Home / शेती (Agriculture) / कृषी पुरस्कार :-युवा शेतकरी पुरस्कार

कृषी पुरस्कार :-युवा शेतकरी पुरस्कार

कृषी पुरस्कार:- युवा शेतकरी पुरस्कार:-

राज्यातील शेतीषवियक उत्पन्न वाढवण्याच्या  उद्दष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या वय वर्ष  १८ ते ४० मधील शेतक-यांना सन २०२० पासून राज्य शासनाव्दारे युवा शेतकरी पुरस्कार प्रदान करून सन्मानित  करण्यात येत आहे. युवा पुरस्कार विजेत्या शेतक-याला रु. ३०,०००/- रकमेचा धनादेश, स्मृतीषचन्ह (ट्रॉफी), प्रशसितपत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार निवडीसाठी मा. कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समिती मार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड के लेल्या शेतकयास अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो.

आर्थिक व कृषि हवामान परिस्थिती अडचणीची असुन देखील काही शेतकरी आपल्या परीने नविन प्रयोग व नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करून परीसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक होईल असे काम करीत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या बाबत कृषि विभागाने स्वत: पुढाकार घेवुन संबंधित शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पुरस्काराचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावेत. या कामी तालुका कृषि अधिकारी यांच्यावर तालुक्यातील प्रस्ताव तयार करण्याची विशेष जबाबदारी देणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

रु. 30000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे  पुरस्कार संख्या-८  (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)

युवा शेतकरी पुरस्कार निकष-  

1)प्रस्ताव सादर करतेवेळी शेतकरी यांचे वय 18 ते 40 वर्षे असावे.

2)  शेतकरी यांच्या स्वत:च्या नावावर किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावे शेती असावी आणि तो स्वत: कुटुंबीयासह शेती करणारा असावा(आई वडिल पती पत्नी यापैकी एका कुटुंबीयाच्या नावावर शेती असावी)

3) शेतकरी यांचे उदरनिर्वाहाचे/चरितार्थाचे मुख्य साधन शेती व्यवसाय आहे हे संबंधीत शेतकरी यांनी स्वप्रमाणीत करावे.

4)प्रस्तावीत शेतकरी हा एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणारा असावा.

5) यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन,गोबर गैस, दुग्धव्यवसाय, गांडूळ खत, सेंद्रीय शेती इ.आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा असावा.

6) प्रक्रिया, विक्री व गट संघटन कार्य यामध्ये सक्रिय सहभाग असावा.

7) प्रसार/समाज माध्यमांचा कृषी विषयक माहिती प्रचार व प्रसिद्धीसाठी उपयोग करणारा असावा.

8)शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणार्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 3 वर्ष इतके असावे.

9) संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय/किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसुन किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसुन, सेवानिवृत्तीवेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसलेबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.

10) यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला अस्ल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.

11)प्रस्तावासोबत मूळप्रतीतील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयंघोषणापत्र(प्रपत्र-ई ),7/12,8अ, सादर करणे आवश्यक आहे.

12) जिल्हास्तरीय समितीमार्फत शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन गुणांकन व मुल्यांकन केले जाते.

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Social Icons

error: Content is protected !!