Home / सरकारी योजना (Government Schemes) / महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) JOB CARD

महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) JOB CARD

महात्मा गांधी रोजगार हमी योजना मनरेगा JOB CARD

महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा)  ‘मागेल त्याला काम या तत्वावर ग्रामीण भागातील कुटुंबातील व्यक्तींना एका आर्थिक वर्षात केंदीय निधीतून १०० दिवसांची रोजगाराची हमी दिली जाते. राज्य शासनाकडून २६५ दिवसाची हमी दिली जाते. असे मिळून वर्षाची ३६५ दिवस रोजगाराची हमी दिली जाते. २ ऑक्टोबर २००९ पासून या योजनेचे नाव महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) या नावाने नामकरण केले.

देशातील गरीब व बेरोजगार कुटुंबे आपल्या उदरनिर्वाहासाठी या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा कमकुवत उत्पन्न गटातील लोकांना त्यांच्याच ग्रामपंचायतीत म्हणजे आपल्या गावातच रोजगार दिला जातो, त्यामुळे स्थलांतराचा प्रश्न बऱ्याच अंशी टळला आहे.

भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची एक खूप मोठी योजना आहे – महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा)

सरकारने प्रत्येकाच्या हाताला रोजगार देण्यासाठी एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला. दिनांक २ फेब्रुवारी २००६ रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ लागू केला.

    • सर्व इच्छुक व्यक्तीचे ओळखपत्र (जॉब कार्ड) फोटोसहीत देणे बंधनकारक आहे.
    • महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्ये कामासाठी अर्ज केल्याच्या १५ दिवसाच्या आत मोफत जॉब कार्ड दिले जाते.
    • महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्येअर्ज केल्याच्या दिवसापासून १५ दिवसांच्या आत जर रोजगार दिला नाही तर, कायद्यानुसार दैनंदिन रोजगार भत्ता राज्य सरकारने द्यायचा असतो.
    • महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्ये कुटुंबातील प्रौढ व्यक्ति अर्जाद्वारे त्याच्या कुटुंबातील सर्व व्यक्तिंची नोंदणी करता येऊ शकते.
    • अंग मेहनतीने काम करण्याऱ्या प्रत्येक कुटूंबातील इच्छूक प्रौढ व्यक्तींनी आपला अर्ज ग्रामपंचायतमध्ये नोंदणीसाठी लेखी किवा तोंडी द्यावा लागतो.
    • महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्ये पुरुष आणि स्त्रिया यांना सामना रोजगार दर दिला जातो.
    • महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्ये घरा पासून ५ किलोमीटरच्या पुढील अंतरावर रोजगार पुरविण्यात आल्यास अतिरिक्त प्रवास मजुरीच्या १०% वाढीव रोजगार पुरविण्यात येतो.
    • महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्ये मजुरांची मजुरी काम केल्यापासून १५ दिवसांच्या आत मजुरांच्या बँक खात्यावर इ – प्रणालीव्दारे किंवा पोस्ट खात्यात जमा केली जाते. विलंब झाल्यास ०.०५% जास्त पैसे मिळतात.
    • महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्ये रोजगाराची नोंदणी अर्ज केलेल्यापैकी एक तृतियांश महिला असणे गरजेचे असते.
    • महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्ये ग्रामपंचायत स्तरावर ५०% खर्चाची विकासकामे या योजने अंतर्गत करणे आवश्यक असते असे बंधन आहे.
    • महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्ये कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार, बरोबर आणलेल्या लहान मुल ६ वर्षांखालील मुलांना सांभाळण्याची सोय इत्यादी सुविधा असायला हव्यात. तसेच, दुखापत झाल्यास रुग्णास सर्व रुग्ण सेवा व दैनिक मजुरीच्या ५०% रुग्ण भत्ता देण्यात येतो. अपंगत्व व मृत्यू झाल्यास रु. ५०,०००/- पर्यंत अनुदान व कुटूंब नियोजनासाठी सवलती देण्यात येतात.
    • अधिकाधिक मजुरांना लाभ मिळण्यासाठी या योजनेत केल्या जाणान्या कामांसाठी कंत्राटदार आणि यंत्रसामुग्री वापरण्यास बंदी आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्येकोण कोणती कामे होतात याची माहिती घेऊ

१. वैयक्तिक कामे

२. सिंचन विहीरी

३. शौचालय

४. शेततळे

५. जनावरांचा गोठा

६. कुक्कुटपालन शेड

७. गाळ काढणे

८ .पांदण/शेत / वन क्षेत्रातील/गावाअंतर्गत रस्ते / पायवाटा तयार करणे

९. फळबाग लागवड करणे (फलोत्पादन)

१०. रेशीम उत्पादन, रोपमाळा व वनीकरण करणे

११. खतनिर्मिती करणे

१२. पशुसंवर्धनाची कामे करणे

१३. जल व घनकचरा व्यवस्थापन करणे

१४. स्वच्छतागृह बांधकाम करणे

१५. मत्सव्यवसायाला चालना देण्याकरिता पायाभूत सुविधा निर्माण करणे

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगासाठी निवड आणि पात्रता –

नरेगा सोबतीची निवड अधिकारी करतात. यासाठी अर्जदाराने ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा लागतो. यानंतर अर्जाची पडताळणी होते आणि नरेगा सोबतीची भरती ग्रामपंचायत द्वारे केली जाते. या सोबतींची संख्या ही ग्रामपंचायतीमधील नरेगा कामगारांच्या संख्येवर अवलंबून असते. यांची निवड प्रक्रिया पात्रता पुरुष असल्यास, किमान आठवी पास आणि महिला देखील आठवी पास असणे आवश्यक आहे. जर या अर्जामध्ये आठवी पास स्त्री उपलब्ध नसेल, तर पाचवी पास महिलेची नरेगा सोबती म्हणून निवड केली जाते.

अर्जदार हा भारताचा कायमस्वरूपी रहिवासी असावा

या योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदाराचे वय १८ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

अर्जदार अकुशल श्रमिक असणे आवश्यक आहे

मनरेगा अंतर्गत जॉब कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
  • उत्पन्नाचा दाखला व प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • पत्त्याचा पुरावा
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!