असून जुलै व ऑगस्ट, २०२४ या दोन्ही महिनांच्या एकत्रित रु.३०००/- इतका आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांचा आधार संलग्न (Aadhar Seeded) बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने (DBT) अदा करण्यात आला आहे.

तथापि, सदर योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना प्राप्त झालेला आर्थिक लाभ आहरित करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना प्राप्त होण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-

१) “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ (रक्कम) कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये, ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही.
२) सदर रक्कम त्याच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये.
३) काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बैंक खाते तात्काळ सुरु करण्यात यावे व या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी.

उपरोक्त सूचनेच्या अनुषंगाने आपण आपल्यास्तरावरुन संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.

खालील GR पहा 

MLBY GR

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!