Home / Trend / ट्रेंड (Trending News & Topics) / महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाय

महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाय

Your paragraph
महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाय

 

महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी एकूण २७ विशेष न्यायालये कार्यरत आहेत. तसेच महिला व बालक अंतर्भूत असलेली बलात्कार व पोक्सो कायद्यातंर्गतची प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्याकरीता १३८ विशेष जलदगती न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे.
सद्य:स्थितीत २० पोक्सो न्यायालये कार्यरत आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यातंर्गत प्रकरणे निकाली काढण्याकरीता मुंबई येथे एक विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे.
महिलांसाठी हेल्पलाईन

 

महिलांनी तक्रार केल्यास तातडीने पोलिस मदत मिळणेसाठी १००, १०३, १०९१ क्रमांकांच्या हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. या हेल्पलाईनमुळे आपत्कालीन परिस्थितीत महिलांना मदत मिळणे शक्य होत आहे.

कम्युनिटी पोलिसिंग ?

 

शाळा व महाविद्यालय परिसरात, गर्दी व निर्जनस्थळी ‘दामिनी’ पथकांद्वारे रस्ते गस्त, दुचाकी, चारचाकी वाहनांद्वारे पेट्रोलिंग करून गुन्ह्यांना प्रतिबंध केला जात आहे. कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमांतर्गत अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याकरिता ‘पोलिस काका’ तसेच ‘पोलिस दीदी’ नेमण्यात आल्या आहेत. निर्भया पथक, भरोसा सेल यासारखे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पीडित महिलांच्या समुपदेशनासाठी १२४ समुपदेशन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. डायल ११२ च्या माध्यमातून तातडीने मदत पुरविण्यात येत आहे.

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!