माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन होणार.
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, ब्रिगेडीअर सावंत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजल जाधव आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिकांच्या विविध विषयांसंदर्भात आढावा घेण्यात आला. खारघर येथे माजी सैनिकांसाठी विश्रामगृह, मेस्को महामंडळामार्फत होणारे उपक्रम, माजी सैनिकांचे वेतन, मुंबईमध्ये संग्रहालय उभारणे, सातारा जिल्ह्यातील सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या अपशिंगे गावाला विशेष दर्जा देऊन तेथे विकासकामे करणे, माजी सैनिकांना टोल मध्ये सवलत आदी विविध विषयांबाबत सविस्तर चर्चा झाली.
सैनिकांनी देशासाठी जीवाची पर्वा न करता सीमेवर कर्तव्य बजावले आहे. अशा माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विभागाच्या सचिवांना दिले. माजी सैनिकांच्या विश्रामगृहाला सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर येथे जागा देण्यात आली आहे. तेथे विश्रामगृहाच्या कामाला तातडीने सुरूवात करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन सदैव सकारात्मक असून त्यासाठी विभागाने माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
📝 About Us – Mahiti In Marathi
🌸 आमच्याबद्दल"Mahiti In Marathi" ही वेबसाइट कोणत्याही सरकारी संस्था, केंद्र किंवा राज्य सरकारशी थेट संबंधित नाही. येथे प्रकाशित होणारी सर्व माहिती ही अधिकृत सरकारी वेबसाइट्स, योजना दस्तऐवज, वर्तमानपत्रे आणि विश्वसनीय स्रोतांवर आधारित असते.आमचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या योजना, नोकरी, शिक्षण, शेती, आरोग्य, तंत्रज्ञान आणि इतर उपयुक्त विषयांवरील अचूक, अद्ययावत आणि संक्षिप्त माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.✅ आमची वचनबद्धताआम्ही वाचकांना फक्त विश्वसनीय स्रोतांवर आधारित माहिती देतो.कोणतीही अधिकृत कृती करण्यापूर्वी, वाचकांनी संबंधित योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.आरोग्यविषयक माहिती ही फक्त सर्वसाधारण ज्ञानाच्या स्वरूपात दिली जाते. कोणताही वैद्यकीय निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.🌍 आमचा डिजिटल उपक्रमआजही ग्रामीण व शहरी भागांतील अनेक नागरिकांना सरकारी योजना, शेतीविषयक नवकल्पना, नोकरीच्या संधी, आरोग्यविषयक माहिती आणि ताज्या बातम्यांबाबत योग्य माहिती मिळत नाही.
ही उणीव लक्षात घेऊनच आम्ही "माहिती In मराठी" हा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे.आमच्या माध्यमातून तुम्हाला मोबाईलवरूनच हवी ती माहिती सोप्या, मराठीत आणि विश्वासार्ह स्वरूपात सहज मिळेल.📢 आमच्याशी जोडातुम्ही आमचं कंटेंट तुमच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजातील इतरांना शेअर करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
आम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, ट्विटर आणि युट्युबवरही सक्रिय आहोत.👉 तसेच, तुम्हाला एखादी नवी योजना, सूचना किंवा महत्त्वाची माहिती माहित असल्यास, आम्हाला या ई-मेलवर जरूर संपर्क करा:
📩 mahitiinmarathi@gmail.com