धान्य कोठार पेव (बळद)

धान्य कोठार पेव (बळद)

मित्रानो  शेतकरी शेत माल पिकवतो आणि बाजारात न्हेवून विकतो सुगीच्या दिवसात सर्वच शेतकऱ्यांचा मला तयार झाल्यामुळे बाजारातील आवक वाढते, आणि अर्थशास्त्र नियमा प्रमाणे पुरवठा वाढला  की वस्तूची किमत कमी होते त्यामुळे भाव पडतात. शेतकर्यांना योग्य दर भेटत नाही शेतकरी तोट्यात जातो आणि हे वर्ष न वर्ष चालू आहे. पण काही व्यापारी मोठ्याप्रमाणावर शेत माल खरेदी करून ठेवतात. साठवलेला माल पुढे ते वाढीव दराने विकतात नफा कमवतात. पण हे पूर्वी होत घडत नव्हते. आपल्या पूर्वजांनी व्यापाऱ्यांचा धूर्तपणा ओळखून व बाजारपेठेचासुगीच्या दिवसाचा अभ्यास करून किवा स्वताचे संरक्षण करण्यासाठी व धान्य सुरक्षित राहण्यासाठी  धान्य कोठार पेव / बळद निर्माण केले होते.

आजूनही आपण बघतो गाव मध्ये जुन्या वाड्या मध्ये असे धान्य कोठार पेव (बळद) असतात.  दुष्काळ, निसर्गाचा लहरीपणा, रोगराई महामारी, गावावर पडणारे दरोडे, चोऱ्यामाऱ्या, विविध आक्रमणे आली की प्रथम धनधान्याची लुट करून घेऊन जायचे. इतिहासात अश्या अनेक प्रकरणाची नोंद आहे. आक्रमणाच्या कालखंडात आक्रमकांपासून किवा इतर कोणत्याही त्रास पासून आपले धान्य सुरक्षित रहावे व याचा ठावठिकाणा शत्रूला लागू नये म्हणून ही कल्पना त्यावेळेच्या कालखंडात आपल्या लोकांनी राबवली होती. वर्षभर शेतात काम करून निर्माण झालेले धान्य आपल्या पासून गेले तर वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा ही मोठी समस्या त्याकाळी होती. म्हणून आपल्या पूर्वजांनी वाड्यातच जमीनीखाली गुप्तपणे धान्य साठविण्याची धान्य कोठार पेव (बळद) निर्माण केले.

ग्रामीण भागात धान्य साठवणुकी मध्ये २ प्रकार आहेत
१) लहान प्रमाणावरील साठवण :-

पोती, कणग्या, पत्र्यांचे पिंपे इत्यादींचा समावेश आहे.

२) मोठ्या प्रमाणावरील साठवण: –

धान्य कोठार पेव (बळद) पेव म्हणजे जमिनीमधून पाणी झिरपून आत येणार नाही असे तयार केलेले तळघर.

धान्य कोठार पेव (बळद) कश्याप्रकारे होती हे आपण जाणून घेऊ या जमिनीमध्ये ठराविक खोलीपर्यंत एक गोल खड्डा खणतात. त्यामध्ये प्रथम दोन फुट उंचीपर्यंत दगडांचे सोलिंग करत. त्यावर जाड मुरूम टाकून परत वाळू टाकली जायची. वाळूवर माती, शेण, राख, पांढरी माती, लाल माती यांचे मिश्रण करून लेप देत. त्यावर घुमटाकार विटचे बांधकाम केले जायचे. नंतर धान्य कोठार पेव (बळद) आतून शेणा मातीने सारवून घेत असत.

धान्य कोठार पेव (बळद) हे पांढऱ्या शुभ्र असलेल्या मातीतच (चिकन माती) सुरक्षित  राहू शकते हे पूर्वजांना माहिती होते. ह्या मातीत पावसाचे किंवा अन्य मार्गाने आलेले पाणी कमी झिरपते. पाणी धान्य पर्यंत पोचत नाही धान्य सुरक्षित रहाते, पांढरी चिकण माती पडत नाही. ही माती  थरचे असलेले  वजन सहज पेलू शकते. धान्य कोठार पेव (बळद) पेव  ढासळत नाहीत.

धान्य कोठार पेव (बळद) यांची रचना सर्वात वर चार- सहा फुटांच्या थरात पेवांचे तोंड सरळ उभट असते. ते सर्व बाजूंनी बांधून घेतले जाते. त्याच्या खाली या तोंडापेक्षा थोडा कमी व्यासाचा मार्ग असतो. तिथ आढी बांधतात. या ठिकाणी पेवाचं झाकण असत. आढी म्हणजे विटांचे बांधकाम. पेवाचे तोंड आयताकृती दगडाने किंवा बंद केले जाते. त्यावर कडबा / गवत /माती टाकून तोंड बुजवून टाकतात. जेणेकरून आत मध्ये वॉटरप्रूफ बनते. पेवाचा व्यास पंधरा फुटांपासून ते सत्तर फुटापर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्त असतो. व उंची दहा फुटांपासून ते जमिनीमध्ये हार्ड दगड लागेपर्यंत. एका धान्य कोठार पेव (बळद) मध्ये साधारणत १५० ते २५० क्विंटल धान्य बसते.

धान्य कोठार पेव (बळद) धान्य साठवण्याचे फायदे

धान्य कोठार पेव (बळद) धान्य साठवले की जास्त दिवस टिकून राहते. धान्याला कीड लागत नाही, कारण धान्याची साठवणूक जीत पर्यंत ऑक्सिजन पोचतो थित पर्यंत करत नाही जिथून ऑक्सिजन नसतो तिथून साठवणूक केली जाते. या मध्ये उष्णता असते धान्य चांगले राहते. धान्य कोठार पेव (बळद) बंद केल्यानंतर आतील हवा ऑक्सिजन हळू हळू कमी होतो  व धान्य कोठार पेव (बळद) आतून शीत राहते. एखादे धान्य कोठार पेव (बळद) सकाळी उघडले की दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी त्यात पूर्ण हवा खेळलेली आणि पुरेसा ऑक्सिजन जमा झाला असल्यावरच धान्य काढण्यासाठी आत उतरत असत. त्यासाठी एक परीक्षा घेत असत. त्यात कंदील सोडला जातो. त्याची ज्योत टिकली की धान्य काढण्यासाठी माणूस आत उतरत असे. तोपर्यंत कोणी आत जाऊ शकत नसे. गेलाच तर ऑक्सिजन अभावी त्याचा मृत्यू ओढवतो. पेवात चांगलीच उष्णता असते.

धान्य कोठार पेव (बळद)  चा फायदा पूर्वीच्या लोकांनी चांगला करून घेतला होता. एकद्या वर्षी निसर्गाच्या  लहरीपणा पाऊस झाला नाही तर हया साठा करून ठेवलेले धान्य उपयोगात येत होते.

आता मोठाले गोदाम आहेत शीतगृह आहेत पण धान्य कोठार पेव (बळद)  सारखे कमी आणि अति सुरक्षित शेत माल राहत नाही आपण बगतो बातम्या मध्ये किती शेत माल नासाडी होते. सरकारी गोदामातून किती धान्य नासाडी होते (ती होते का जाणून बुजून केली जाते हा भाग वेगळा) पण ही साधना मध्ये शेत माल साठवून ठेवणे शेतकर्यान  परवडत नाही किंवा याबद्दल पुरेशी माहिती नाही आणि ही खर्चिक बाब आहे. गोदामाचे भाडे शेत मालाचा इन्सुरंस  त्यामूळे शेतकरी सुगीच्या दिवसात शेत माल विकतो ह्याचा फायदा काही धूर्त लोक, व्यापारी लोक उचलतात हे सरस चालू आहे.

धान्य कोठार पेव (बळद) धान्य साठवलणे ही पद्धत जरी जुनी असली तरी ती फायद्यची आणि कमी खर्चिक आहे शिवाय आपला माल आपल्यापाशी सुरक्षित राहतो. जास्त जागा ही लागत नाही रोगाचा प्रधुर्भाव होत नाही त्यावर खर्च ही होत नाही ऊन वारा पाऊसा पासूनही बचाव होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे व्यापारी वर्गा कडून होणारी फसवणूक थांबेल  सुगीच्या दिवसात शेत मालाला भाव नसेल तर शेत माल कमी खर्चात साठवणूक करून ठेवता येतो. एक लक्षात ठेवा की  शेत माल जर जरा जास्त दराने विकला गेला तर तो निव्वळ नफा असतो. शेतकर्याने आता हार्ड वर्क बरोबर स्माट वर्क ही केले पाहिजे.

आपल्या समस्या आपणच सोडवल्या पाहिजेत दुसरा कोण ही  तुमच्या मदतीला येणार नाही कितीही कायदे करुदे हमीभाव होऊदे न होऊ दे काही लोक त्यातून पळवाट काढणार स्वतःचा फायदा करून घेणार.

Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved