पशुपालना साठी सरकारकडून ५० लाख अनुदान
केंद्र सरकार शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायासाठी ५० लाख पर्यंत अनुदान देत आहे. पशुपालन शेतीला पूरक असणारा फायद्याचा व्यवसाय आहे. पशुपालन हा जोडधंदा न राहून हा एक मुख्य व्यवसाय झाला आहे. योजनेतंर्गत पशुपालन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना पशुपालकांना ५० % अनुदान देण्या
या योजनें अतर्गत सरकार शेतकरी आणि पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देत आहे. अन्न आणि चाऱ्याची मागणी आणि उपलब्धता यातील तफावत भरून काढणे, देशी जातींचे संवर्धन आणि सुधारणा करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. या सर्वांशिवाय भूमिहीन, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी उपजीविकेच्या संधींमध्ये वाढ करणे. बेरोजगारी कमी करून तरुण पिढी ला काम व व्यवस्यासाठी प्रोत्सहान देणे.
पशुपालन हा शेतीला पूरक असणारा व्यवसाय आहे सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते. सरकार देखील पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देते. पशुपालनामध्ये गाई, म्हशी, कुक्कुट पालन, शेळ्या, डुक्कर इ. या सारख्या पशुपालनसाठी सरकार अनुदान देत आहे. यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण राहणार नाही. पशुपालन हा जोडधंदा न राहून हा एक मुख्य व्यवसाय झाला आहे. योजनेतंर्गत पशुपालन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना पशुपालकांना ५०% अनुदान देण्यात येते. तसेच सरकार त्यांना बॅंकेकडून कमी दरात कर्जही मिळवून देते.
कोणत्या पशुसाठी किती अनुदान मिळते याची माहिती आपण खाली बघू या
१. शेळी पालन योजना – (१०० + ५) १० लाख रुपये अनुदान, (२००+१०) २० लाख रुपये अनुदान, (३००+१५) ३० लाख रुपये अनुदान, (४००+२०) ४० लाख रुपये अनुदान, (५००+२५) ५० लाख रुपये अनुदान.
२. वराह पालन योजना – अनुदानावर वराह पालन करु शकता. (१०० मादी व २५ नर) ५०% अनुदान.
३. कुक्कुटपालन व्यवसाय – यामध्ये आपण देशी व संकरित जातीच्या , गिरीराज , वनराज, जातीच्या कोंबड्याचे उबवणुकी केंद्र चालू करु शकता. तसेच , १००० + अंड्याची कोंबडी पालन करु शकता ५०% अनुदान.
4. वैरण विकास योजना – अंतर्गत आपण मुरघास बनविणे व पॅकिंग करून विक्री करणे हा व्यवसाय अनुदानावर सुरू करु शकता. तसेच वैरण विटा तयार करून विक्री करणे.५० % अनुदान .
या योजनें अतर्गत देशी गायींच्या संगोपनाला चालना दिली जाणार आहे. या योजनें अतर्गत, सरकारने आता प्राण्यांच्या उपचारासाठी ४,३३२ हून अधिक पशुवैद्यकीय युनिट उघडण्याची व्यवस्था केली आहे. तरुण, शेतकरी किंवा कोणताही व्यावसायिक आता सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन याबद्दल माहिती मिळवू शकतात. आता आपण पहिला तर दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढत आहे. त्यामुळं या व्यवसायूतन मोठ्या प्रमाणावर नफा मिळवणं शक्य झाला आहे. त्यामुळं सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन देशातील तरुण स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतील.
आपल्या देशात ग्रामीण भागात लोक मोठ्या प्रमाणात गाई, म्हशी, मेंढ्या, शेळ्या पाळतात. शेतकर्यांसाठी हे फायदेशीर व्यवसाय आहे. तसेच या प्राण्यांच्या टाकाऊ पदार्थापासून ते शेतासाठी उत्तम खत मिळवतात. याशिवाय मेंढ्या, बकरी मांस बाजारात विकून चांगला नफा कमावता येतो.
अर्ज कसा कराल
अर्ज करण्यासाठी
htpps:// www.udymimitra.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी .
सदर योजने विषयीची सखोल माहिती करून घेणे साठी पशुसंवर्धन विभागाच्या www.ah.maharshtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा भेट द्यावी






