Home / शेती (Agriculture) / जाळून ऊस देताना होत आहे शेतकरी वर्गाचे तोटा

जाळून ऊस देताना होत आहे शेतकरी वर्गाचे तोटा

जाळून ऊस देताना होत आहे शेतकरी वर्गाचे तोटा
जाळून ऊस देताना होत आहे शेतकरी वर्गाचे तोटा 

 

एक वर्षापासून ते दीड वर्षापासून जिवापाड जपलेल्या उसाला थरथरत्‍या हाताने काडी लावली लागते कारण ऊस हंगाम अंतिम टप्प्यात जसा येतोय तशी ऊस उत्पादकांच्या मनामध्ये भीतीच वातावरण होतेय त्यात कडक उन्हाळा. ऊस तोडणी यंत्रणा शेतात येते आणि ऊस न तोडण्याची कारणाचा पाढा वाचते ‘ऊस खराब आहे ऊस पडलाय, ऊसाला वाडे नाही, शेताला वाट नाही अशी अनेक कारणे शोधली जातात आणि शेवट एका वाक्यावर होतो.मालक, तुमचा ऊस पेटवून न्हेतो नाहीतर राहूद्या.

संध्‍याकाळ झाली की उसाला काडी लावायची ती पण मालकाने ऊस पेटवल्यावर आजूबाजूला काय नुसकान झाले तर ते पण मालकावर आणि सकाळी चिपाड झालेला उसावर तोडायचा. ऊस पेटल्यामुळे काही पाचट नसते लगेच तोडून मोकळे. पण शेतकार्याच्या नुकसानीला जबाबदार कोण याचे उत्तर ना कारखान्याकडे आहे ना तोडणी यंत्रणाकडे.

 

ऊस तोडणी यंत्रणेला ऊस तोडल्याचे समाधान, त्यांचा पैसा चालू तर कारखानाला ऊस मिळाल्‍याचे. या खेळात शेतकरी वर्गाचा जीव मात्र कासावीस होतोय. वर्षभर वेळेवर पाणी देणे, खते देणे दिवसरात्र जागलेल्या शेतकार्याची मात्र क्रूर थट्टा होतेय. आता हंगाम शेवट आलाय, काय करता बघा असा इशारा आला, की हात आपोआपच काडेपेटीकडे जात असल्याचे वेदनादायी चित्र आहे. बर ऊस जाळ्यावर हवेत धूर आणि इतर प्रदूषक घटक पसरतात. यामुळे श्वसनाचे आजार वाढतात. ऊस जाळल्याने जमिनीतील जीवाणू नष्ट होतात आणि जमिनीची सुपीकता कमी होते. ऊस जाळल्याने उसाची गुणवत्ता कमी होते आणि त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी होते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होते. जाळलेला ऊस गाळपासाठी आणल्यानंतर त्यातून मिळणारी साखर कमी प्रतीची असते. यामुळे कारखाने शेतकऱ्यांना कमी किंमत देतात.

 

यंदा शेतकऱ्यांचा ऊस कारखाने सहजपणे तोडून नेतील असा समज होता. पण जसा हंगाम सुरू झाला तशी उत्‍साहाची जागा निराशेने घेतली. कारखान्याचा माणूस घरापर्यंत येईल हा अंदाज खोटा ठरला. उलट कारखाना स्लीपबोय ते कारखान्यांच्या चेरमनपर्यंत विनती करत फिरावे लागेले शेतकर्याला. आता तर शेतकरी जक मारली आणि ऊस पिक घेतल अश्या मानसिकते मध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!