बेरोजगारांना परदेशात नोकरी आणि 30 लाखाचे पॅकेज, महाराष्ट्र व केंद्र सरकारचा जॉईंट उपक्रम!
भारत-इस्त्रायल मैत्री खूप जुनी आहे. भारत-इस्त्रायल मैत्री 23 सप्टेंबर 1918 पासूनची आहे जेव्हा म्हैसूर, हैदराबाद आणि जोधपूर या भारतीय शहरांतील सैनिक हैफाच्या स्वातंत्र्यासाठी इस्रायलमध्ये लढले होते!
• आजही भारत-इस्त्रायल मैत्री अशी आहे की टाटा, बेल, कल्याणी सारख्या तब्बल 80 भारतीय कंपन्यांसोबत इस्रायलचे संयुक्त उपक्रम सुरू आहेत.
• कृषी, बांधकाम पासून डिफेन्स पर्यंत सर्व क्षेत्रात ही मैत्री दिसते.
• महाराष्ट्रातील तरुण रोजगार आणि नोकरीसाठी जगभरात जात असल्याचं पाहायला मिळतं. डबल इंजिन सरकारकडून आता त्याला प्रोत्साहन दिलं जात आहे.
• महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास विभागानं काही दिवसांपूर्वी युवकांना प्रशिक्षण देऊन जर्मनीला पाठवण्यासंदर्भात निर्णय घेतला होता.
• आता राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाकडून बांधकाम कामगारांना इस्त्रायलला पाठवण्यासाठी पावलं उचलली जात आहेत.
• कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागानं अर्ज मागवले आहेत.
• केंद्र सरकारचा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट इंटरनॅशनल यांच्यावतीनं आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या मंत्रालयानं बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
• महाराष्ट्र सरकारनं काही महिन्यांपूर्वी जर्मनीतील बाडेन-वूटेनबर्ग या राज्यांशी सामंजस्य करार केला होता त्यानुसार कुशल मनुष्यबळ पुरवले जाणार होते. त्यानुसार, महाराष्ट्रातून ट्रक, बस, हलकी व जड वाहने चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून कुशल प्रशिक्षण देऊन जर्मनीला पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर्मनीत वाहन चालवण्यासाठी वाहनचालकांना राहण्याच्या व्यवस्थेव्यतिरिक्त वार्षिक 30 लाख रुपये पॅकेज आहे.
• इस्त्रायलसाठी पण भरघोस पॅकेज व इतर सुविधा या कामगारांना मिळणार आहेत. इस्त्रायल आपल्या नागरिकांची जेवढी काळजी घेतो, तेवढीच काळजी आपल्या भूमीवर काम करणाऱ्या लोकांची पण घेतो. इस्त्रायल हा भारताचा ‘मित्र-देश’ आहे.
• इच्छूक असलेल्या कुशल बांधकाम कामगारांना इस्त्रायलला जायचं असल्यास, ते दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असले तरी चालेल. कामगाराचं वय 25-45 दरम्यान असलं पाहिजे. राज्यामध्ये जिल्हा सत्रावर नोंदणी सुरु झाली आहे.
• जे बांधकाम कामगार इस्त्रायलला जाण्यास इच्छुक असतील त्यांनी जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात संपर्क साधावा.









