Home / आरोग्य / जंकफूड खाण्याचे फायदे आणि तोटे

जंकफूड खाण्याचे फायदे आणि तोटे

जंकफूड खाण्याचे फायदे तोटे
जंकफूड खाण्याचे फायदे आणि तोटे

 

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत जंकफूड खाणे हा जीवनाचा एक भाग बनला आहे. पिझ्झा, बर्गर, चिप्स, नूडल्स, फ्रेंच फ्राईज यांसारखी खाद्यपदार्थ सहज उपलब्ध असल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. जरी जंकफूड सोयीस्कर आणि स्वादिष्ट असले तरी, त्याचे फायदे आणि तोटे समजून घेणे आवश्यक आहे.

 

जंकफूड खाण्याचे फायदे
  1. सोयीस्कर आणि वेळ वाचवणारे

जंकफूड सहज आणि झटपट तयार होते. व्यस्त जीवनशैली असलेल्या लोकांसाठी ही मोठी सुविधा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती जंकफूड च्या आहारी गेलेल्या दिसून येत आहेत. कारण ते सहज आणि कमी वेळात उपलब्ध होते. ओर्डर केल्या केल्या ते ऑफिस मध्ये किंवा आपण जिथे आहे त्या ठिकाणी मिळते.

 

  1. स्वादिष्ट आणि आकर्षक

जंकफूड हे चवदार असते. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते आवडते. हल्ली लहान मुलांचे पण जंकफूड खाण्याचे  प्रमाण खूप वाढले आहे. पण याचे त्यांच्या आरोग्यावर घटक परिणाम होवू शकतात हे पालकांच्या लक्षातच येत नाही.

 

  1. विविध प्रकार उपलब्ध

वेगवेगळ्या प्रकारच्या जंकफूडमुळे लोकांना आपली पसंती निवडण्याचा पर्याय मिळतो. आपल्याला आवडेल त्या चवीचा पदार्थ आता बाजारामध्ये उपलब्ध होतोय.

 

  1. कमी खर्चात सहज मिळणारे

अनेकदा जंकफूड हे स्वस्त आणि परवडणारे असते. हे अतिशय कमी खर्चात पोटभर मिळते म्हणून लोक जंकफूड कडे आकर्षित होत आहेत.

 

जंकफूड खाण्याचे तोटे
  1. पोषणमूल्याचा अभाव

जंकफूडमध्ये आवश्यक पोषक तत्त्वे जसे की प्रोटिन्स, फायबर, व्हिटॅमिन्स, आणि खनिजे यांचा अभाव असतो.त्याला विशिष्ट चव देऊन ते विकले जातात.

 

  1. लठ्ठपणा आणि वजनवाढ

जंकफूडमध्ये चरबी आणि साखर जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि वजनवाढ होते. अतिप्रमाणात जंकफूड खाल्याने आरोग्यावर परिणाम होतात.

 

  1. हृदयविकाराचा धोका

जंकफूडमध्ये ट्रान्स-फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.

 

  1. पचनसंस्थेवर परिणाम

फायबरच्या कमतरतेमुळे जंकफूड पचनास त्रासदायक ठरते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. कधीकधी अतिप्रमाणात जळके तेल वापरल्याने त्या पदार्थाला तेलकट वास येतो. त्यामुळे ते पचनास त्रासदायक ठरते.

 

  1. आयुष्य कमी होण्याची शक्यता

जंकफूडचे सातत्याने सेवन केल्यास दीर्घकाळासाठी आरोग्य धोक्यात येऊ शकते आणि आयुर्मान कमी होऊ शकते.

 

  1. मधुमेह आणि इतर व्याधी

अतिसाखरेमुळे मधुमेह, तसेच जास्त मिठामुळे उच्च रक्तदाब यासारखे आजार होण्याची शक्यता वाढते.

 

निष्कर्ष

जंकफूड खाणे वेळ आणि चवीच्या दृष्टीने सोयीस्कर असले तरी, त्याचा अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे जंकफूड खाणे मर्यादित ठेवून, पोषक आणि सेंद्रिय अन्नाचा समावेश आपल्या आहारात करणे अधिक फायदेशीर ठरते.

 

“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे!”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!