कृषी पुरस्कार : वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार :-
दर वर्षी महाराष्ट्रत कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या शेतकरी लोकांना (महिला / पुरुष) शेतकरी,कृषि पत्रकार, गट तसेच संस्था यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते.
जे शेतकरी हुशार आहेत त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक-यांना होऊ शकतो आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन किंवा मदत करतील, तसेच इतर व्यक्ती /संस्था ज्या स्वतः शेती करीत नाहीत व त्यांची स्वतःची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने या शेती क्षेत्रात मोठी कामगिरी करतात अशा शेतक-यांना / व्यक्तींना / संस्थांना तसेच महिला, कृषि विज्ञान मंडळ अशा मंडळाचे क्रियाशील सभासद/प्रमुख, इत्यादी व्यक्ती/संस्था/गट यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार :
कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ तसेच कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास,
फलोत्पादन, ग्रामीण विकास इत्यादी क्षेत्रात अद्वितीय कार्य करणा-या शेतकरी गट/संस्थेला वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने सन््मानीत करण्यात येते.या पुरस्कारार्थीला रक्कम रु.५००००/- रोख रकमेचे पारितोषिक,
स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तिचा सपत्निक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार निकष :-
१) कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणारे शेतकरी /गट/संस्था असावेत आणि त्यांचे कार्य संपुर्ण राज्याला
दिशादर्शक असावे.
२) प्रस्तावित शेतकरी हा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी असावा.
३) शासनाकडून यापूर्वी दिलेल्या पुरस्काराला किमान ५ वर्ष पेक्षा जास्त कालावधी पुर्ण झालेला असावा.
४) कृषि क्षेत्रातील कार्य संघटनात्मक आणि संपूर्ण राज्याला दिशादर्शक असाबे.
५)शासकीय किंवा शासन अंगीकृत व सहकारी संस्था यांच्या आस्थापनेवर काम करणारे किंवा सेवानिवृत्त
अधिकारी/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.-
६) केंद्र किंवा राज्य शासनाकडून किंवा अंगीकृत संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारी व्यक्ति/गट/ संस्था पात्र असणार नाही.
७) प्रस्तावीत शेतकरी /गट/संस्था शेतकरी मासिकाचे सभासद असावेत.
९) यशस्वी उत्पादन, रोपवाटीका, बिजोत्पादन, सेंद्रीय निविष्ठा उत्पादन व वापर,काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रतवारी, पैकहाऊस,साठवणूक, मूल्यवर्धन, प्रक्रिया, विपणन, निर्यात इत्यादि कार्यात सहभागी होवुन उल्लेखनीय कार्य करणारा व अधिक नफा मिळविणारा असावा.
१०) यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गैस, दुग्धव्यवसाय,सेंद्रीय शेती, गांडुळ खत यूनिट, कृषी प्रक्रिया, आधुनिक पद्धतीच्या शेती पद्धती, काढणीत्तोर व्यवस्थापन, पणन, निर्यात इत्यादि बाबत परिसरातील शेतकरी यांना मार्गदर्शन करणारा असावा. पिक स्पर्धा, प्रदर्शन, मेळावे, संशोधन संस्थांना भेटी इत्यादि उपक्रमामध्ये सहभागी होणारा तसेच परिसरातील शेतकरी यांना अशा उपक्रमात उद्युक्त करणारा असावा. पिक स्पर्धा , प्रदर्शने इत्यादि मधील सहभाग/पारितोषिक इत्यादि चा तपशील प्रस्तावासोबत पुराव्यासह देण्यात यावा.
११) शेतकरी यांच्या स्वत:च्या नावावर शेती असावी आणि कुटुंबीयासह त्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असावा.