Home / सरकारी योजना (Government Schemes) / बायोगॅस बांधणीकरिता अनुदान

बायोगॅस बांधणीकरिता अनुदान

बायोगॅस बांधणीकरिता अनुदान

 

जिल्हा परिषद सेस योजना.

बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू.. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित (ॲनारोबिक) वातावरणात झाली तर बायॉगॅसची निर्मिती होते. सेंद्रिय पदार्थाचे जीवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत झालेल्या विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात. यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो. बायोगॅस गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो.

 

बायोगॅस उपयोग

 

बायोगॅस हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकीत कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते . या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. हेच तत्त्व गोबरगॅस प्रकल्पातही वापरतात. गोबरगॅस हा देखील बायोगॅसच आहे.

 

बायोगॅस हा इंधन म्हणून तयार करता येत असल्याने याची अपारंपारिक उर्जास्रोतात गणना होते. तसेच कचरा निर्मूलन व सांडपाणी शुद्धीकरणामध्ये बायोगॅस हा उप-उत्पादन म्हणून तयार होतो. असे दुहेरी उद्देश साधले जात असल्याने जग बायोगॅसकडे प्रभावी इंधन म्हणून पहात आहे. त्यामुळे बायोगॅसवर आधारित वाहने, रेल्वेगाड्या, तसेच वीजनिर्मिती संच, शेगड्या इत्यादींमध्ये सुधारणांसाठी संशोधन चालू आहे. तसेच बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून जास्तीजास्त बायोगॅसची निर्मिती कशी करता येईल यावरही संशोधन चालू आहे.

 

बायोगॅस योजनेचा उद्देश. :-

 

केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस योजनेंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी केंद्र शासनाकडून लाभार्थींना अनुदान दिले जाते.मात्र बायोगॅस सयंत्र बांधकामासाठी रेती, सिमेंट, पाईपलाईन, वाळू, शेगडी, बांधकाम मजूरी इत्यादीचा खर्च जास्त येतो. जादा खर्चामुळे लाभार्थी सयंत्र बांधण्यापासून परावृत्त होतो. त्याकरिता केंद्र पुरस्कत राष्ट्रीय बायोगॅस योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना पूरक अनुदान देते.

बायोगॅस बांधणीकरिता अनुदान मर्यादा प्रति लाभार्थी रु. 10 हजार पूरक अनुदान देय राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!