पंपसंच व पाईप साठी अनुदान 

पंपसंच व पाईप साठी अनुदान
पंप संच व पाइप लाइन साठी अनुदानपंप संच

राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य या योजने अंतर्गत शेतकरी यांना विद्युत पंप/ डिझेल पंप खरेदी करणेसाठी ५०% कमाल 10,000 रु. अनुदान आहे. पाईप – पाण्याच्या स्रोतापासून पाणी वाहून नेण्यासाठी पाइप लाइन खरेदी साठी खर्चाच्या ५०%,  अनुदान आहे. हया मध्ये पण २ प्रकार आहेत ते पुढील पमाणे:-


१. एचडीपीई पाइप साठी  कमाल रु. ५० प्रती मिटर याप्रमाणे ६ मिटर च्या पाइप साठी ३०० रु. अनुदान.

२. पिव्हिसी पाइप करिता कमाल  रु. 35 प्रती मिटर याप्रमाणे ६ मिटर च्या पाइप साठी रु. २१० इतके अनुदान मिळते.

या योजने अंतर्गत एका  शेतकर्यला जास्तीत जास्त ५० पाइप देण्यात येतात. तसेच  कमीत कमी रुपये १,५०,०००/-  अनुदान देण्यात येते.  पंपसंच व पाईप साठी अनुदान अनुदान मिळवण्यासाठी अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयत करवा

पंप संच व पाईप (पोकरा अंतर्गत)

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – पाणी उपसा साधने (पंपसंच) व पाईप-

पंप संच व पाईप (पोकरा अंतर्गत) इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करवा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी जेसे की ७ /१२ उतारा ८अ चा उतारा.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – पाणी उपसा साधने (पंपसंच) व पाईप-लाभार्थी पात्रता

शेतकऱ्याला तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक आहे.

कृषि अधिकारी (उपविभागीय) यांनी ऑनलाईन पूर्व संमती दिल्यानंतर पंप संच व पाईप खरेदी करावी.

अनुदान मिळण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेकडील देयके शेतकऱ्याने स्वतःचे स्वाक्षरी करून अधिकृत वेबपोर्टल ऑनलाइन अपलोड करावे.

ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी समूह.

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे, परंतू पाणी उपसा साधन नाही अश्या शेतकऱ्यांना लाभ देय.

आधी पाणी उपसा साधन असलेले तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.

शेतकऱ्यांना त्यांच्या पसंती नुसार कोणत्याही दुकानदार,  पुरवठादार संस्थांकडून पंप संच व पाईप खरेदी करण्याची मुभा राहील.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अर्थसहाय्य

पंप संचकरीता (विद्युत पंप व डिझेल इंजिन ५ HP पर्यंत)

२ ते ५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना ६५%,  कमीत कमी रुपये १३,०००/- अर्थसहाय्य.

प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना ७५%,  कमीत कमी  रुपये १५,०००/- अर्थसहाय्य देय आहे.

पाईप करिता (अनुदान – HDPE – रु.५०/मी. PVC – रु.35/मी. HDPE laminated – रु.20/मी.)

प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना ७५ %,  कमीत कमी  रुपये  २२,५००/- अर्थसहाय्य देय आहे.

२ ते ५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना ६५%,  कमीत कमी  रुपये   १९,५००/- अर्थसहाय्य देय आहे.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved