Home / सरकारी योजना (Government Schemes) / पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा उद्देश अपघातग्रस्त व्यक्तींना विमा सुरक्षा देने हा आहे.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत अपघाती मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास विमाधारकाला 2 लाख रुपये भेटतील. आणि अंशतः अपंग असल्यास १ लाख रुपयांची रक्कम भेटेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बचत खात्याचा तपशील द्यावा लागेल, त्यानंतर दरमहा तुमच्या खात्यातून १  रुपये प्रीमियम कापला जाईल म्हणजे वर्षला रुपये १२/- हप्ता. ही योजना लोकांसाठी, विशेषतः गरीब लोकांसाठी महत्त्वाची ठरू शकते. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा  लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान असणं अनिवार्य आहे.

अर्जदाराला त्याचं आधार कार्ड ज्या बँकेत बचत खाते आहे त्या बँकेशी  लिंक करावं लागेल, त्यानंतर दरवर्षी 1 जूनपूर्वी एक फॉर्म भरून बँकेला द्यावा लागेल. या योजनेत १ जून ते ३१  मे पर्यंत एक वर्षाचे कव्हर आहे, ज्याचे दरवर्षी बँकेमार्फत नूतनीकरण करावं लागतं. जर एखाद्याचं संयुक्त खातं असेल तर अशा परिस्थितीत सर्व खातेदार या योजनेत सामील होऊ शकतात. या योजनेत फक्त एक बँक खातं समाविष्ट केलं जाऊ शकतं. योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी, खातेदाराला ज्या बँकेत त्यांचं खातं आहे, त्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेवर लॉग इन करावं लागेल.

सर्व प्रकारच्या नियुक्त विमा कंपन्या आणि बँकांमध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली आहे. याशिवाय इतर विमा कंपन्या ज्या विविध अटींसह ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चालवत आहेत त्यांचाही या योजनेत समावेश आहे.

पंतप्रधान सुरक्षा विमा  योजनेची  ठळक वैशिष्ट्ये
  • रुपये १२ वार्षिक हप्ता
  • अट – फक्त बँकेत खाते (बचत खाते) असणे आवश्यक कोणीही लाभ घेवू शकतो
  • लाभार्थी वयोगट १८ ते ७०
  • लाभ – जखमी झाल्यास १ लाख रुपये व मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे फायदे

१८ -७० वयोगटातील लोक (महिला किवा पुरुष) प्रधानमंत्री सुरक्षा विमा (PMSBY) योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या विमा रकमेसाठी, धारकाला वर्षाला फक्त १२/- रुपये म्हणजेच प्रीमियम म्हणून फक्त १/-  रुपये प्रति महिना भरावे लागतील.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना बँकेशी जोडण्यात आल्याने प्रीमियमची रक्कम ही खात्यातून कापली जाईल (बँक खात्यातून आपोआप डेबिट केली जाईल)

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आतापर्यंतची सर्वात स्वस्त विमा योजना आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही योजना देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना प्रदान करते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने मध्ये प्रत्येक वर्षी, २५ मे ते ३१ मे पर्यंत, नूतनीकरण प्रीमियम देखील बँक खात्यातून कापला जाईल, जोपर्यंत खातेदाराने रद्द करण्याची सूचना दिली नाही तो पर्यंत.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची विम्याची रक्कम लोककल्याण निधीतून दिली जाईल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • वय प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खाते पासबुक – बँक खाते उघडण्यासाठी हि माहिती वाचा
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अर्ज प्रक्रिया

पंतप्रधान सुरक्षा विमा  योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन या योजने साठी अर्ज करता येईल.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी पंतप्रधान सुरक्षा या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अधिकृत वेबसाइटवर मुख्यपृष्ठ उघडेल.

अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला फॉर्म पर्यायावर क्लिक करावे लागेल.

फॉर्म पर्यायावर क्लिक केल्यावर अर्जाची PDF तुमच्या समोर उघडेल. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी गेल.

अधिकृत वेबसाइट वरील अर्जाची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता.

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून अर्ज बँकेत जमा करावा लागेल.

पंतप्रधान सुरक्षा विमा  योजनेची अधिकृत वेबसाइट :- https://jansuraksha.gov.in

 

 

 

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!