कृषी यांत्रिकीकरण योजना

कृषी यांत्रिकीकरण योजना 

कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत अनेक प्रकारची यंत्र तसेच शेती उपयोगी संसाधने, उपकरणे यांच्या खरेदी करिता अनुदान देण्यात येते. जसे की, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलीत अवजारे, अनेक प्रकारची यंत्रसामग्री. या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळण्याकरिता https://mahadbt.maharashtra.gov.in/ पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असतो.

कृषी यांत्रिकीकरण योजना बद्दल माहिती

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गत कमी खर्चात जास्तीत जास्त शेती उत्पादनासाठी यांत्रिकीकरण आवश्यक आहे. कृषी यांत्रिकीकरण म्हणजे जेथे शक्य असेल तेथे यांत्रिकीकरणाद्वारे प्राणी आणि मानवी शक्तीची पुनर्स्थापना. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत यांत्रिकीकरणासाठी कर्ज व इतर सुविधा पुरविल्या जातात ज्यानुसार शेतकरी कमी किंमतीत जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतील. कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ट्रॅक्टर, औषध फवारणी पंप, डस्टर, सिंचन पंप इत्यादी सुविधा ग्रामीण बँकेमार्फत पुरविल्या जातात. अशाप्रकारे, मागील अनेक  वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब करण्यास प्रवृत्त करणे या उद्देशाने प्रकल्पांतर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील काही वर्षातील हवामानातील बदल व पर्जन्यमानातील अनिश्चितता जसे पावसाचे एकूण कमी दिवस, कमी वेळेत जास्त पाऊस,  सरासरी पेक्षा कमी पाऊस,कधी कधी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पावसाचा एक एक महिना खंड, मान्सूनचे उशिरा आगमन व वेळेपुर्वी निघून जाणे, गारपीट व अवकाळी पाऊस या सर्व हवामानातील बदलामुळे पाणी टंचाई (पिण्यासाठी, जनावरांसाठी, पिकांसाठी), पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेत घट, कृषी उत्पादन वाढीचा दर घटणे, अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांमध्ये नैराश्य इत्यादि विपरीत परिणाम दिसून येत आहेत. या सर्व परिणामामुळे वेळेत पेरणी न होणे, मजुरांची कमतरता, जमिनीची धूप संभाव्य दूरगामी परिणाम दिसून येत आहेत. लागवडी योग्य जमिनीतून किंवा घटलेल्या लागवडी योग्य जमिनीतून भविष्यात अधिक उत्पादन व अधिक उत्पन्न घेण्यासाठी, तसेच शेतकर्यांना व प्रामुख्याने लहान व किरकोळ शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी पारंपरिक शेतीपद्धतीतून आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज आहे.

महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत मिळणारे अनुदान
उपकरण मिळणारे अनुदान
पंपसेट (७.५ H.P पर्यंत) निर्धारित किमतीच्या ५०% अथवा जास्तीत जास्त १०००० रुपये
ट्रॅक्टर (40 H.P पर्यंत) निर्धारित किमतीच्या 20% अथवा जास्तीत जास्त ४५००० रुपये
पॉवर टीलर (८ H.P किंवा त्यापेक्षा जास्त) निर्धारित किमतीच्या ४०% अथवा जास्तीत जास्त ४५००० रुपये
उस तोडणी यंत्र निर्धारित किमतीच्या ४०% अथवा जास्तीत जास्त २०००० रुपये
पॉवर टीलर (८ H.P किंवा त्यापेक्षा जास्त) निर्धारित किमतीच्या ४०% अथवा जास्तीत जास्त ४५००० रुपये
पॉवर थ्रेशर निर्धारित किमतीच्या ४०% अथवा जास्तीत जास्त २०००० रुपये
विनोइंग फैन, चेफ कटर (मानवचालित) निर्धारित किमतीच्या २५% अथवा जास्तीत जास्त २००० रुपये
ट्रॅक्टर फवारणी यंत्र निर्धारित किमतीच्या २५% अथवा जास्तीत जास्त ४००० रुपये
रोटावेटर निर्धारित किमतीच्या ५०% अथवा जास्तीत जास्त ३०००० रुपये
 कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी  ऑनलाइन अर्ज कसा करवा

कृषी यांत्रिकीकरण योजना चा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.

  1. वेबसाइट वर कृषी विभागाचे मुखपृष्ठ उघडेल.
  2. मुखपृष्ठावरच तुम्हाला Online Application किंवा Link 2 असे पर्याय दिसतील तुम्हाला त्यापैकि कोणत्याही एका पर्यायवर क्लिक करावे लागेल.
  3. आता तुमच्या समोरकृषी यांत्रिकीकरण योजना चा अर्ज उघडेल.
  4. अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल.
  5. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हालाSubmit Button वर क्लिक करावे लागेल.
कृषी यांत्रिकीकरण योजनासाठी लागणारी कागदपत्रे 
  1. शेतकर्‍याचे आधारकार्ड.
  2. ७ /१२ आणि ८ अ. चा उतारा
  3. बँकेचे पासबुक.
  4. जे यंत्र खरेदी केले आहे त्याचे बिल. (बिल जमा करताना ते असल प्रत जमा करावी)
  5. जर ट्रॅक्टर शेतकर्‍याचे नावावर असेल तरच त्यावर अनुदान मिळेल.
कृषी यांत्रिकीकरण योजनासाठी लागणारी पात्रता
  1. शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
  2. शेतकर्‍याच्या नावावर जमीन असावी.
  3. अर्जदार जर अनुसूचीत जाती किंवा जमाती या विभागात मोडत असेल तर त्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  4. ट्रॅक्टर साठी अनुदान हवे असेल तर शेतकर्‍याच्या नावावर ट्रॅक्टर असावे.
Share on WhatsApp

नवीन योजना

Mahiti In Marathi website is developed for specially maharashtra farmers, to share various schemes in their region like shetkari yojana, sarkari yojana, krushi yojana, GR, Anudan etc.
© Mahiti In Marathi | All rights reserved