मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जात व योजनेत झाले बदल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जात व योजनेत झाले बदल.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत जे बदल झाले आहेत त्या संदर्भात शासनाचा नवीन जी आर आला आहे.

नारी शक्ती दुत ॲपद्वारे माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

सुरुवातीला हे ॲप खूप हँग होत होते. ॲप ओपन होण्यास आणि otp येण्यास खूप वेळ लागत होता.

उपलोड करावी लागणारी कागदपत्रे १ एमबी पेक्षा जास्त असतील तर ती अपलोड होत नव्हती. त्यामुळे नागरिकांना खूप अडचणीचा सामना करावा लागत होता.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जामध्ये आता बदल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अनेकांना अर्ज करतांना अडचणी येत होत्या त्या आता या बदलामुळे येणार नाहीत.

“लाडकी बहिण ऑनलाईन अर्जात झाले 5 बदल.”

नारीशक्ती दूत ॲप सुरळीत चालावे यासाठी काही महत्वाचे बदल शासनाने या अर्जामध्ये केलेले आहे ते बदल खालील प्रमाणे आहेत.

  1. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव हा पर्याय नवीन समाविष्ट करण्यात आलेला आहे.
  2. अर्ज करतांना अर्जदाराचा पत्ता असा शब्द होता तो बदलून आता अर्जदाराचा पत्ता आधारकार्ड प्रमाणे व इतर माहिती असा करण्यात आला आहे.
  3. महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का? पर्याय ॲप अपडेट करण्यापूर्वी नव्हता आता तो नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.
  4. ॲप अपडेट करण्यापूर्वी कागदपत्रे अपलोड करण्याची साईज १ एमबी होती ती आता ५ एमबी करण्यात आली आहे.
  5. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र अपलोड करण्याचा नवीन पर्याय आता आला आहे.

अशा प्रकारचे बदल आता नारीशक्ती दुत ॲपमध्ये करण्यात आले असल्याने हे नारीशक्ती दूत ॲप नागरिकांना अपडेट करून घ्यावे लगणार आहे.

 

सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे एखाद्या महिलेचा नवीन विवाह झाला असेल तर अशावेळी त्या महिलेचे नाव राशनमध्ये येण्यास वेळ लागतो.
अशावेळी अशी महिला उत्पन्नाचा दाखला म्हणून तिच्या पतीचे राशनकार्ड वापरू शकते.
महिलेचा फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष महिला हजार असणे अनिवार्य नाही.
अशावेळी ऑफलाईन अर्जावरील महिलेच्या फोटोचा फोटो काढून अपलोड
Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved