महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना’

 महिला सन्मान बचत योजनाची घोषणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. ही केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या छोट्या बचत योजनांप्रमाणेच एक बचत योजना आहे. ही योजना मध्ये 2 वर्षांसाठी जमा केलेल्या रकमेवर ७.५ टक्के दराने व्याज दिले जाते. महिला सन्मान बचत पत्र योजनेंतर्गत या योजनेत अर्ज करणार्‍या महिलांना 2 लाखांच्या बचतीवर 7.5 टक्के दराने व्याज  दिले जाईल, यामध्ये महिला त्यांच्या ठेवींची बचत करून भविष्यात स्वावलंबी होऊ शकतील. महिलासाठी गुंतवणूकी साठी हा उत्तम मार्ग आहे.

महिला सन्मान बचत पत्र योजना 2023 अर्जासाठी पात्रता पुढील प्रमाणे:

आपल्या देशातील  सर्व महिला या योजने साठी पात्र असतील. योजनेत अर्ज करण्यासाठी वायाची अट कमीत कमी 10 वर्षे किवा त्याहून अधिक वयाच्या मुलीसाठीही खाते उघडले जाऊ शकते.

महिला सन्मान बचत पत्र योजनेचे वैशिष्ट्ये फायदे माहिती करून घ्या

महिलांच्या कल्याणासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या इतर अल्पबचत योजनांप्रमाणेच  ही योजना आहे. या योजनेंतर्गत सरकारने जाहीर केलेला व्याज दर वार्षिक ७.५ टक्के इतका आहे.

या योजनेत अर्जदार एकाच वेळी दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतील. या योजनेअंतर्गत अर्जदार दोन वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात .

या योजनेमध्ये म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजनेद्वारे अर्जदार महिलेने जमा केलेल्या  रकमेवर सरकार करातून सूट देईल म्हणजे ही योजना करपात्र नाही करमुक्त आहे. योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना योजनेत गुंतवणूक करून करात सूट मिळू शकते. या योजनेअंतर्गत १० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलीचे खातेही उघडता येते. महिला या योजनेत बचत करून स्वावलंबी होऊ शकतील.

 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :

१. ओळख पुरावा

२. अर्जदाराचे आधार कार्ड

३. ओळख पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो

४. मोबाईल नंबर

५. ई – मेल आयडी (Email ID)

व्याज गणना :

महिला सन्मान बचत पत्र या योजनेंतर्गत, अर्जदार २ वर्षांच्या कालावधीसाठी पैसे जमा करू शकतो, १ लाखाला ७.५ टक्के व्याज  या प्रमाणे दोन वर्षांच्या कालावधीत, पहिल्या वर्षी २ लाखला १५००० रुपयांचा लाभ लाभ मिळेल, म्हणजेच, अशा प्रकारे, दोन वर्षांसाठी, तुम्हाला दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर योजनेअंतर्गत रु. ३१००० चा लाभ मिळेल.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या  योजनेसाठी देशभरातील बँका आणि पोस्ट ऑफिसमधून अर्ज करू शकता.  बँक आणि पोस्ट ऑफिस मार्फत महिला गुंतवणूक करू शकतात.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved