Home / शेती (Agriculture) / कृषी पुरस्कार :- वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

कृषी पुरस्कार :- वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

जे शेतकरी त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक-यांना देतील आणि शेती उत्पादन

वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील, तसेच इतर व्यक्ती /संस्था ज्या स्वतः शेती करीत

नाहीत किंवा ज्यांची स्वतःची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी

करतात अशा शेतक-यांना/ व्यक्तीना / संस्थांना, त्याचप्रमाणे कृषि क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग उदा.

कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, गांडूळ शेती इत्यादीं मधील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी

करणा-या व्यक्ती तसेच खेडयांमधुन परसबाग वृध्दीगत करणा-या महिला, कृषि विकास मंडळ ज्या गावात सक्रिय

आहे. अशा मंडलाचे क्रियाशील सभासद / प्रमुख, इत्यादी व्यक्ती / गट / संस्था / शेतकरी यांना राज्य

शासनाच्या कृषि विभागामार्फत वसंतराव नाईक शेतीमित्र हा बहुमान प्रदान करुन सन्‍्मानित करण्यात येते. रुपये.

३०,०००/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कारचे निकष :

१) कृषि क्षेत्रातील कार्य संघटनात्मक आणि संपूर्ण राज्याला दिशादर्शक असावे.

२) शासकीय किंवा शासन अंगीकृत व सहकार संस्था यांच्या आस्थापनेबर काम करणारे किंवा सेवानिवृत्त

अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.तसेच केंद्र किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत

संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी व्यक्ति/संस्था पात्र असणार नाही.

३) खेडयामधुन परसबाग वृध्दींगत करणा-या महिलांचाही विचार या पुरस्कारासाठी करण्यात यावा

४) कृषि विज्ञान मंडळ किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या गावात सक्रिय आहे त्या मंडळाच्या /कंपन्यांच्या

क्रियाशील सभासंदाचा/प्रमुखांचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात यावा

५) कृषिविषयक दैनिक/साप्ताहिक मासिकामधुन लिखाणाद्वार किंवा विविध स्तरावरील शेतकरी

मेळावे/चर्चासत्र/प्रदर्शन इत्यादि  माध्यमातून जास्तीत जास्त शेतक-यांना मार्गदर्शन करणारी व्यक्ति/संस्था यांचा

विचार या पुरस्कारासाठी करण्यात यावा

६) शासनाकडून यापूर्वी दिलेल्या पुरस्काराला किमान ५ वर्ष पेक्षा जास्त कालावधी पुर्ण झालेला असावा.

७) शासनाच्या कृषि विभागामार्फत तसेच आत्मा अंतर्गत राबविण्यात आलेल्या शेतीशाळा मधील सुलभकर्ता

८) समन्वयक, शेतकरी यांचा विचार या पुरस्कारासाठी करता येईल.

९) शासनाच्या कृषी विषयक धोरणांचा, प्रचार व प्रसिद्धी मध्ये सक्रिय सहभाग असावा.

१० )प्रस्तावासोबत मूळ प्रती तील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई)  सादर करणे आवश्यक आहे.

११) जिल्हास्तरीय समितीमार्फत शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन गुणांकन व मुल्यांकन केले जाते.

 

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!