Home / सरकारी योजना (Government Schemes) / दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा

दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा

Your paragraph
महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिलासा

आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्यामुळे राज्यात दूध खरेदी विक्री दरावर मोठा परिणाम झाला होता. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी गायीच्या दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव आणि शासनाकडून 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. म्हणजे गायीच्या दुधाला एकूण ३५ रुपये लिटर ला भाव भेटेल. दुधाचे नवीन दर 1 जुलै पासून लागू होतील. याबाबतचे निवेदन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केले.

 

राज्यभरातील सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघ,आणि दूध उत्पादक शेतकरी यांची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यात विखे पाटील यांनी दूध उत्पादक शेतकरी, दूध संघाच्या समस्या जाणून घेतल्या. राज्यातील सर्व खासगी आणि सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रूपये भाव देण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच सरकारकडून शेतकऱ्यास 5 रुपये प्रतिलिटरचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करेल. त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिलिटर 35 रुपये मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल,असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

 

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरची मागणी कमी झाल्याने त्यांचे दर घसरत आहेत. यामुळे राज्यात दूध पावडरचा मोठा साठा शिल्लक आहे. म्हणून राज्यातील जे दूध प्रकल्प भुकटी निर्यात करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिकिलोसाठी 30 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही अनुदानाची मर्यादा 15 हजार मॅट्रिक टनाकरिता असणार आहे.

अनुदान प्राप्त करताना अवश्यक कागद पत्रे

१)आधार कार्ड

२)मोबाईल नंबर

३)बँक अकाउंट नंबर, बँकेचा आयएफसी कोड (आधार कार्ड लिंक असलेला बँक अकाउंट नंबर द्यावा)

५) आपला युनिक आयडी नंबर

फोर्म अचुक लिहावा त्यामध्ये कुठलीही चूक होऊ नये अन्यथा आपले अनुदान जमा होण्यास वेळ लागेल

फॉर्म भरताना त्या गायीची जात डॉक्टरांकडून एचएफ किंवा जर्सी किंवा खिलार जे डॉक्टरांनी ऑनलाईन केली असेल ती लिहून घ्यावी व ती गाय दूध देते किंवा नाही याचीही माहिती लिहावी

योजेने चा फायदा सर्व पात्र शेतकरी वर्गाने घ्यवा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!